Agriculture news in Marathi The country's first agricultural export guidance center in Pune | Agrowon

देशातील पहिले कृषी निर्यात मार्गदर्शन केंद्र पुण्यात

टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 मे 2021

राज्यातील शेतकरी व उदयोन्मुख निर्यातदारांना दिशादायक ठरणारे देशातील पहिले कृषी व शेतीमाल निर्यात माहिती व मार्गदर्शन केंद्र आजपासून (ता. १५) पुण्यात सुरू होत आहे.

पुणे ः राज्यातील शेतकरी व उदयोन्मुख निर्यातदारांना दिशादायक ठरणारे देशातील पहिले कृषी व शेतीमाल निर्यात माहिती व मार्गदर्शन केंद्र आजपासून (ता. १५) पुण्यात सुरू होत आहे.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर (एमसीसीआयए) आणि राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बॅंक (नाबार्ड) यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू होत आहे. आज सकाळी ११.३० वाजता नाबार्डचे अध्यक्ष डॉ. जी. आर. चिंताला यांच्या हस्ते दूरदृश्‍यप्रणालीद्वारे या उपक्रमाचे उद्‌घाटन होत आहे. शेतकऱ्यांना https://tinyurl.com/३३frsp२r या लिंकद्वारे उद्‌घाटन कार्यक्रमात सहभागी होता येईल.

‘एमसीसीआयए’च्या कृषी व कृषी व्यवसाय समितीचे अध्यक्ष निवृत्त सनदी अधिकारी उमेशचंद्र सरंगी, एमसीसीआयएचे अध्यक्ष सुधीर मेहता व महासंचालक प्रशांत गिरबाने या वेळी उपस्थित राहणार आहेत. कृषी निर्यात मार्गदर्शन केंद्राची संकल्पना सरंगी यांनी मांडल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून ते या उपक्रमावर सातत्याने काम करीत आहेत. एमसीसीआयएच्या माध्यमातून हे केंद्र राज्यातील निर्यातदारांसाठी ‘वन स्टॉप-शॉप’ या धर्तीवर काम करणार आहे.

नवोदित निर्यातदारांना या केंद्रातून विविध विषयांवर मार्गदर्शन मिळणार आहे. यात कीडनाशकांचे उर्वरित अंशाचे व्यवस्थापन, ग्लोबल गॅप प्रमाणीकरण, विविध आयातदार देशांकडून कोणत्या शेतमालासाठी गुणवत्तेचे कोणते निकष लावले जात आहेत याविषयी केंद्रातून माहिती दिली जाईल. निर्यातक्षम बागांचे व्यवस्थापन, काढणी, पद्धती, गुणवत्तेची नियमावली, उत्पादन तंत्रज्ञान, हरितगृहातील उत्पादन, काढणीपश्‍चात तंत्रज्ञान, पॅकेजिंग, विविध देशांना हवाई किंवा सागरी मार्गे शेतीमाल निर्यात पाठवण्याचे निकष अशा महत्त्वपूर्ण बाबींवर या केंद्रातून सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे.

एमसीसीआयएच्या माध्यमातून देशातील पहिले कृषी व शेतीमाल निर्यात माहिती व मार्गदर्शन केंद्र चालू होते असल्याबद्दल आम्हाला समाधान वाटते आहे. यातून राज्यातील कृषी निर्यातीला आणखी चालना मिळेलच; पण त्याचा शेतकऱ्यांनाही मिळणार आहे. शेतकऱ्यांना समृद्ध करणारी निर्यात व्यवस्था बळकट करण्याचे ध्येय या केंद्राचे आहे.
- उमेशचंद्र सरंगी, अध्यक्ष, एमसीसीआयए कृषी व कृषी व्यवसाय समिती

कृषी निर्याती संबंधी जागृती घडवून आणणारे विविध उपक्रम, प्रशिक्षण आणि कार्यशाळा देखील या केंद्राकडून आयोजित केल्या जाणार आहेत. याशिवाय निर्यात प्रकल्पांना भेटी, बायर- सेलर मिट्‌स असे उपक्रम घेत निर्यातीसंबंधी उत्साहाचे वातावरण तयार केले जाईल. यात आम्ही अपेडा, राज्य व केंद्राच्या निर्यातविषयक विविध योजनांची माहिती देणार आहोत.
- प्रशांत गिरबाने, महासंचालक, एमसीसीआयए


इतर ताज्या घडामोडी
सातव्या वेतन आयोगासाठी महामंडळांमधील...नगर : राज्यातील विविध महामंडळांमधील अधिकारी-...
रत्नागिरी, संगमेश्‍वर, राजापूरला ...रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशी रत्नागिरी...
चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्यांना...वडाळी जि. अकोला : या हंगामाला सुरुवात होताच...
पशुचिकित्सा व्यावसायिक संघटना करणार...नागपूर : पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेच्या...
जागोजागी होणारी लुट थांबवा, ...नगर : ‘‘राज्यात जागोजागी प्रत्येक क्षेत्रात...
‘घटनादुरुस्ती करून आरक्षण देणे  हाच...कोल्हापूर : घटनादुरुस्ती करून मराठा आरक्षण देणे...
कोकणातील डच, पोर्तुगाल वखारींचे होणार...पुणे : भारतातील आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारासाठी...
गोसीखुर्द प्रकल्प पूरनियंत्रणासाठी ...मुंबई ः गोसीखुर्द प्रकल्प पूरनियंत्रणाबाबत...
प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींना पाच पट...नाशिक : देशातील पहिला सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग...
आरक्षण देण्याची राज्यकर्त्यांची इच्छाच...पुणे : मराठा समाजाला आरक्षण देण्याची राजकीय...
नांदेडमध्ये थकीत ‘एफआरपी’साठी धरणेनांदेड : ऊस गाळप होऊनही पैसे न दिल्याने...
सांगली जिल्ह्यात खरिपाची दहा टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पेरणीस प्रारंभ...
आर्थिक दुर्बल घटकांना बियाणे वाटपाचे...नाशिक : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत विविध...
‘विष्णुपुरी’तून ४७१ क्सुसेकने विसर्गनांदेड : गोदावरी नदीवरील डॉ. शंकरराव चव्हाण...
परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ७४ मंडळांत...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ७४ मंडळांमध्ये...
टोमॅटोवरील टुटा ॲबसोलुटा किडीची ओळख,...टोमॅटो पिकात टुटा ॲबसोलुटा या किडीचा प्रादुर्भाव...
नागपुरात सोयाबीन दरात तेजीनागपूर : सोयाबीन दरातील तेजी कायम असून कळमना...
सागरी शेवाळ उत्पादनात व्यावसायिक संधीसागरी शेवाळ उत्पादनामुळे व्यावसायिक संधी उपलब्ध...
नगरमध्ये दोडका, वांगी, भेंडीच्या दरात...नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
सांगलीत वीस लाखांचा खतसाठा जप्तसांगली : विना परवाना खत विक्री प्रकल्पावर कृषी...