agriculture news in Marathi court cases filed on two soybean seed companies Maharashtra | Agrowon

दोन बियाणे कंपन्यांविरुद्ध न्यायालयीन खटला दाखल

टीम अॅग्रोवन
रविवार, 2 ऑगस्ट 2020

बाजारात निकृष्ट बियाणे दिल्या प्रकरणी जिल्हा कृषी विभागाने मूर्तिजापूर येथील न्यायालयात दोन खाजगी कंपन्यांविरुद्ध खटला दाखल केले आहे. 

अकोला ः या हंगामात सोयाबीन बियाणे उगवले नसल्याने बियाणे कंपन्यांविरुद्ध शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष आहे. बाजारात निकृष्ट बियाणे दिल्या प्रकरणी जिल्हा कृषी विभागाने मूर्तिजापूर येथील न्यायालयात दोन खाजगी कंपन्यांविरुद्ध खटला दाखल केले आहे. या कंपन्यांचे बियाणे प्रयोगशाळेत अप्रमाणित आल्याचा अहवाल मिळाल्यानंतर शुक्रवारी (ता.३१)  प्रकरण दाखल करण्यात आले आहे.
 

या हंगामात जिल्ह्यात शेकडो हेक्टरवरील पेरण्या उलटलेल्या आहेत. याला निकृष्ट बियाणे सुद्धा कारणीभूत ठरले. कृषी विभागाने घेतलेल्या नमुन्यांपैकी सहा कंपन्यांचे बियाणे नमुने गुणवत्ता प्रयोगशाळेत अप्रमाणित निघाले आहेत. याबाबत कृषी विभागाने संबंधित कंपन्यांना खुलासे मागितले होते. मात्र सहा पैकी दोन कंपन्यांचे स्पष्टीकरण योग्य नसल्याने कृषी खात्याने या कंपन्यांविरुद्ध मूर्तिजापूर न्यायालयात खटला दाखल केला. 

या दोन्ही कंपन्यांच्या बियाण्याचे नमुने मूर्तिजापूर तालुक्यात घेण्यात आले होते. त्यामुळे आता कंपन्यांविरुद्ध न्यायालयीन प्रक्रिया मूर्तिजापूर येथे चालविला जाणार आहे. बियाणे अप्रमाणित आढळलेल्या उर्वरित कंपन्यांविरोधातसुद्धा अशाच प्रकारची कारवाई केली जाणार आहे.

प्रतिक्रिया
अकोला जिल्ह्यात सोयाबीनचे ५१ नमुने काढण्यात आले होते. त्यापैकी ४९ नमुने जिल्हा परिषद कृषी विभागाने घेतले. यातील २५ नमुने अप्रमाणित आलेले आहेत. त्यात ८ प्रकरणात न्यायालयीन प्रक्रिया चालविली जाणार आहे. दोन कंपन्यांविरुद्ध कोर्ट केसेस केलेल्या असून उर्वरित कंपन्यांविरुद्ध आठवडाभरात न्यायालयात केस दाखल करणार आहोत. 
- मुरली इंगळे, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी, अकोला


इतर ताज्या घडामोडी
सार्वजनिक पैदास कार्यक्रमांचे प्रमाण...फळपिकातील नव्या जातींच्या पैदास कार्यक्रमांचे...
नगरमध्ये पीककर्ज वितरणात जिल्हा बॅंकच...नगर ः नगर जिल्ह्यात खरीप हंगामात आत्तापर्यंत खरीप...
`रानभाज्या खा, रोगप्रतिकार शक्ती वाढवा`सोलापूर : माहिती असलेल्या पालेभाज्या, फळभाज्या...
वेळीच ओळखा टोमॅटोमधील विकृतीभाजीपाला पिके ही अन्य पिकांच्या तुलनेत नाजूक...
गिरणा नदीवरील बलून बंधारे प्रकल्पाला...जळगाव  : केंद्र सरकारचा प्रायोगीक प्रकल्प...
परभणी जिल्ह्यात ऊस लागवडीत दुपटीने वाढपरभणी  ः जिल्ह्यात सन २०१९-२० मध्ये ३० हजार...
सहकारी साखर कारखान्यांनी रुग्णालय...कऱ्हाड, जि. सातारा : कोरोनाचे संकट हे अख्या जगावर...
शेतीच्या डेटा विज्ञानाबाबत जागृकतेची...परभणी :  डेटा विज्ञान तसेच कृत्रिम...
कृषी सल्ला (कोकण विभाग)हवामान अंदाज ः मुंबई येथील प्रादेशिक हवामान...
सांगलीत डाळिंब उत्पादक पीकविम्याच्या...सांगली : जिल्ह्यात पाच मंडळांत अतिपावसाने...
खानदेशातील अनेक भागात तुरळक पाऊसजळगाव  ः जिल्ह्यात रविवारी (ता.९) अनेक भागात...
रानभाज्यांकडे नागरिकांचा वाढता कलयवतमाळ : जिल्ह्याच्या डोंगररांगा व शेतशिवारात...
सातवा वेतन लागू करा, महागाई भत्ता द्या...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगरमध्ये आले चार ते पाच हजार रूपये...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या...
नगर जिल्ह्यात चार लाख टन कांदा चाळीतचनगरः गतवर्षी लेट खरीप, उन्हाळी कांद्याचे क्षेत्र...
नाशिकमध्ये लसणाची आवक साधारण; दरही...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
सोलापुरात ढोबळी मिरची, वांगी, काकडीला...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
मे ते जून दरम्यानचे वीज बिल माफ करा :...कोल्हापूर : मे ते जून दरम्यानचे वीज बिल माफ न...
पुणे बाजार समितीत व्यवहार सुरळीत...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
बुलडाण्यात २८२ शेतकऱ्यांनी राबवला रेशीम...बुलडाणा : जिल्ह्यात सन २०१५-१६ पासून सहकार व...