Agriculture news in Marathi, Country's economy in danger: Yashwant Sinha | Page 2 ||| Agrowon

देशाची अर्थव्यवस्था धोक्‍यात ः यशवंत सिन्हा
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

कऱ्हाड, जि. सातारा ः काही दिवसांपूर्वी कोणाला विश्वास बसत नव्हता, की अर्थव्यवस्था धोक्‍यात आहे. या विषयी विनोद केले जायचे. मात्र, सध्या लोकांना देशात खूप मंदी असल्याचे पटू लागले आहे. अशा परिस्थितीतही काहींकडून मंदीबाबत हास्यास्पद गोष्टी सांगितल्या जात आहेत. वास्तविक सप्टेंबर २०१७ मध्येच अर्थव्यवस्थेची बिकट चिन्हे दिसत होती. ती आता सर्वत्र दिसत आहे, असे मत माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केले. 

कऱ्हाड, जि. सातारा ः काही दिवसांपूर्वी कोणाला विश्वास बसत नव्हता, की अर्थव्यवस्था धोक्‍यात आहे. या विषयी विनोद केले जायचे. मात्र, सध्या लोकांना देशात खूप मंदी असल्याचे पटू लागले आहे. अशा परिस्थितीतही काहींकडून मंदीबाबत हास्यास्पद गोष्टी सांगितल्या जात आहेत. वास्तविक सप्टेंबर २०१७ मध्येच अर्थव्यवस्थेची बिकट चिन्हे दिसत होती. ती आता सर्वत्र दिसत आहे, असे मत माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केले. 

येथील फ्रेंडस्‌ ऑफ डेमोक्रॉसी संस्थेतर्फे देशाची सध्याची अर्थस्थिती या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते. अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, अध्यक्ष सुभाष एरम, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव, रमाकांत केतन सिन्हा उपस्थित होते. 

श्री. सिन्हा म्हणाले, ‘‘९९.३ टक्के पैसे परत आल्याचे रिझर्व्ह बॅंकेने सांगितले होते. मात्र, आरबीआयसारखी संस्था सद्यस्थितीत काय आहे, हे स्पष्ट करत नाही. सरकारकडून केल्या गेलेल्या नोटबंदीचा निवडणुकीत कुठे भाषणाप्रसंगी वापर केला जातोय का? तर नाही. यानंतर जीएसटीचा निर्णयही या सरकारने घेतला. त्याची प्रक्रिया खूप कठीण बनवली. या वेळी लहान- लहान उद्योग खूप धोक्‍यात आले. मी जर त्या वेळी वित्तमंत्री असतो, तर सिद्धांतानुसार काही हिताचे निर्णय घेतले असते. भाजप सरकारच्या जीएसटीच्या निर्णयामुळे शेती क्षेत्रास मोठा धोका पोचला आहे. यामुळे प्रत्येक गोष्टीची मागणी घटली आहे. याची सुरवात कृषी क्षेत्रापासून झाली. याबाबत अकोल्यातील शेतकऱ्यांबरोबर आंदोलन केले. त्या वेळी फक्त एक मागणी मान्य करण्यात आली. त्यानंतर औद्योगिक क्षेत्रातून मंदीची सुरवात झाली आहे. यातही खूप मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकांना शेतीत रोजगार न मिळाल्यामुळे ते शहराच्या ठिकाणी बांधकाम व्यवसायाकडे वळत आहेत. त्यामुळे एका वर्षात ३० लाख लोकांची बांधकाम व्यवसायात वाढ होत आहे.’’ यावेळी केतन सिन्हा यांनी प्रास्ताविक केले.

इतर बातम्या
पुणे जिल्ह्यात भेडसावतेय चाराटंचाईपुणे : यंदा जिल्ह्यात उशिराने पाऊस झाला. त्यातच...
केंद्राचे पथक आज अकोला जिल्ह्यातअकोला : पावसामुळे शेतीचे व पिकांचे नुकसान झालेले...
शेतकरी कंपन्यांच्या हमीदराने खरेदीचा `...औरंगाबाद : मराठवाड्यासह इतर जिल्ह्यांमधील...
रेशीम संचालकांनी साधला उत्पादकांशी संवादभंडारा : जिल्ह्यातील टसर रेशीम उत्पादक गाव...
रब्बी पिकांना 'इथे' आहे टोळधाडीचा धोका !नवी दिल्ली: देशात मॉन्सूनचा परतीचा प्रवास...
नगर जिल्ह्यात गव्हात बियाणे बदलाचे...नगर : रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांत...
ईशान्यकडील राज्ये का नाकारतात...कोल्हापूर : वाहतूक खर्चामुळे महाग पडत असल्याने...
नगर : नुकसान भरपाईसाठी एकशे पस्तीस...नगर : जिल्ह्यात ऑक्टोबर ते नोव्हेंबर या...
जळगाव जिल्ह्यात 'येथे' सुरु झाली...जळगाव ः खानदेशात भारतीय कापूस महामंडळाने (...
केंद्रीय पथक आज करणार पीकहानीची पाहणीपुणे ः मॉन्सूनोत्तर पावसामुळे राज्यात शेतीच्या...
‘दाणेदार’ खताच्या मागे ‘मालदार’ हालचालीपुणे : राज्यात १९७० ते २००० या तीन दशकांमध्ये...
योजना, निधीची कमी नाही, मग शेतीचे प्रश्...औरंगाबाद : योजना, निधी, यंत्रणा, सुविधा,...
धक्कादाय ! चक्क दाताखाली दाणे ठेवत...उमरखेड, यवतमाळ : मॉन्सूनोत्तर पावसाच्या...
कोकण, मध्य महाराष्ट्रात गारठा कमीपुणे: विदर्भ, मराठवाड्यात तापमान कमी झाल्याने...
शेतकऱ्यांचे ३० कोटी परत करा; पुण्यात...पुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील डाळिंब...
'या' बाजार समितीत शेतकऱ्यांना अल्प दरात...अकोला : सध्या कोणत्याही शासकीय योजनेचा फायदा...
जळगाव जिल्ह्यात सर्वच नुकसानग्रस्तांना...जळगाव : अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना...
केंद्रीय पथक आज मराठवाड्यात पीक...औरंगाबाद : मराठवाड्यात ऑक्‍टोबर-...
फळबागांची लागवड खोळंबण्यास ‘तो’ ठरला...पुणे : मागील दोन ते तीन महिन्यांत जोरदार पाऊस...
सांगलीत बेदाणा लिलावास प्रारंभसांगली : दिवाळीच्या महिन्याच्या सुटीनंतर बाजार...