agriculture news in Marathi cow milk rate reduced in state Maharashtra | Page 2 ||| Agrowon

राज्यात गाईच्या दूध खरेदी दरात कपात 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

राज्यातील बहुतांश संघांनी एकत्र येऊन दुधाच्या दरात दोन दिवसांपासून पुन्हा कपात केली आहे. तशा सूचना दूध संकलन केंद्र चालकांना दिल्या आहेत. 

नगर ः लॉकडाऊन उघडल्यानंतर दुधाची मागणी वाढल्यावर दरातही हळू हळू वाढ केली. मात्र काही दूध संघाचा अपवाद वगळता राज्यातील बहुतांश संघांनी एकत्र येऊन दुधाच्या दरात दोन दिवसांपासून पुन्हा कपात केली आहे. तशा सूचना दूध संकलन केंद्र चालकांना दिल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारा दर २५ ते २७ रुपयांवरून आता २२ ते २३ रुपये प्रती लिटरवर आला आहे. २१ आक्टोबरपासून ही कपात लागू करण्यात आली आहे. 

महाराष्ट्र डेअरी वेलफेअर असोसिएशन यांचे नाव असलेले व त्यात राज्यातील सोळा दूध संघाच्या नावाचा उल्लेख असलेले पत्र दोन दिवसांपासून सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. त्या पत्रात ३.५ फॅट व ८.५ एफएनएस असलेले गाईंचे दूध वाहतूक व कमिशनसह २४ रुपयापर्यंत प्रतिलिटर दराने खरेदी करावे असे नमुद केले असून त्यात दूध दर खरेदीचा तक्ताच मांडलेला आहे. त्यामुळे मागणी असताना व दूध पावडरचे दर वाढलेले असतानाही दूध दरात कपात केल्याने पुन्हा एकदा हा व्यवसाय अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. 

दूध तपासणीचे काय झाले? 
कल्याणकारी दूध संघाचे अध्यक्ष गुलाबराव डेरे म्हणाले, की राज्यातील विविध भागातून मुंबई, पुण्याला येणाऱ्या दुधात मोठ्या प्रमाणात भेसळ होते. याबाबत सरकारला पत्र लिहिल्यानंतर दुधाची नियमित तपासणी केली जाईल, असे दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांनी सांगितले होते. मात्र अजून कोठेही तपासणी होत नाही. मागणी असतानाही दर कमी करणे म्हणजे शेतकऱ्यांची जाणीवपूर्वक पिळवणूक आहे. 

प्रतिक्रिया
गेल्या सहा महिन्यांपासून दुधाला दर नसल्याने मोठा आर्थिक फटका सोसावा लागला आणि तोट्यात व्यवसाय केला. आता कुठे महिनाभरापासून दुधाला दरवाढ मिळू लागली असताना पुन्हा दर कमी केले. दूध व्यवसाय मोडायचाच हा एक प्रकार दिसतोय. दूध शेतकऱ्यांची लुट थांबली पाहिजे. 
- नंदू रोकडे, दूध उत्पादक शेतकरी, खडकी ता. नगर 
  
अगोदरच लॉकडाऊनचा बाऊ करून या कंपन्यांनी शेतकऱ्यांना गेली चार सहा महिने प्रचंड लुटले आहे. आता दुधाची मागणी पूर्वपदावर आली आहे. दूध पावडरचे दरही पूर्ववत होत आहेत. दसरा, दिवाळी येऊ घातल्याने दुधाची मागणी आणखी वाढणार आहे. यामुळे दुधाचे खरेदी दर वाढणे अपेक्षित आहे. कंपन्या मात्र खरेदी दर कमी करणार असतील तर शेतकरीही त्याला जशास तसे उत्तर देतील. 
- डॉ. अजित नवले, राज्य सरचिटणीस, किसान सभा, महाराष्ट्र 


इतर अॅग्रो विशेष
पानांचे दर दबावात; उत्पादकांना फटकासांगली : गेल्या आठ महिन्यांपासून बाजारपेठेत...
खानदेशात ‘सीसीआय’कडून २५ हजार क्विंटल...जळगाव ः खानदेशात कापूस महामंडळाकडून (सीसीआय)...
‘कार्तिकी’च्या काळात पंढरपूरसह ...सोलापूर : यंदा कार्तिकी यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर...
‘महाबीज’चे कर्मचारी जाणार सात...अकोला ः सातवा वेतन आयोग, पाच दिवसांचा आठवडा यांसह...
खाद्यतेल आयातीत १२ टक्के घटपुणे ः देशात २०१९-२० (नोव्हेंबर ते ऑक्टोबर) मध्ये...
कृषी सचिवांच्या गावातील शेतकऱ्यांचा कल...अकोला ः राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांच्या...
पूर्वहंगामी द्राक्षाला २०० कोटींचा फटकानाशिक : यंदा पूर्वहंगामी द्राक्ष हंगामाच्या...
शासकीय योजनांच्या विहिरींमुळे वाढतोय...मालेगाव, जि. वाशीम ः  जिल्हा परिषद, कृषी...
दहिगावात दोन एकरांतील कापूस नेला चोरूनअकोला ः यंदा शेतशिवारात सर्वच पिकांची उत्पादकता...
मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाची...पुणे ः राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ वातावरण...
चटणी, मसाल्याचा बनविला ब्रॅण्डकोल्हापूरची खाद्य संस्कृती म्हटलं की, तिखटाबरोबर...
शेती, आरोग्य अन् महिला विकासाची शक्तीगोमेवाडी (ता. आटपाडी, जि. सांगली) येथील ग्रामीण...
भार व्यवस्थापनाचे बळीजालना जिल्ह्यातील पळसखेडा पिंपळे येथील तिघे...
ढगाळ वातावरणामुळे तूर पीक संकटातऔरंगाबाद : गत तीन-चार दिवसांपासून सतत ढगाळ...
मराठवाड्यात नुकसानग्रस्तांना ९३६ कोटी...औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा जून ते ऑक्टोबर या...
शेतीला तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने ...मुंबई :  सर्व कृषी ग्राहकांना तीन वर्षांत...
काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यतापुणे ः पश्‍चिम मध्य प्रदेश, उत्तर मध्य महाराष्ट्र...
नीलक्रांतीसाठी राज्यात २० हजार कोटी...पुणे ः मत्स्योत्पादनात वाढ, मूल्यवर्धन, निर्यात,...
ढगाळ वातावरणाने वाढविली चिंतापुणे : राज्यात ढगाळ हवामान आणि पडणारा हलका ते...
चांगल्या बाजारभावासाठी ‘एनसीडीईएक्स’चा...शेतकऱ्यांसाठी दराचे संरक्षण (प्राइज इन्शुरन्स)...