गाईच्या दुधाला २७ रुपये दरासाठी शेतकरी संघटनेची निदर्शने

गाईच्या दुधाला २७ रुपये दरासाठी शेतकरी संघटनेची निदर्शने
गाईच्या दुधाला २७ रुपये दरासाठी शेतकरी संघटनेची निदर्शने

सांगली : दूध संकलन व खरेदी करणाऱ्या संस्थांनी गाईच्या दुधाला प्रतिलिटर दोन रुपये तर म्हशीच्या दुधाला प्रतिलिटर तीन रुपयांनी वाढ देण्याचे आदेश शासनाने दिले आहे. मात्र, शासनाने दिलेला आदेश दूध संस्था पाळत नाहीत. त्यामुळे दूध उत्पादकांचा आर्थिक तोटा होतो आहे. महानंदा नेही दूध खरेदीचा दर कमी केला आहे. गाईच्या दुधाला प्रति लिटर २७ रुपये असा दर मिळाला पाहिजे, अशी भूमिका शेतकरी संघटनेने केली आहे. दूध खरेदीचे दर वाढवले नाहीत तर तीव्र आंदोलन केले जाईल, अशा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संघटनेने दूध दर वाढीबाबत बुधवारी (ता. १०) दुपारी एक वाजता निदर्शन केले. या वेळी संजय कोले, सुनील फराटे, रावसो दळवी, अल्लाउद्दीन जमादार, शीतल राजोबा, नवनाथ पोळ, रामचंद्र कणसे शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांना निवदेन दिले. या निवदेनात म्हटले आहे की, "दूध खरेदी करणाऱ्या संस्थांनी गाईच्या दुधाला प्रति लिटरला दोन रुपये तर म्हैशीच्या दुधाला प्रति लिटर तीन रुपयांनी दर वाढण्याचे आदेश दिले होते. मात्र, हे आदेशाचे पालन महिनाभर केले. त्यानंतर दूध खरेदी करण्याचे दर कमी केले आहेत. सरकाने अशा दूध खरेदी करणाऱ्या संस्थावर कारवाई केली नाही. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. तरच दूध खरेदीचे दर वाढतील. दूध संघ आणि संस्थांनी दूध खरेदीमध्ये आणखी कपात केली असून गाईच्या दुधाचे प्रति लिटर १७ ते २० रुपये केले आहेत. यामुळे याचा फटका दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना बसतो आहे.  दुधाचे दर घटवून खरेदी केलेल्या दुधाच्या विक्री दरात कोणताही बदल केलेला नाही. मध्यस्थांचे कमिशन, वाहतूक, प्रक्रिया, याचा विचार केला तर प्रति लिटर जास्तीत जास्त आठ ते दहा रुपये खर्च होतो. "अमूल'' दूध संस्था २७ रुपयांने दूध खरेदी करते. दुधाचे दर कमी करणे ही बाब गंभीर आहे. असे असतानादेखील सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. दूध खरेदी दरात वाढ केली नाही तर शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या वेळी दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com