Agriculture news in Marathi, country in cotton higher sowing | Agrowon

देशात कापूस लागवड क्षेत्रात वाढ

कोजेन्सिस वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

मुंबई ः चांगल्या पाऊसमानामुळे देशातील कापूस उत्पादक राज्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा लागवड क्षेत्रात ५.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एकूण कापूस लागवड क्षेत्र १२.४ दशलक्ष हेक्टरवर झाले असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या माहितीतून समोर आले आहे.

मुंबई ः चांगल्या पाऊसमानामुळे देशातील कापूस उत्पादक राज्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा लागवड क्षेत्रात ५.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एकूण कापूस लागवड क्षेत्र १२.४ दशलक्ष हेक्टरवर झाले असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या माहितीतून समोर आले आहे.

मागील पाच वर्षांच्या सरासरीच्या आधारे लागवडीखालील क्षेत्राने ११.४८ दशलक्ष हेक्टर क्षेत्राच्या पेरणीच्या क्षेत्राच्या तुलनेत वाढ केली आहे. प्रमुख कापूस उत्पादक गुजरात आणि मध्य प्रदेश वगळता कापूस उत्पादक इतर राज्यांमध्ये लागवड वाढली आहे. गुजरातमध्ये लागवडीचे क्षेत्रफळ २.६ दशलक्ष हेक्टरवर २.३ टक्के कमी होते. महाराष्ट्रात लागवड क्षेत्र ४.३६ दशलक्ष हेक्टर होते. त्या तुलनेत ७.४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गुजरातसह महाराष्ट्राचा देशातील कापूस लागवडीत ५५ ते ६० टक्के हिस्सा आहे. तर तिसऱ्या क्रमांकाचे लागवड करणारे तेलंगण राज्य ठरले आहे. येथे १.७६ दशलक्ष हेक्टर लागवड झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत किंचीत अधिक आहे.

गुरुवारी मध्य प्रदेशात लागवडीखालील क्षेत्र ११.३ टक्क्यांनी घटून सहा लाख दहा हजार हेक्टर झाले आहे. साधारणत: एप्रिलच्या शेवटी उत्तर भारतातील सिंचनाखालील आणि जूनमध्ये देशातील पर्जन्यवृष्टीच्या क्षेत्रात कापूस लागवडीस सुरवात होते. भारतातील सुमारे ७० टक्के कापूस लागवड क्षेत्र पावसाळ्यावर अवलंबून आहे.

खाली दिलेल्या तक्त्यात कापूस लागवडीखालील क्षेत्र हेक्टरी दिलेले आहे. त्यात वर्षातील आणि वर्षानुवर्षे होणाऱ्या बदलांची तुलना टक्केवारीत दिली आहे.

राज्य २०१९-२० (हेक्टरमध्ये) २०१८-१९ (हेक्टरमध्ये) बदललेले क्षेत्र टक्केवारीत सरासरी क्षेत्र हंगामी (हेक्टरमध्ये)
आंध्र प्रदेश ५४५,००० ४७३,००० १५.२ ६५६,०००
तेलंगणा १,७६१,६०० १,७६०,६०० ०.१ १,७००,०००
गुजरात २,६२८,७०० २,६९०,८०० (-) २.३ २,६०४,०००
हरियाणा ७०१,००० ६६५,००० ५.४ ६०६,०००
कर्नाटक ४९४,७०० ३८४,००० २८.८ ६४७,०००
मध्य प्रदेश ६१०,००० ६८८,००० (-) ११.३ ५६५,०००
महाराष्ट्र ४,३६३,६०० ४,०६२,३०० ७.४ ४,१४८,०००
ओडिशा १६९,५०० १५७,८०० ७.४ १३१,०००
पंजाब ४०२,००० २८४,००० ४१.५ ३५६,०००
राजस्थान ६४४,५०० ४९६,१०० २९.९ ४७६,०००
तमिळनाडू ६,५०० ५,८०० १२.१ १६१,०००
इतर २७,१०० १७,२०० ५७.६ ४३,०००
एकूण १२,३५४,२०० ११,६८४,६०० ५.७ १२,०९३,०००

 


इतर अॅग्रोमनी
आर्थिक निर्णयांनी वाढवला प्रियंकाताईंचा...पती गौरव काकडे यांच्या आग्रहावरून पुणे शहरातील...
गेल्या वर्षीच्या साखर निर्यातीसाठी...कोल्हापूर : गेल्या वर्षीची (२०१८-१९) साखर निर्यात...
आंतरराष्ट्रीय डाळ परिषदेकडे उद्योजकांचे...पुणे  : जागतिक कडधान्य उत्पादन व बाजारपेठेला...
कच्च्या साखरेच्या दरात उच्चांकी वाढकोल्हापूर : जागतिक बाजारात कच्च्या साखरेच्या दरात...
साखरेच्या दुहेरी किमतीसाठी सूत्र तयार...नवी दिल्ली: साखरेचे घसरणारे दर स्थिर...
आंतरपिकांतून कुटुंबाचे अर्थकारण केले...माचले (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील दीपक माणिक...
खानदेशात १२ लाख गाठी बाजारात कापसाची आवकजळगाव : कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
ब्राझील भारताकडून गव्हासह भरडधान्य...नवी दिल्ली: दोन्ही देशांच्या कृषिमंत्र्यांमध्ये...
हरभरा, सोयाबीन वगळता सर्व पिकांच्या...खरीप पिकाच्या उत्पादनात जरी घट अपेक्षित असली तरी...
खाद्यतेल आयात शुल्क कमी कराः ग्राहक...नवी दिल्ली: देशांतर्गत वाढलेले खाद्यतेलाचे...
खाद्यतेल बाजारात सटोडियांकडून खोड्याचा...पुणे : खाद्यतेलासह तेलबिया वायदे बाजारात सध्या...
नव्या बेदाण्यास १७५ रुपये दर तासगाव, जि. सांगली ः तासगाव कृषी उत्पन्न बाजार...
कापड गिरण्या बाजारातून कापूस खरेदीस...मुंबई ः साउथ इंडियन मिल्स असोसिएशनने केंद्रीय...
देशात साखर उत्पादनात २६ टक्के घटनवी दिल्ली ः देशात १५ जानेवारीपर्यंत ४४० साखर...
साखर दराची दुहेरी पद्धत ठरवाकोल्हापूर : साखर उद्योगाला बळकटी आणण्यासाठी...
जालन्यात रेशीम कोषाला मिळाला ५०० रुपये...जालना : येथील बाजार समितीच्या आवारात रेशीम कोष...
तादंळाच्या आफ्रिकेतील बाजारपेठेवर चीनचा...नवी दिल्ली : तांदळाची आयात करणारा देशच आता...
खान्देशची केळी निर्यातीत आघाडीकेळीने जगात जळगावला मोठी ओळख दिली आहे. ही ओळख...
कोल्हापुरात गुळाच्या आवकेत तीस टक्क्‍...कोल्हापूर: येथील बाजार समितीत गेल्या हंगामाच्या...
हळद, कापसाच्या फ्युचर्स किमतीत वाढया सप्ताहात बहुतेक सर्वच पिकांच्या मागणीत वाढ...