संत्रा प्रक्रिया प्रकल्पाचा रोडमॅप तयार करा ः डॉ. बोंडे

संत्रा प्रक्रिया प्रकल्पाचा रोडमॅप तयार करा  ः डॉ. बोंडे
संत्रा प्रक्रिया प्रकल्पाचा रोडमॅप तयार करा ः डॉ. बोंडे

अमरावती  ः जिल्ह्यातील संत्रा प्रक्रिया प्रकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी रोडमॅपचे काम एका आठवड्यात पूर्ण करा, असे निर्देश कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिले.  अमरावती जिल्ह्यातील ठाणाठुणी येथे जैन एरिगेशन व कोकाकोल यांच्या सहकार्यातून संत्रा प्रक्रिया प्रकल्प पूर्णत्वास जात आहे. त्याचा आढावा कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी घेतला. या वेळी जैन एरिगेशनचे उपाध्यक्ष डॉ. के. बी. पाटील वरिष्ठ संशोधक डॉ. अनिल धाके, प्रकल्प प्रमुख विजय धाडीवाल, डॉ. विशाल निर्गुंडे, कोकाकोलाचे आदित्य पांडा उपस्थित होते. जिल्ह्यातील संत्रा प्रक्रिया प्रकल्पासाठी रोड मॅप तयार करण्याचे काम एका आठवड्यात व्हावे. संरक्षक भिंत बांधण्याचे काम व इतर आवश्‍यक कार्यवाही तातडीने पूर्ण करावी. या प्रक्रिया प्रकल्पाचा करार झाल्यापासून आत्तापर्यंतचा प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देशही कृषिमंत्र्यांनी या वेळी दिले. शेतकऱ्यांना करार शेतीसाठी प्रोत्साहित करण्यात यावे व त्यांना उत्तम शेती पद्धती, तंत्रज्ञानासाठी साह्य, जैविक खते, फार्महाउससारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यासही त्यांनी सांगितले. या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना विशिष्ट जातीची संत्रा रोपे पुरविण्यात येणार आहेत. त्याच्या लागवडीनंतर त्यापासून मिळणाऱ्या फळांवर प्रक्रिया करून संत्रा ज्यूस तयार होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com