agriculture news in marathi, cows and buffaloes chromosomes bank will set up soon, pune, maharashtra | Agrowon

गायी आणि म्हशींच्या गुणसूत्रांची बॅंक उभारणार
गणेश कोरे
रविवार, 16 जून 2019

पुणे ः  गायी, म्हशींच्या आनुवंशिक सुधारणा कार्यक्रमांतर्गत एक लाख चार हजार जातिवंत दुधाळ जनावरांचा डेटा संकलित झाला आहे. यातून गायी, म्हशींच्या १५ जातींची गुणसूत्र बॅंक उभारण्यात येणार आहे. यासाठी  जेनोमिक्स तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. या माध्यमातून अधिक दूध देणाऱ्या गायी, म्हशींची पिढी विकसित करण्यास मदत होईल. पुढील वर्षी गुणसूत्र बॅंक तयार होत असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली. 

पुणे ः  गायी, म्हशींच्या आनुवंशिक सुधारणा कार्यक्रमांतर्गत एक लाख चार हजार जातिवंत दुधाळ जनावरांचा डेटा संकलित झाला आहे. यातून गायी, म्हशींच्या १५ जातींची गुणसूत्र बॅंक उभारण्यात येणार आहे. यासाठी  जेनोमिक्स तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. या माध्यमातून अधिक दूध देणाऱ्या गायी, म्हशींची पिढी विकसित करण्यास मदत होईल. पुढील वर्षी गुणसूत्र बॅंक तयार होत असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली. 

मिश्रा म्हणाले की, जगात दूध उत्पादनात अग्रेसर असलेल्या न्यूझीलंड, डेन्मार्क, नेदरलॅंड, स्वीडन, अमेरिका आदी देशांमध्ये गायींची गुणसूत्र बॅंक विकसित करण्यात आली आहे. यामुळे हे देश जनावरांची संख्या कमी असूनदेखील गुणवत्तापूर्ण दूध उत्पादनात अग्रेसर आहेत. भारतासह राज्यातील पशुधनाची संख्या कमी होत असताना गायी, म्हशींमध्ये आनुवंशिक सुधारणा करणे आवश्‍यक आहे. यासाठी हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. सध्या पशुपालक गोठ्यातील गायी, म्हशींच्या दूध देण्याच्या अंदाजावर तिची कालवड किंवा नर वासराचे संगोपन करतात. मात्र, हे सगळे अंदाजावरच सुरू आहे.

मात्र, आता भविष्यात दर्जेदार रेतमात्रा देऊन जातिवंत कालवड किंवा नर जन्मण्यासाठी ही बॅंक उपयोगी पडणार आहे. या बॅंकेमध्ये गुणसूत्रांचा अभ्यास करून जास्त दुधासाठी उपयुक्त असलेल्या १५ जोड्या असलेले गुणसूत्र रेतमात्रेच्या माध्यमातून गाय, म्हशींच्या कृत्रिम रेतनासाठी दिले जाणार आहे. यामुळे तयार होणारी कालवड ही अधिक दूध उत्पादन देणारी असणार आहे. तसेच, भविष्यात जास्त दूध देणाऱ्या गायी, म्हशींची पैदास पशुपालकाच्या गोठ्यात वाढण्यास मदत होईल.

आनुवंशिकता तपासण्याचा कालावधी तीन वर्षांवर 
वळू तसेच गायी, म्हशींच्या आनुवंशिकतेतून जातिवंत दुधाळ जनावर शोधण्याचा कालावधी हा पूर्वी आठ ते दहा वर्षांचा होता. या कालावधीमध्ये सुमारे दोन हजार गायी, म्हशींवर प्रयोग करून त्यामधील ४०० कालवडींचा अभ्यास केला जातो. या अभ्यासातून दुधाळ कालवडीची निवड करावी लागते. नवीन तंत्रज्ञानामुळे हा कालावधी आता केवळ तीन वर्षांवर येणार असल्याने भविष्यात जातिवंत दुधाळ गायी, म्हशी पशुपालकांना लवकर उपलब्ध होतील. यामुळे दूध उत्पादनातदेखील वाढ होणार असल्याचा विश्‍वास आयुक्त मिश्रा यांनी व्यक्त केला.  

इतर अॅग्रो विशेष
परीक्षा शुल्क परतीचा खर्च सात लाख रुपयेयवतमाळ ः परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे पैसे...
दुबार पेरणीसाठी सरकारची तयारीः डाॅ....पुणे: पावसाचा काही प्रमाणात खंड पडला आहे....
डोणगावात होणार खजूर लागवडअकोला ः पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यासाठी...
रक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळनाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह...
असंमत बियाणे लागवडीला बोंडअळी कारणीभूत...नवी दिल्ली : देशात २०१८ मध्ये गुलाबी...
दुष्काळामुळे द्यावा लागणार पाणी...पुणे ः सततच्या दुष्काळामुळे आता पाणी...
पीक पोषणात महत्त्वाची अन्नद्रव्ये पिकांच्या सुदृढ वाढीसाठी १८ अन्नद्रव्यांची...
मिल्क केक बनविण्याची प्रक्रियामिल्क केक हा दिसायला कलाकंदप्रमाणे असला तरी...
मराठवाड्यात ठिकठिकाणी हलक्या ते जोरदार...पुणे ः राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार...
सोयाबीनवरील कीडीची ओळख सोयाबीन हे राज्यातील महत्त्वाचे पीक असून, त्यावर...
नांदेड जिल्ह्यात अन्नधान्य पिकांच्या...नांदेड : जिल्ह्यात गुरुवारपर्यंत (ता. १८) ६ लाख...
एकाच गावातील ७५० एकरांत ७५०० कामगंध...जालना : गतवर्षी नियंत्रण मिळविलं म्हणून कपाशीवरील...
जलसंधारणाचा खामगाव पॅटर्न देशभरात जाणारअकोला ः राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना त्यासाठी...
कृत्रीम शीतपेयांना शोधला कोकणी नैसर्गिक...कोकणातील निसर्गरम्य कोळथर (ता. दापोली, जि....
फुलांनी आणला आयुष्यात बहर, अॅग्रोवनची...पुणे जिल्ह्यात रुई येथील सुहास लावंड यांनी...
जलव्यवस्थापनातील हुशारीतून फुलतेय ...दुष्काळाशी लढताना औरंगाबाद जिल्ह्यातील गाढेजळगाव...
दुष्काळातही कडवंची गावच्या अर्थकारणाची...भूगर्भीय सर्वेक्षण आधारित पाणलोटाची कामे, मृद...
मातीची सुपीकता टिकविणे आव्हानात्मक: डॉ...कोल्हापूर : कोल्हापूर विभागात मातीची सुपीकता...
साखर कारखान्यांना कर्ज न देणाऱ्या...मुंबई: आगामी हंगामासाठी साखर कारखान्यांना...
कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्याचा करारअकोला ः  केंद्र शासनाची पंतप्रधान कौशल्य...