देशाचे कापूस उत्पादन ३३० लाख गाठींपर्यंतच 

देशाचे कापूस उत्पादन ३६० ते ३७५ लाख गाठी (एक गाठ १७० किलो रुई) होईल, असा अंदाज सुरुवातीला विविध संस्थांनी व्यक्त केला होता. आता देशाचे उत्पादन ३२५ ते ३३० लाख गाठीच येईल, असा अंदाज जाणकारांनी जळगाव येथे आयोजित बैठकीत व्यक्त केला आहे.
The country's cotton production is up to 330 lakh bales
The country's cotton production is up to 330 lakh bales

जळगाव : देशाचे कापूस उत्पादन ३६० ते ३७५ लाख गाठी (एक गाठ १७० किलो रुई) होईल, असा अंदाज सुरुवातीला विविध संस्थांनी व्यक्त केला होता. आता देशाचे उत्पादन ३२५ ते ३३० लाख गाठीच येईल, असा अंदाज जाणकारांनी जळगाव येथे आयोजित बैठकीत व्यक्त केला आहे.  या बैठकीला खानदेश जिनिंग प्रेसिंग कारखानदार असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन, असोसिएशनचे जीवन बयस, ज्ञानेश्‍वर भामरे, मुंबई येथील अरुण चौरसिया, कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे माजी संचालक अरुण खेतान, असोसिएशनच्या पीक समितीचे सदस्य अरविंद जैन, व कृषी विभागातील काही वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कापूस उत्पादन, गुलाबी बोंड अळी, मागणी, पुरवठा आदी मुद्द्यांवर चर्चा झाली. 

उत्तरेकडे प्रथमच बोंड अळीचा उपद्रव  उत्तर भारतात पंजाब, हरियाणा, राजस्थानात मिळून १४ लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली आहे. तेथे दर वर्षी ५० लाख गाठींचे उत्पादन येते. पण यंदा तेथे गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव प्रथमच दिसून आला आहे. यामुळे तेथे पीक मोडण्यात आले आहे. सप्टेंबरमध्येच तेथे कापूस खरेदी वेगात झाली. तेथे १० लाख गाठींनी उत्पादन कमी येईल, असा अंदाज बैठकीत व्यक्त करण्यात आला. 

महाराष्ट्रात मोठी घट  महाराष्ट्रात चीन, अमेरिकेच्या तुलनेत अधिकची कापूस लागवड केली जाते. देशात सर्वाधिक कापूस लागवड महाराष्ट्रात होते. पण यंदा महाराष्ट्रातील पिकाला अतिवृष्टी व गुलाबी बोंड अळीचा मोठा फटका बसला आहे. महाराष्ट्रात गुजरातच्या तुलनेत कमी उत्पादन गेले अनेक वर्षे येत आहे. यंदाही महाराष्ट्रात गुजरातच्या तुलनेत पाच ते सात लाख गाठींनी उत्पादन कमी होऊन ते ७५ लाख गाठी एवढेच येईल. यात खानदेशचा वाटा १५ लाख गाठी एवढा राहील. तर गुजरातमध्ये ८० ते ८२ लाख गाठींचे उत्पादन अपेक्षित आहे. कारण तेथील लागवड २२ लाख हेक्टर एवढी असून, दोन वर्षे लागवडीत सतत घट झाली आहे, असेही जाणकारांनी सांगितले. 

कापूस लागवडीत मोठी घट  देशातील कापूस लागवड सात लाख हेक्टरने घटली आहे. लागवड १२४ लाख हेक्टरवर झाली आहे. शिवाय नैसर्गिक समस्यांचा फटका कापूस पिकाला सर्वत्र बसला आहे. उत्तर, मध्य, दक्षिण भारतात म्हणजेच सर्वत्र उत्पादन घटेल. यामुळे कापूस उत्पादनात गेल्या हंगामाच्या तुलनेत घट येईल. देशात यंदा ३२५ ते ३३० लाख गाठींचे उत्पादन हाती येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. 

सरकी दरावर दबाव  केंद्राने खाद्यतेलातील तेजी कमी करण्यासाठी विविध निर्बंध लागू केले आहेत. शिवाय सध्या पशुखाद्यामध्ये सरकी ढेपला कमी मागणी आहे. परिणामी देशात सरकीच्या दरावर दबाव काहीसा वाढला आहे. दरात गेल्या काही दिवसांत क्विंटलमागे ४०० रुपयांनी घट नोंदविण्यात आली असून, दर ३००० रुपयांवर स्थिर आहेत. कापूस दरातील वाढही थांबली असून, कापूस दर खानदेशात किंवा लगतच्या भागात ८००० ते ८५०० रुपये प्रति क्विंटल असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com