खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या  कृषी केंद्रांवर कारवाई करा : विजय वडेट्टीवार

कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना वाढीव दराने खताची विक्री होत असल्याच्या तक्रारी येत आहे. अशा कृषी केंद्राची तपासणी करून दोषी आढळणाऱ्या रासायनिक खत विक्री केंद्रधारकावर तातडीने कारवाई करा.
कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या  कृषी केंद्रांवर कारवाई करा : विजय वडेट्टीवार Creating artificial scarcity Take action on agricultural centers: Vijay Vadettiwar
कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या  कृषी केंद्रांवर कारवाई करा : विजय वडेट्टीवार Creating artificial scarcity Take action on agricultural centers: Vijay Vadettiwar

चंद्रपूर : कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना वाढीव दराने खताची विक्री होत असल्याच्या तक्रारी येत आहे. अशा कृषी केंद्राची तपासणी करून दोषी आढळणाऱ्या रासायनिक खत विक्री केंद्रधारकावर तातडीने कारवाई करावी, असे निर्देश राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी कृषी विभागाला दिले.  ब्रम्हपुरी येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित युरिया खताबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी आमदार अभिजित वंजारी, जिल्ह्याधिकारी अजय गुल्हाणे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.  वडेट्टीवार म्हणाले, ‘‘केंद्र शासनाच्या धोरणानुसार रासायनिक खताचे वितरण एम-एफएमएस प्रणालीवर ई-पॉस मशीनवर करणे बंधनकारक असताना जिल्ह्यातील काही परवानाधारक रासायनिक खत विक्रेते ऑफलाइन स्वरूपात विक्री करत असल्यामुळे जिल्ह्याच्या पोर्टलवर युरिया खत शिल्लक दिसते. त्यामुळे खताच्या उपलब्धतेमध्ये अडचण होऊन युरिया खताची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात येत आहे. वाढीव दराने खताची विक्री तसेच अनावश्यक खत उत्पादनांची जबरदस्तीने शेतकऱ्यांना विक्री करणाऱ्या संबंधित परवानाधारक रासायनिक खत विक्री केंद्रधारकावर कायद्याप्रमाणे निलंबनाची कारवाई करणे आवश्यक आहे. त्यासाठी पुढील दोन दिवसांत कृषी केंद्राची तपासणी करून तसा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याकडे सादर करावा व दोषी आढळणाऱ्या परवानाधारक रासायनिक खत विक्री केंद्र धारकांवर तातडीने कार्यवाही करावी.’’ 

युरिया खताची टंचाई नाही : कृषी विभाग  चंद्रपूर जिल्ह्यात नियमितपणे युरिया व इतर खतांची उपलब्धता व पुरवठा होत राहील. जिल्ह्यात मुबलक प्रमाणात युरियाचा साठा उपलब्ध असून, शेतकऱ्यांनी काळजी करू नये. खरीप हंगाम २०२१करिता ५०,६९० टन युरिया कृषी आयुक्तालय, पुणे यांच्याकडून आवटंन मंजूर असून, १ एप्रिल ते १७ सप्टेंबर २०२१ पर्यंत जिल्ह्यात ४८,१२० टन म्हणजेच ९४.९२ टक्के युरियाची उपलब्धता झाली आहे. जिल्ह्यात ७९२५ मेट्रिक टन युरिया शिल्लक आहे. खरीप हंगाम २०२१ (३० सप्टेंबर २०२१) अखेर युरिया खताची ६०८३ टन उपलब्धता नियोजित आहे. १ ऑक्टोबर २०२१ पासून रब्बी हंगामास सुरुवात होत असून, चंद्रपूर जिल्हाकरिता २२,२४० टन युरिया खताचे आवंटन कृषी आयुक्तालयाने मंजूर केले आहे. त्यानुसार युरिया खताची जिल्ह्यात नियमित उपलब्धता असणार आहे. सद्यःस्थितीत खरीप हंगाम सुरू असून, भात, कापूस, सोयाबीन ही मुख्य पिके आहेत. जिल्ह्यात ४,४६,१०० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून आतापर्यंत ४,५५,५२१ म्हणजेच ९४.९३ टक्के क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे. जिल्ह्यात समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाली असून, विविध ग्रेडच्या रासायनिक खतांची पिकांना मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बराटे यांनी यावेळी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com