agriculture news in marathi, Cowboy made Safety armor for tiger attack | Agrowon

वाघोबाच्या आक्रमणाला गुराख्याच्या कल्पक चिलखताचे आव्हान
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 डिसेंबर 2017

यवतमाळ : राळेगाव तालुक्‍यात नरभक्षक वाघाने आतापर्यंत नऊ जणांचा बळी घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांसह शेतमजूर शेतात व जंगलात जाण्यासाठी धजावत नाहीत. उदरनिर्वाहासाठी काम केल्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याने गुराख्याने संरक्षणासाठी टाकाऊ वस्तूंपासून चिलखत बनविले आहे.

यवतमाळ : राळेगाव तालुक्‍यात नरभक्षक वाघाने आतापर्यंत नऊ जणांचा बळी घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांसह शेतमजूर शेतात व जंगलात जाण्यासाठी धजावत नाहीत. उदरनिर्वाहासाठी काम केल्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याने गुराख्याने संरक्षणासाठी टाकाऊ वस्तूंपासून चिलखत बनविले आहे.

शंकर आत्राम असे शेतकऱ्याचे नाव आहे. राळेगाव, पांढरकवडा, मारेगाव आदी तालुक्‍यांत वाघाची दहशत आहे. नऊ जणांचा बळी घेणाऱ्या वाघाला जेरबंद करण्यात वन विभागाला अद्याप यश आले नाही. राळेगाव तालुक्‍यातील बोराटी येथील शंकर आत्राम या गुराख्याने जंगलात जाताना वाघाच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी घरगुती साहित्यातून चिलखत तयार केले आहे. हे चिलखत संरक्षणासह कौतुकाचा विषय ठरत आहे.

आत्राम हे गेल्या २५ वर्षांपासून गुराखी म्हणून काम करीत आहे. अनेकदा त्यांच्या जंगलातील वन्यप्राण्यांसोबत आमना-सामना झाला. तीन वेळा व्याघ्रदर्शन झाले. आता मात्र, वाघाकडून होणाऱ्या हल्ल्यामुळे आत्राम हादरून गेले. पशुधनाला घेऊन जंगलात जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे स्वतःचे संरक्षण करण्यासाठी घरगुती टाकाऊ वस्तूंपासून चिलखत तयार केले आहे. चिलखत घालूनच गुराख्याची घरातून जंगलाकडे होणारी ‘एंट्री’ वाघाला आव्हान देणारी ठरत आहे. युक्तीतून बचावाच्या संदेशाची चर्चा तालुक्‍यात होत आहे.

टाकाऊ वस्तूंचा वापर
छाती व शरीराच्या पाठीमागचा भाग तेलाच्या खाली पिंपापासून तयार केला आहे. वाघ सर्वांत आधी गळ्याला पकडतो. यातून बचावासाठी लोखंडी पत्र्याचा एक पट्टा तयार केला आहे. शंकर छाती व मानेवरील पट्याला कुलूप लावतो. जेणे करून एखाद्या धक्‍क्‍याने ते निघून जाऊ नये. दोन्ही कुलपांची किल्ली पिशवीत ठेवतो. कंबरेखालील भागाच्या संरक्षणासाठी तारांपासून हाप पॅंट तयार केली आहे. डोक्‍यात जुने हेल्मेट घालतो. टाकाऊ वस्तूंचा लीलया वापर करून चिखलत बनविले. ते परिधान केल्यानंतर जणू काही योद्धाच आपल्यापुढे उभा आहे, असा अनुभव अनेकांना येत आहे.

जंगलक्षेत्रात वाघाची दहशत आहे. रोज सकाळी गावातील पशुधन घेऊन सकाळी दहाला जंगलाकडे निघतो. सायंकाळी सहाला पशुधनाला घेऊन गावाकडे येतो. चिलखत तयार केल्याने वाघाची भीती वाटत नाही.
- शंकर आत्राम, रा. बोराटी, ता. राळेगाव

 

इतर बातम्या
बीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९...उस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम...
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
वनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा...कडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...
कर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव  : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....
पुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे  ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...
कुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...
रासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली  : आगामी विधानसभा निवडणुकीत...
मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे  ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...
अकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला  ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...
कऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा  : महापुरामुळे...
गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली  ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...
शेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे  : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...
वारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...
जालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...
दर्जाहीन शिक्षण संस्थांवर कारवाई होणार...पुणे: राज्यात दर्जाहीन कृषी महाविद्यालये...
अवर्षणप्रवण, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत...अकोला ः राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्र,...
महिनाअखेरीस पावसाला पोषक हवामानपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला राज्यात दमदार...