agriculture news in marathi, course for Agri dealers in PDKV | Agrowon

कृषी विक्रेत्यांसाठी पदविका अभ्यासक्रम : पंदेकृवि-धानुकामध्ये होणार करार

टीम अॅग्रोवन
सोमवार, 14 जानेवारी 2019

अकोला : कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या विक्रेत्यांसाठी एक वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम बनविण्यात अाला अाहे. हा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि धानुका ॲग्रिटेक लिमिटेड यांच्यात सोमवारी (ता. १४) सामंजस्य करार होत आहे, अशी माहिती धानुकाचे ग्रुप चेअरमन अार. जी अग्रवाल यांनी दिली. 

अकोला : कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या विक्रेत्यांसाठी एक वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम बनविण्यात अाला अाहे. हा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि धानुका ॲग्रिटेक लिमिटेड यांच्यात सोमवारी (ता. १४) सामंजस्य करार होत आहे, अशी माहिती धानुकाचे ग्रुप चेअरमन अार. जी अग्रवाल यांनी दिली. 

या उपक्रमाची श्री. अग्रवाल यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली. या वेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सी. डी. मायी उपस्थित होते. श्री. अग्रवाल म्हणाले, की कंपनीने सहा वर्षांपूर्वी पुढाकार घेत गुजरातमध्ये विद्यापीठाच्या सहकार्याने कृषी विक्रेत्यांसाठी असा अभ्यासक्रम राबविणे सुरू केले. तेथे सर्वच विक्रेते अाता हा पदविका अभ्यासक्रम पूर्ण करीत अाहेत.

महाराष्ट्रात धानुका ॲग्रिटेक विद्यापीठासोबत सार्वजनिक-खासगी भागीदारीअंतर्गत पुढाकार घेत अाहे. ५२ अाठवडे चालणारा हा अभ्यासक्रम करणाऱ्या पहिल्या बॅचच्या ४० जणांची ५० टक्के फी (प्रत्येकी १० हजार रुपये) धानुकातर्फे भरली जाणार अाहे. विदर्भातील हवामानाला अनुसरून असलेल्या कृषिविषयक स्थितीचा विचार करून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात एंटोमोलॉजी विभागाने या अभ्यासक्रमाची रचना केली आहे. अभ्यासक्रमासाठी आवश्यक ते सर्व साहित्य विक्रेत्यांना पुरविण्यात येणार आहे.

अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विक्रेत्यांना कृषी क्षेत्रात अालेल्या बदलांची माहिती होईल. पर्यायाने हे ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत जाईल असा विश्वास श्री. अग्रवाल यांनी व्यक्त केला. डॉ. मायी यांनी अभ्यासक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली. 


इतर कृषी शिक्षण
ऊर्जेशिवाय शीतकरणाचे तंत्रकोणत्याही ऊर्जेच्या वापराशिवाय शीतकरणाची एक...
हरितगृह परिणाम म्हणजे काय..पर्यावरणाचा विषय आला की, हरितगृह वायू किंवा...
..अशी ओळखा दुधातील भेसळवाढत्या महागाईमुळे अनेकदा अन्नपदार्थांमध्ये भेसळ...
एल निनो म्हणजे नेमके काय ?हवामानाविषयी माहितीमध्ये सातत्याने ऐकू येणाऱ्या...
भविष्यात मोबाईल बनतील ‘शेतीचे डॉक्टर’ पुणेः शेतातील कीड-रोग-हवामान-माती यातील बदलत्या...
तणनिर्मूलनाचा थोडक्यात इतिहास माणसाने शेतीला सुरवात केल्यानंतर काही काळात अन्य...
हरिभाऊ जावळे यांनी स्वीकारला कृषी...पुणे ः कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्ष...
रंगीत कापड उत्पादनासाठी ‘पंदेकृवि’चा...अकोला  ः केंद्रीय कापूस संशोधन संस्था (...
कृषी अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये विविध...कृषी क्षेत्रातील होत असलेले बदल, आर्थिक गुंतवणूक...
नत्र चक्राचे फायदे घेण्यासाठी...गेल्या भागापासून आपण मार्टीन ॲलेक्झांडर यांच्या...
आनंदशाळा अन् जैवविविधता संवर्धनाचे...आनंदशाळा शिबिरानंतर जवळपास सर्व शाळांत शिवार फेरी...
जीविधेची जाणीव करून देणारी आनंदशाळाशिक्षण गुणवत्तापूर्ण बनण्यासाठी शिक्षण...
गटशेतीतील जबाबदाऱ्यांचे वाटपशेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने शेती...
भूगर्भात पाणीसाठा टिकविण्यासाठी भूमिगत...भूमिगत बंधारा बांधण्याचे काम जमिनीखाली असल्याने...
हवामान बदलाचा जमिनीच्या गुणधर्मांवर...जमिनीची निर्मिती हजारो वर्षांमध्ये होते. ती...
इतिहासातील जलसंधारण संकल्पना अन्...मागच्या भागात आपण इतिहासातील सागरी किल्ल्यांवरील...
कृषी विक्रेत्यांसाठी पदविका अभ्यासक्रम...अकोला : कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या...
होय, आम्ही बदलू शेतीचे चित्र... ‘शाळेत सुरू असलेल्या कृषी शिक्षण अभ्यासक्रमातून...
खरीप पिकांवरिल किडींना वेळीच रोखा...खरीप पिकांना पेरणीनंतर खूरपडीचा प्रादुर्भाव होतो...
जुन्या पेरू फळबागेचे करा पुनरुज्जीवनपेरू फळबागा फार जुन्या झाल्यानंतर त्यांची...