कोविड-१९ रुग्णांच्या वास, चव संवेदनांवर होतो दीर्घकाळासाठी परिणाम

कोविड १९ च्या आजारातून बरे झाल्यानंतरही सुमारे ९० टक्के लोकांच्या चव आणि वासांच्या संवेदना पुन्हा प्राप्त होत नसल्याचे दिसून आले आहे. कोविडची अन्य सर्व लक्षणे संपूर्णपणे नाहीशी झाली तरी सुमारे एक महिन्यापर्यंत या संवेदना स्पष्टपणे जाणवत नसल्याचे आढळले आहे
Covid-19 has a long-term effect on patients' smells and taste sensations
Covid-19 has a long-term effect on patients' smells and taste sensations

कोविड १९ च्या आजारातून बरे झाल्यानंतरही सुमारे ९० टक्के लोकांच्या चव आणि वासांच्या संवेदना पुन्हा प्राप्त होत नसल्याचे दिसून आले आहे. कोविडची अन्य सर्व लक्षणे संपूर्णपणे नाहीशी झाली तरी सुमारे एक महिन्यापर्यंत या संवेदना स्पष्टपणे जाणवत नसल्याचे आढळले आहे . आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या गटाने इटलीमध्ये केलेल्या अभ्यासामध्ये निरीक्षणाच्या कालावधीमध्ये १० टक्के लोकांना या दोन्ही संवेदना अजिबात प्राप्त झाल्या नाहीत. यातून कोविड विषाणूच्या प्रादुर्भावाचे दीर्घकालीन परिणाम रुग्णांना भोगावे लागणार असल्याचे स्पष्ट होते. हे संशोधन जर्नल जेएएमए मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या गटाने २०२ इटालियन कोविड आजाराने ग्रस्त झालेल्या व मात्र रुग्णालयामध्ये दाखल करण्याइतपत तीव्र प्रादुर्भाव नसलेल्या लोकांचा अभ्यास केला. फोनवरून केलेल्या या सर्वेक्षणामध्ये या लोकांकडून वास आणि चवीबाबत प्रश्नावली भरून घेण्यात आली. त्यानंतर पुन्हा एक महिन्याने वास आणि चव कितपत समजते, याबाबत प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांची उत्तरे ० ते ५ या दरम्यान (कोणतीही समस्या नसल्यास शून्य आणि पूर्ण संवेदना नसल्यास पाच) भरण्यात आली. प्रयोगातील निष्कर्ष कोरोना विषाणूच्या महत्त्वाच्या लक्षणामध्ये वास आणि चव यांच्या संवेदना नष्ट होण्याचा समावेश करण्यात आलेला आहे. ही लक्षणे प्रथम रुग्णालयामध्ये भरती केलेल्या आणि नंतर फारसा तीव्र प्रादुर्भाव नसलेल्या लोकांमध्ये दिसून येत होती. प्राथमिक अभ्यासामध्ये या दोन्ही संवेदनांसाठी कारणीभूत न्युरॉनच्या पेशींवर कोविड प्रादुर्भावाचा परिणाम होत असल्याचे स्पष्ट झाले होते.

  • २०२ पैकी सुमारे ११३ रुग्णांची चव आणि वास यांची संवेदना प्रादुर्भाव होण्याच्या दोन आठवडे आधीपासून नष्ट होत असल्याचे आढळले आहे.
  • एकूण रुग्णांपैकी ५५ जणांनी त्यांना संवेदना पुन्हा प्राप्त झाल्याचे स्पष्ट केले. तर ४६ लोकांनी त्यात सुधारणा होत असल्याचे सांगितले. १२ लोकांना ही चव आणि वास संवेदना पुन्हा न मिळाल्याचे किंवा पूर्णपणे गेल्याचे सांगितले.
  • ही समस्या अनेकांना ४ आठवड्यांपर्यंत सातत्याने जाणवत असल्याचे नोंदवण्यात आले.
  • वय आणि लिंग यांचा या संवेदना पुन्हा प्राप्त होण्याच्या प्रक्रियेवर कोणताही वेगळा परिणाम जाणवला नाही.
  • जगभरामध्ये कोविड महामारीचा वेग वाढत असताना रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यात या रोगाची लक्षणे न दिसताही प्रादुर्भाव दिसून येत आहे. अशा स्थितीमध्ये चव आणि वास यांच्या संवेदना दीर्घकाळापर्यंत नष्ट होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा दीर्घकालीन समस्यांसाठी वास व चव यांच्या संवेदना पुन्हा प्राप्त करण्यासाठी गंध प्रशिक्षणासारखी उपचार पद्धती वापरावी लागेल. या संदर्भात अधिक अभ्यास सुरू ठेवण्यात येणार आहे. - डॉ. जोशुवा लेव्ही, इमोरी युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीन, अॅटलांटा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com