Agriculture News in Marathi Cow's milk in the state Increase in purchase price | Page 2 ||| Agrowon

राज्यात गायीच्या दुधाच्या  खरेदीदरात वाढ 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 नोव्हेंबर 2021

राज्यातील खासगी डेअरीचालकांना गायीच्या दुधाच्या खरेदीदरात दोन रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे दुधाला बहुतेक डेअरी प्रकल्पांकडून प्रति लिटर २६ रुपयांपर्यंत दर दिला जात आहे, अशी माहिती डेअरी उद्योग सूत्रांनी दिली. 

पुणे ः राज्यातील खासगी डेअरीचालकांना गायीच्या दुधाच्या खरेदीदरात दोन रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे दुधाला बहुतेक डेअरी प्रकल्पांकडून प्रति लिटर २६ रुपयांपर्यंत दर दिला जात आहे, अशी माहिती डेअरी उद्योग सूत्रांनी दिली. 

कोल्हापूर, सांगली भागांत या पूर्वीच दुधाच्या खरेदी दरात वाढ होऊन ती प्रति लिटर २७ रुपयांपर्यंत गेली होती. अलीकडेच दूध भुकटी व लोण्याचे भाव वधारल्यानंतर दुधाच्या दरात वाढ करण्यास वाव आहे, अशी चर्चा खासगी डेअरी चालकांमध्ये सुरू झाली. त्यामुळे एक बैठक घेत सर्व खासगी प्रकल्पांनी एकत्रितपणे दूधदर वाढीवर शिक्कामोर्तब केले. परिणामी, प्रति लिटर २३ ते २४ रुपये असलेला दुधाचा खरेदीदर २१ नोव्हेंबरपासून २६ रुपयांपर्यंत गेला आहे. 

अजून दरवाढीची शक्यता 
राज्य शासनाच्या दुग्धविकास सल्लागार समितीचे सदस्य प्रकाश कुतवळ यांनी सांगितले, ‘‘शेतकऱ्यांच्या दुधाचे दर कमी होण्याची भीती दिवाळीपूर्वी वाटत होती. सुदैवाने तसे काही घडले नाही. भुकटी व लोण्याला चांगले दर मिळत असल्याने दूध खरेदीदरात २६ रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. दुधाच्या वाढत्या दराला खासगी व्यावसायिकांमधील स्पर्धा कारणीभूत आहे.’’ 

दुधाचे दर आणखी वाढण्यास पूरक स्थिती असल्याचे डेअरी उद्योगाला वाटते. राज्यात खासगी दूध प्रकल्पांकडून ७० टक्के दुधाची खरेदी केली जाते. आमच्या मते अजून दोन रुपयांनी वाढ होण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही. दुधाला दर चांगले मिळत असल्याने शेतकऱ्यांकडून दुभत्या जनावरांना पशुखाद्य देण्याचे प्रमाण वाढेल. परिणामी, एकूण दूध उत्पादन देखील वाढू शकेल. 

परराज्यांतून येणाऱ्या दुधामुळे स्थानिक प्रकल्पांना स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे. ‘‘मदर डेअरी व नंदिनीमुळे परराज्यांतून दूध येते व परिणामी स्थानिक दूध उत्पादकांचे दूध खरेदी पूर्ण क्षमतेने करता येत नाही,’’ असा मुद्दा चितळे डेअरी उद्योग समूहाचे संचालक श्रीपाद चितळे यांनी मांडला आहे. दरम्यान, राज्य शासनाच्या दुग्धविकास सल्लागार समितीची बैठक अलीकडे झालेली नाही. बैठक झाल्यास दुग्ध प्रकल्पांसमोरील अडचणींची चर्चा होऊ शकते. अर्थात, त्यासाठी ‘महानंदा’ने पुढाकार घ्यायला हवा, असे मत एका डेअरीचालकाने व्यक्त केले. 

मागणी पूर्ण क्षमतेने नाहीच 
श्रीपाद चितळे म्हणाले, ‘‘परिस्थिती योग्य दिसताच शेतकऱ्यांच्या दुधाला जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न राज्यातील खासगी दुग्ध प्रकल्पांचा असतो. अर्थात, दुधाचे दर वाढलेले असले तर डेअरी उद्योगाला अद्यापही हवी तशी बाजारपेठ प्राप्त झालेली नाही. कोरोनाच्या कालावधीत मागणी कोसळून बाजार व्यवस्था विस्कळीत झाली आहे. काही महिन्यांपूर्वीपर्यंत दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीतील घट ३० टक्क्यांपर्यंत होती. ही घट अजूनही १५ टक्क्यांपर्यंत दिसते आहे.’’ 

प्रतिक्रिया

राज्यात दुधाच्या खरेदीपोटी दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर २६ रुपयांपर्यंत दर देण्याचा निर्णय सर्वच खासगी डेअरी प्रकल्पांनी घेतला आहे. दुध भुकटी आणि लोण्याचे बाजारभाव तेजीत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दुधाचे सुधारलेले दर स्थिरावण्यास उत्तम स्थिती आहे. 
-श्रीपाद चितळे, संचालक, चितळे डेअरी उद्योग समूह


इतर बातम्या
मेळघाटच्या स्ट्रॉबेरीची पर्यटकांना भुरळचिखलदरा, जि. अमरावती : महाबळेश्वरच्या धर्तीवर...
नागपूर जिल्ह्यात एक कोटी ६३ लाखांचा...नागपूर : लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने...
शेतजमिनीची कर्जे माफ करा;...कुरुंदवाड, जि. कोल्हापूर ः कर्मवीर दादासाहेब...
सांगली बाजार समितीला पुन्हा मिळाली...सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीसह सात...
अकोल्याचा सर्वसाधारण योजना नियतव्यय २००...अकोलाः जिल्ह्याच्या २०२२-२३ च्या सर्वसाधारण...
जवान अन् किसान देशाचे आधारस्तंभ:छगन...नाशिक: सैनिक जसे देशाचे रक्षण करतात, तसेच...
नाशिक: श्रमदान, लोकसहभागातून तीन दुर्गम...नाशिक: जिल्ह्याच्या पश्चिम भागातील आदिवासी...
यावल/फैजपूर, जि.जळगाव : हवामानमापक...यावल/फैजपूर, जि.जळगाव : तालुक्यात डिसेंबरमध्ये...
मंगळवेढ्यात मका खरेदी केंद्र सुरु, ...सोलापूर ः मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ...
जळगाव ः बोगस पशुवैद्यकांची यादी...जळगाव ः जिल्ह्यात बोगस डॉक्टर, बोगस पॅथॅलॉजी लॅब...
Top 5 News: रशिया-युक्रेन संघर्षाचा...1. सध्या पंजाबपासून झारखंडपर्यंत हवेचा कमी दाबाचा...
मोहरीच्या वायदेवापसीची मागणी का होतेय?वायदेबंदीला विरोध वाढतो आहे. मोहरीचे वायदे पुन्हा...
देशाची मोहरी क्रांतीकडे वाटचालपुणेः खाद्यतेल आणि पेंडच्या दरातील तेजीमुळे...
उत्तर भारतात मोहरी,हरभऱ्याला अवकाळीचा...अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे उत्तर भारतातील...
रब्बी पेरणीत मक्याचे वर्चस्ववृत्तसेवा - चालू रब्बी हंगामात (Rabbi Season...
कृषी ड्रोन खरेदीसाठी केंद्र सरकारचे...  कृषी क्षेत्रातील ड्रोनच्या (drone )...
यंदाच्या हंगामात इथेनॉलचा पुरवठा...वृत्तसेवा - इंधनाच्या आयातीवरील (Fuel Import)...
मस्त्यव्यावसायिकांनी शास्त्रशुद्ध...मस्त्यव्यवसाय क्षेत्राने देशांतर्गत गरजा...
भारत ठरला काकडीचा सर्वात मोठा...पुणे - भारत जगात काकडीची (Cucumber) निर्यात (...
किमान तापमानात घट शक्य पुणे : अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या बाष्पयुक्त...