रत्नागिरी जिल्ह्यात अनुदानावर गाय-म्हैस, शेळ्या, कोंबड्या

रत्नागिरी जिल्ह्यात अनुदानावर गाय-म्हैस, शेळ्या, कोंबड्या
रत्नागिरी जिल्ह्यात अनुदानावर गाय-म्हैस, शेळ्या, कोंबड्या

रत्नागिरी : जिल्हा परिषद सेस योजनेसह शासनाच्या विशेष घटक आणि जिल्हा नियोजनमधून अनुदानावर शेतकऱ्यांना गाय-म्हैस, शेळ्या, कोंबड्या खरेदीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. जिल्ह्यातील लोकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन व दुग्धविकास समिती सभापती संतोष गोवळे आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. यतीन बी. पुजारी यांनी केले.

विशेष घटक योजनेंतर्गत जिल्ह्यातील अनुसूचित जातीतील पशुपालकांना दोन दुधाळ जनावरांचा गट पुरवठा ७५ टक्के अनुदानावर करण्यात येणार आहे. दोन दुधाळ जनावरांच्या गटाची ३ वर्षांच्या विम्यासह किंमत शासकीय दरानुसार ८५,०६१ होते. त्याच्या ७५ टक्के अनुदानित रक्कम ६३ हजार ७९० रुपये आहे.

लाभार्थीने विम्यासह भरावयाची रक्कम २१,२६५ आहे. अनुसूचित जातीतील पशुपालकांना शेळीगट १२ टक्के अनुदानावर मिळेल. शेळीगटाची तीन वर्षांच्या विम्यासह किंमत शासकीय दरानुसार ४७,८४८ आहे. त्याच्या ७५ टक्के अनुदानित रक्कम ३५,८८६ रुपये आहे. २५ टक्के म्हणजे ११,९६२ रुपये लाभार्थीने भरावयाचे आहेत. अनुसूचित जातीतील पशुपालकांसाठी तीनदिवसीय पशुसंवर्धनविषयक प्रशिक्षण होणार आहे.

जिल्हा परिषद सेसमधून पशुपालकांना एक देशी, सुधारित गाय-म्हैस व पारड्यांसाठी ५० टक्के अनुदान मिळेल. एका दुधाळ जनावराची किंमत शासकीय दरानुसार ४० हजार रुपये आहे. त्याच्या ५० टक्के अनुदानित रक्कम २० हजार रुपये भरावयाची आहे. या योजनेत जिल्ह्यातील पशुपालकांना शेळीगट ५० टक्के अनुदानावर मिळते.

शेळीगटाची किंमत शासकीय दरानुसार ४५, ००० रुपये  आहे. लाभार्थीने २२५०० रक्कम भरावयाची आहे. तलंगा गट (२५ माद्या ३ नर) वाटप योजनेत ५० टक्के अनुदान दिले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com