agriculture news in Marathi cow milk rate cut by 8 rupees within month Maharashtra | Agrowon

महिनाभरातच गाईच्या दूधदरात ८ रुपये कपात 

सुर्यकांत नेटके
मंगळवार, 11 मे 2021

कोरोना लॉकडाउनमुळे दुधाची मागणी कमी झाल्याचे सांगत दूध संघाकडून गाईच्या दुधाच्या दरात टप्प्याने प्रतिलिटर आठ रुपयांची कपात केली आहे. 

नगर ः कोरोना लॉकडाउनमुळे दुधाची मागणी कमी झाल्याचे सांगत दूध संघाकडून गाईच्या दुधाच्या दरात टप्प्याने प्रतिलिटर आठ रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे साधारण महिनाभरापूर्वी वाहतुकीसह मिळणारा ३१ ते ३२ रुपये दर २५ रुपये केला आहे. परिणामी, शेतकऱ्यांच्या हातात केवळ २२ रुपये पडत आहेत. लॉकडाउनची संधी साधत व्यापाऱ्यांनी आधीच शेतीमालाचे दर पाडले असताना आता मुख्य जोडधंदा असलेल्या दूध व्यवसायातही शेतकऱ्यांना फटका बसत आहे. 

कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने दर कमी केल्याचे दूध संघाकडून कारण सांगितले जात आहे. दुधाचे दर कमी झाले असताना त्याउलट पशुखाद्याच्या दरात मात्र वाढ झाल्याने दुधाचा उत्पादन खर्च वाढल्याने शेतकरी मात्र मेटाकुटीला आले आहेत. गेल्या वर्षीच्या संकटातून सावरत असताना पुन्हा एकदा दूध उत्पादकांना तोट्याचे दिवस आले आहेत. दुधाचे दर कमी केल्याने सध्या राज्यातील दूध उत्पादकांना दररोज सुमारे दहा ते अकरा कोटींचा तोटा सोसावा लागत आहे. 

राज्यात गायीचे १ कोटी ४० लाख लिटर दूध संकलित होते. त्यातील ६० ते ६५ लाख लिटर दूध थेट ग्राहकांना पिशव्यांमधून विकले जाते तर साधारण वीस लाख लिटर दुधाचे उपपदार्थ केले जातात. उर्वरित दुधाची भुकटी होते. गेल्या वर्षी कोरोना संसर्ग सुरू झाल्यानंतर लॉकडाउन झाल्याने दुधाची मागणी कमी झाल्याचे तसेच भुकटीचे दरही कमी झाल्याने दुधाच्या दरात कमालीची घट झाली होती. काही महिने तोटा सहन केल्यानंतर दुधाच्या दरात वाढ झाली. गेल्या दीड महिन्यापूर्वी साधारण ३.५ फॅट व ८.५ एफएनएस असलेल्या गाईंच्या दुधाला प्रती लिटर ३१ ते ३२ रुपयांपर्यंत दर मिळत होता. 

मात्र लॉकडाउनची चर्चा सुरू झाली, की लगेच मागणी घटल्याचे सांगत प्रती लिटर तीन ते चार रुपयांनी कपात केली. त्यात वाढ करत आता महिनाभरात तब्बल प्रति लिटरमागे ७ ते ८ रुपयांनी कपात केल्याचे दिसत आहे. तसे पत्र काही खासगी संघांनी काढले आहे. सध्या साधारण ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ असलेल्या गाईच्या दुधाला वाहतुकीसह २५ रुपयांचा दर देत असल्याचे जाहीर केले आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या हातात केवळ २२ रुपये लिटरने पैसे पडत आहेत. त्यातही सदर दुधात एसएनएफच्या ३४.५ टक्के प्रोटीन बंधनकारक आहे. 

‘‘आता कुठे सावरत असलेला दूध व्यवसाय पुन्हा अडचणीत येते आहे. त्यामुळे सरकारने लक्ष घालून धोक्यात येत असलेला दूध व्यवसाय वाचवण्यासाठी लक्ष घालण्याची गरज आहे,’’ अशी अपेक्षा दूध उत्पादक शेतकरी नंदकुमार रोकडे यांनी व्यक्त केली आहे. 

पशुखाद्याचे दर वाढले 
दुधाचे दर कमी झाले असतानाच पशुखाद्याचे दर मात्र वाढले आहेत. साधारण दोन महिन्यांपूर्वी सरकी पेंडेची पन्नास किलोची बॅग १३०० रुपयांना मिळत होती. ती आता १६५० रुपयांना झाली आहे. भुश्‍शाची पन्नास किलोची बॅग १०५० रुपयांना मिळत होती. ती आता ११५० रुपयांना झाली आहे. तर कांडी पेंडीची ५० किलोची बॅग १०८० रुपयांना मिळत होती, ती आता ११५० रुपयांना झाली आहे. मका पावडरीची ५० किलोची बॅग ८२० रुपयांना मिळत होती, ती आता ९२० रुपयांना झाली आहे. त्यामुळे एकीकडे दुधाचे दर वाढलेले असताना दुधाचा उत्पादन खर्च वाढला आहे. 

दररोज अकरा कोटींचा फटका 
राज्यात दररोज संकलित होणाऱ्या गाईच्या १ कोटी ४० लाख लिटर दुधाचे दर प्रती लिटरला सात ते ८ रुपयांना कमी केले आहेत. त्यामुळे थेट दूध उत्पादक शेतकऱ्यांना दररोज सुमारे १० ते ११ कोटींचा फटका बसत आहे. संकलित केलेल्या दुधातून राज्यात साधारण रोज 65६५ लाख लिटर पिशवीबंद दुधाची विक्री केली जाते. तेही टोन्ड दूध विकले जाते. मात्र प्रति लिटरचा दर पन्नास रुपयांच्या जवळपास आहे. विक्रीचे दर मात्र कमी केले जात नसताना शेतकऱ्यांकडून निम्म्या दरानेही खरेदी होत नाही. खासगी संघांनी दर कमी केल्यानंतर सहकारी संघही दुधाच्या दरात कपात करू लागले आहे. 


इतर बातम्या
रत्नागिरीत पूर ओसरला, सावरण्याची धडपड ...रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून पूर...
विदर्भात ६६ हजार हेक्‍टरवरील पिकांचे...नागपूर : विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात शनिवारी (ता...
मराठवाड्यातील प्रकल्पांच्या जलसाठ्यात...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७९ लघू, मध्यम, मोठ्या...
स्मार्ट तंत्रज्ञानाने मेंदू बथ्थड होत...आधुनिक तंत्रज्ञानामुळे माणूस बथ्थड, मूर्ख होत...
कोल्हापुरात ६३ हजार हेक्टर पिकांना फटकाकोल्हापूर : जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे सुमारे...
दोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसानपुणे : राज्यातील बहुतांश भागांत पावसाने उघडीप...
मका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा...शिरपूर, जि. धुळे : जिल्ह्यात अनेक भागांत मका...
कोकणात पावसाची शक्यता पुणे : बंगालचा उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
परभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके...परभणी ः अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे परभणी...
केंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण...रायगड/रत्नागिरी : ‘‘तळिये गावात पंतप्रधान आवास...
कोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी...कोल्हापूर : सलग दुसऱ्या दिवशी पावसाने विश्रांती...
शेतकरी संसदेत आज ‘महिला राज’ नवी दिल्ली ः मोदी सरकारचे तीन कृषी कायदे रद्द...
समृद्धीला समांतर बुलेट ट्रेनचा मार्ग बुलडाणा : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गालगतच आता...
नगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन नगर : नगर जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी आता उरकली आहे...
आंदोलनादरम्यान एकही शेतकरी मृत्यूची...नवी दिल्ली ः केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात...
साताऱ्यात भूस्खलनात आतापर्यंत ३२ जणांचा...सातारा : गेल्या तीन चार दिवसांपासून जिल्ह्यात...
थेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘...अमरावती : विमा कंपनीच्या प्रतिनिधीने खोटी माहिती...
सर्वंकष आढावा घेऊन नुकसान भरपाई जाहीर...रत्नागिरी : ‘‘तुम्हाला पायावर उभे करण्यासाठी...
आवक कमी दाखवून बाजार समितीची फसवणूक पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळे,...
नदीकाठावरील ऊस वाहून गेलानेर्ले, जि. सांगली : बहे रामलिंग बेटाच्या...