मुंबई : कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक क्रांतिकारक पाऊल आहे.
ताज्या घडामोडी
चुकीच्या धोरणांमुळे देश रसातळाला ः पृथ्वीराज चव्हाण
मुंबई ः केंद्रातील मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देश आर्थिकदृष्ट्या रसातळाला चालल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी (ता. १०) केली. आर्थिक आघाडीवरील अपयश झाकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विकासदराचे आकडे फुगवून सांगत असल्याचा आरोपही त्यांनी लगावला.

देशात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे बंद पडत आहेत. आपला आर्थिक विकासदरही अन्य लहान देशांच्या तुलनेत कमी झाला आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर देश भयंकर अशा आर्थिक अरिष्टात सापडेल, अशी भीतीही चव्हाण यांनी व्यक्त केली. नागपूरच्या मिहान प्रकल्पातून आठ कंपन्यांनी आर्थिक मंदीचे कारण देत सरकारला जमीन परत केल्याचा दावाही त्यांनी केला.
पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्राच्या आर्थिक धोरणांवर हल्ला चढवताना सद्यस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. देशातील वाहन उद्योग आणि बांधकाम क्षेत्र मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडले आहे. या उद्योगांना तातडीने जीएसटीत सवलत देण्यात यावी. लहान मोठ्या बँका तसेच पतसंस्थांना कर्ज पुरवठा करणाऱ्या बिगर वित्तीय संस्थांनाही सवलत देण्याची मागणीही चव्हाण यांनी केली. चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेचा विकासदर पाच टक्के इतका नीचांकी नोंदवला गेला आहे. ठप्प झालेली गुंतवणूक, व्याजदर कपातीचा शून्य परिणाम आणि कमी होत असलेले अप्रत्यक्ष कर संकलन याचा थेट परिणाम म्हणून आर्थिक मंदी निर्माण झाली आहे.
अनैतिक पक्ष
भाजप देशात एकपक्षीय लोकशाही पद्धत आणू पाहत आहे. अशी लोकशाही हुकूमशाही असते. त्यामुळेच विरोधी पक्षातील लोक स्वपक्षात घेतले जात आहेत. विरोधकांना पक्षात घेण्यासाठी चौकशा थांबविणे, कर्जाचे पुनर्गठण करणे, थकहमी देणे अशी आमिषे दाखवली जात असून, भाजप हा जगातील सर्वात भ्रष्ट व अनैतिक पक्ष बनल्याचा घणाघात पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
- 1 of 1022
- ››