Cows with crop loan in Solapur, Loans will also be available for buffaloes
Cows with crop loan in Solapur, Loans will also be available for buffaloes

सोलापुरात पीककर्जाबरोबर गायी, म्हशींसाठीही मिळणार कर्ज

पीककर्जाबरोबर दुभत्या जनावरांसाठीही सुविधा आहे. शेतकऱ्यांनी आपापल्या गावातील बँकांमध्ये अर्ज करावे. त्यांच्या मागणीनुसार कर्जाची सुविधा उपलब्ध आहे. अडचण असल्यास संपर्क करावा. - संतोष सोनवणे, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, सोलापूर.

सोलापूर  ः जिल्ह्यात पीक कर्जाबरोबरच आता पशुपालकांनाही कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी देशी गाय, म्हशीसाठी १७ हजार ४६० रुपये, संकरित गाय, म्हृशीसाठी २० हजार २५० रुपयांचे, तर शेळीसाठी २७०० रुपयांचे कर्ज खेळते भांडवल म्हणून देण्यात येणार आहे. तीन ते सहा महिन्यांच्या मुदतीचे ही कर्जे आहेत. त्यासाठी ७ टक्के व्याज आकारले जाणार आहे. 

दरवर्षीच्या पतआराखड्यात शेतीला प्राधान्य दिले जाते. त्यात शेतीसाठी पीकर्जाबरोबर पूरक उद्योगालाही अधिक महत्व दिले जाते. त्यानुसार यंदाही खरीप हंगामात पीक कर्जाबरोबरच आता पशुपालकांना जनावरांचा सांभाळ करण्यासाठी कर्जे देण्यात येणार आहेत. राष्ट्रीय बँका, जिल्हा बँकेतून ही कर्जे उपलब्ध असतील. जनावरे, शेळ्यांबरोबरच कुक्कटपालन एक हजार कोंबड्यांसाठीही कर्जाची सुविधा आहे. यामध्ये गावरानसाठी १ लाख ५१ हजार, बॉयलरसाठी १ लाख ६६ हजार रुपये देण्यात येतील. 

परतफेडीचा कालावधी ४५ दिवसांचा ठेवण्यात आला आहे. मत्स्य व्यवसायासाठीही कर्जाची सुविधा आहे. यामध्ये प्रति १० गुंठेसाठी २९ हजार ६०० रुपयांचे कर्ज दिले जाईल. औषधी वनस्पतीसाठी प्रतिहेक्टरी ७५ हजार रुपये देण्यात येतील.  इथे करा अर्ज 

जिल्हा अग्रणी बँकेने कर्जासाठी ऑनलाइन कर्जमागणीची सुविधा दिली आहे. त्यासाठी nicsolapur.in या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध आहेत. पशुपालकाकडे उपलब्ध पशुधन, त्यांची खरेदीपावती, डॉक्टरांचे प्रमाणपत्र, आधार कार्ड व पॅन क्रमांक ही कागदपत्रे लागतील. त्यानुसार पीककर्ज वा पूरक उद्योगासाठी अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com