agriculture news in marathi Court hearing on Nashik APMC fraud case tomorrow | Page 2 ||| Agrowon

नाशिक बाजार समिती गैरव्यवहार प्रकरणी उद्या सुनावणी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 सप्टेंबर 2021

नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २६ ऑक्टोबर २०१६ला बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्याच्या खटल्याची सुनावणी उद्या (ता.८) येथील सत्र न्यायालयात होणार आहे. 

नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २६ ऑक्टोबर २०१६ला बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्याच्या खटल्याची सुनावणी उद्या (ता.८) येथील सत्र न्यायालयात होणार आहे. 

नाशिक बाजार समितीचे २०१६ मध्ये देविदास पिंगळे हे सभापती असताना कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता, फरक, बोनस तसेच बक्षिसाच्या मिळणाऱ्या रकमेपोटी ५० टक्के रकमेची मागणी करून कोऱ्या धनादेशावर कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षरी घेण्यात आल्या. नंतर कर्मचाऱ्यांच्या खात्यातून ५७ लाख ७३ हजार ८०० रुपये इतकी रक्कम परस्पर काढूनही घेण्यात आली. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर पिंगळे हे तीन महिने तुरुंगात होते. नंतर त्यांना सशर्त जामीन मंजूर झाला होता. 

बाजार समितीच्या धोरणात्मक निर्णयात कोणताही हस्तक्षेप करायचा नाही, अशी अट त्यांना घालण्यात आली होती. परंतु असे असले तरी पिंगळे यांच्याकडून या खटल्यातील साक्षीदार व संबंधित कर्मचाऱ्यांवर विविध मार्गाने दबाव आणण्यात येत असल्याचे या खटल्यातील साक्षीदार सहाय्यक सचिव रघुनाथ धोंडगे, मुख्य लिपिक सोमनाथ पिंगळे, ज्ञानेश्वर मांडे, वरिष्ठ लिपिक प्रदीप फडोळ, नीलेश दिंडे व लिपिक रामकुमार काकड यांनी सांगितले. पिंगळे हे साक्षीदारांवर दबाव आणत असल्याची तक्रार संबंधित पोलिस ठाण्यात दिली आहे. मात्र असे असतानाही राजकीय दबावापोटी पोलिस हे पिंगळे यांच्याविरुद्ध कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचे धोंडगे व मांडे यांनी सांगितले. 

खटल्यात एकूण ११८ साक्षीदार आहेत. ॲड. योगेश कापसे सरकारी पक्षातर्फे तर ॲड.राहुल कासलीवाल साक्षीदारांतर्फे काम बघत आहेत. या खटल्यात पिंगळे यांच्याबरोबरच लेखापाल रवींद्र जैन, स्टेनो विजय निकम आणि लिपिक दिगंबर चिखले हे सुद्धा संशयित आरोपी आहेत. 
 


इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांना बियाण्यांबाबत स्वावलंबी...औरंगाबाद : ‘‘शेतकऱ्यांना बियाण्यांच्या बाबतीत...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पंधरा...परभणी  : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १५...
परभणी जिल्ह्यात अतिवृष्टिग्रस्तांसाठी...परभणी ः जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या...
लखीमपूर हिंसाचार : आशिष मिश्राला ‘नोटीस...लखीमपूर, उत्तरप्रदेश ः येथील हिंसाचारप्रकरणी...
सत्तेचा दुरुपयोग सगळ्यांनाच दिसतो आहे...सोलापूर : ‘‘निवडणुकी आधी मला ईडीची नोटीस पाठवली,...
बुलडाण्यात खरीप हंगामात ९५० कोटी...बुलडाणा : अतिवृष्टी, पूर परिस्थितीने यंदाच्या...
साडेचार हजार रुपयांचा पहिला हप्ता उसाला...कुडित्रे, जि. कोल्हापूर : यंदा उसाला उत्पादन...
वादळी पावसामुळे ऊस उत्पादकांचे लाखोंचे...आर्णी, जि. यवतमाळ : संततार पाऊस, वादळाचा...
सांगली जिल्ह्यात रब्बीच्या पेरण्या सुरू सांगली : जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरण्यांना...
पुणे बाजार समिती सेस प्रवेशद्वारावर ...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सह...
आंबा, काजू विमा परतावा मंडलनिहाय जाहीर सिंधुदुर्गनगरी : फळपीक विमा योजनेचा परतावा...
कंबोडियाची शाही नांगरणीशेती व्यवसायावर भर देणाऱ्या कंबोडियामध्ये...
कोरडवाहूमध्ये चिंचेची वनशेतीऔषधी गुणांमुळे चिंचेला भारतीय खजूर असे म्हणतात....
छापेमारीच्या हेतूबाबत आयकर विभागच सांगू...मुंबई ः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी...
मराठवाड्यातील २३१ मंडलांत पाऊसपरभणी ः मराठवाड्यातील २३१ मंडलांत बुधवारी (ता. ६...
पुणे जिल्हा बँकेतर्फे रब्बी पीककर्ज...पुणे : खरीप हंगामात सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस...
रत्नागिरी : आंबा, काजू विमा परतावा ५३...रत्नागिरी ः वातावरणातील बदलामुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांची वीज कापली; लोकप्रतिनिधी...जळगाव ः जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत...
आंबा प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी...रत्नागिरी ः पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया...
सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षांवर...सोलापूर : नराळे (ता. सांगोला) येथील आरोग्य...