जालना : सव्वाअकरा लाखांवर कपाशी पाकिटांची गरज

सव्वाअकरा लाखांवर कपाशी पाकिटांची गरज
सव्वाअकरा लाखांवर कपाशी पाकिटांची गरज

जालना : जिल्ह्यात येत्या खरीप हंगामासाठी कपाशीची २ लाख ८३ हजार ६५० हेक्‍टरवर लागवड नियोजित करण्यात आली आहे. या लागवड क्षेत्रासाठी ११ लाख ३५ हजार ६०० कपाशी बियाणे पाकिटांची गरज असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

 जिल्ह्यात येत्या खरीप हंगामासाठी ५ लाख ५२ हजार ५५२ हेक्‍टरवर खरिपाची पेरणी नियोजित करण्यात आली आहे. त्यामध्ये ७६०० हेक्‍टरवर उडीद, ६८५ हेक्‍टरवर भुईमूग, १२ हेक्‍टरवर तीळ, १ लाख २२ हजार ४५० हेक्‍टरवर सोयाबीन, तर २ लाख ८३ हजार ६५० हेक्‍टरवर कपाशीची लागवड होण्याचे नियोजन आहे. उडदाचे २८५ क्‍विंटल बियाणे लागणार असून त्यापैकी २५० क्‍विंटल महाबीज, तर ३५ क्‍विंटल खासगी कंपन्यांकडून पुरविण्यात येईल. भुईमुगासाठी लागणाऱ्या १४४ क्‍विंटल बियाण्यांपैकी १०० क्‍विंटल बियाणे महाबीजकडून, तर ४४ क्‍विंटल बियाणे खासगीतून उपलब्ध करून देण्यात येईल. 

नियोजित क्षेत्रासाठी सोयाबीनचे २३ हजार ८७८ क्‍विंटल बियाणे लागेल. त्यापैकी १६ हजार क्‍विंटल बियाणे महाबीजकडून, तर १५०० क्‍विंटल बियाणे राष्ट्रीय बीज निगमकडून, ६३७८ क्‍विंटल बियाणे खासगी कंपन्यांकडून उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. कपाशीच्या लागणाऱ्या ११ लाखा ३५ हजार ६०० बियाणे पाकिटांपैकी १ हजार बियाणे पाकिटे महाबीजकडून, तर उर्वरीत खासगी कंपन्यांकडून मिळतील. ही पाकिटे ५ जूनपूर्वी कुणीही शेतकऱ्यांना विकू नये, अशी ताकीद प्रत्येक विक्रेत्याला देण्यात आली आहे. गुलाबी बोंड अळीच्या खबरदारीसाठी ही पावले उचलण्यात आल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. 

बियाणे बदल दरानुसार नियोजन

येत्या खरीप हंगामासाठी बियाणे उपलब्ध करून देण्याचे नियोजन करताना बियाणे बदलाचे प्रमाण गृहित धरण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यात उडीद, भुईमूग, सायोबीन या पिकाच्या बियाणे बदलाचे प्रमाण जवळपास ३० टक्‍के आहे. दुसरीकडे सूर्यफूल, तीळ, कपाशीचे बियाणे बदलाचे प्रमाण शंभर टक्‍के असल्याची माहिती कृषी विभागाने दिली. 

एक लाख ८५ हजार मेट्रिक टन खताची गरज

कृषी विभागाकडून येत्या खरीप हंगामासाठी १ लाख ८५ हजार मेट्रिक टन रासायनिक खताची मागणी नोंदविण्यात आली आहे. त्यामध्ये युरिया ७३ हजार ७२ मेट्रिक टन, डी.ए.पी ३२ हजार ५४६ , एस.एस.पी १९२५, एम.ओ.पी. ९५३०, तर संयुक्‍त खते ५४ हजार ६२० मेट्रिक टन लागतील, असे मागणीत नोंदविण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com