Agriculture news in marathi Of cows from Shivamrit of Akluj Purchase rate of Rs. 25 for milk | Agrowon

अकलूजच्या शिवामृतकडून गाईच्या दूधाला २५ रुपये खरेदी दर

टीम अॅग्रोवन
शनिवार, 6 जून 2020

अकलूज, जि. सोलापूर : अकलूज येथील शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघाने गाईच्या दूध खरेदीसाठी २५ रुपये दर जाहीर केला आहे.

अकलूज, जि. सोलापूर : अकलूज येथील शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघाने गाईच्या दूध खरेदीसाठी २५ रुपये दर जाहीर केला आहे. शिवामृत दूध संघाचा हा निर्णय कोरोणामुळे अडचणीत असलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरला आहे. 

संघाचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखालील संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अन्य संघाच्या तुलनेत शिवामृत संघही अडचणीत आहे. पण, शेतकरी हितासाठी आम्ही हा निर्णय घेतल्याचे मोहिते पाटील यांनी सांगितले. 

मोहिते पाटील म्हणाले, ‘‘शिवामृतच्या विक्रीत सध्या ४० ते ५० टक्के घट झाली आहे. परंतु, दूध उत्पादक शेतकऱ्यांची सद्य परिस्थिती लक्षात घेता ३.५ /८.५ फॅट असणाऱ्या गाईच्या दूधास प्रति लिटर २५ रूपये खरेदी दर दिला जाणार आहे. या लॅाकडाऊनमुळे दुध व दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीमध्ये ५० ते ६० टक्के घट, तर दूध पावडर, बटर, तुपाच्या दरातही मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. खासगी डेअरी चालकांनी गाय दुधाचे दर १० ते १२ रुपये कमी करून २० ते २१ रुपये केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.’’ 

‘‘सध्या ७० टक्के खासगी व सहकारी दूध संघ पावडर प्लॅंटमध्ये सक्रिय होत आहेत. यामुळे पॅकिंग दूधालाही मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे. तरीही आम्ही हा निर्णय घेतला. लवकरच एनडीडीबीच्या माध्यमातून दूध पावडर प्लॅंट व पशुखाद्य प्लॅंटची उभारणी करण्यात येणार आहे’’, असेही मोहिते पाटील यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष सावता ढोपे, कार्यकारी संचालक रविराज इनामदार देशमुख, सेक्रेटरी प्रदिप पवार आदी उपस्थित होते. 
 


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...
सांगली जिल्ह्यात खते, बियाण्यांच्या ६९...सांगली :‘कृषी विभागाने जिल्ह्यातील ६९ किटकनाशके,...
परभणी जिल्ह्यात आधार प्रमाणिकरणाचे २९...परभणी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सजीव प्रजातींची सर्वमान्य यादी...पृथ्वीवरील सर्व ज्ञात प्रजातींची जागतिक पातळीवर...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाणे न...नाशिक : खरिपाच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला....
वऱ्हाडात कृषी विक्रेत्यांचा कडकडीत बंदअकोला : सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
नाशिक जिल्ह्यात कृषी निविष्ठा...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवरील...
विदर्भात दहा हजार कृषी केंद्रांना टाळेनागपूर : कृषी विक्रेत्यांच्या न्याय्य...
पुणे जिल्ह्यात कृषी सेवा केंद्रे बंदपुणे : महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईड्स...
सोलापुरात कृषी सेवा केंद्रांचा बंद...सोलापूर : बियाणे उगवणीबाबत झालेल्या तक्रारीच्या...
‘जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अधिकारी, ...मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
थेट विक्री बंदीची नोटीस मागे घ्या,...पुणे ः शेतकऱ्यांना पुणे शहरात थेट शेतमाल विक्रीला...
हमाल कोरोनाग्रस्त, जळगावात खतांचे रेक...जळगाव ः मालधक्क्यावर रेल्वे रेक रिकामे करणाऱ्या...
भात रोपवाटिकेत खोडकिडीचा प्रादुर्भावऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये खरिपातील भात पीक...
परभणीत भेंडी १२०० ते २००० रुपये...परभणी : ‘‘येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
केळीवरील करपा रोगाचे नियंत्रणसध्या केळी पिकाच्या पील बागेत करपा रोगाचा...
वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे अधिक...अकोला ः खरिपातील पेरण्या अंतिम टप्प्यात पोचल्या...
औरंगाबादमध्ये निम्म्याच शेतकऱ्यांची मका...औरंगाबाद  : जिल्ह्यात आधारभूत किमतीने भरड...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील १२४ मंडळांत...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील...