Agriculture News in Marathi Creating artificial scarcity Take action on agricultural centers: Vijay Vadettiwar | Agrowon

खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या  कृषी केंद्रांवर कारवाई करा : विजय वडेट्टीवार

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 सप्टेंबर 2021

कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना वाढीव दराने खताची विक्री होत असल्याच्या तक्रारी येत आहे. अशा कृषी केंद्राची तपासणी करून दोषी आढळणाऱ्या रासायनिक खत विक्री केंद्रधारकावर तातडीने कारवाई करा.

चंद्रपूर : कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना वाढीव दराने खताची विक्री होत असल्याच्या तक्रारी येत आहे. अशा कृषी केंद्राची तपासणी करून दोषी आढळणाऱ्या रासायनिक खत विक्री केंद्रधारकावर तातडीने कारवाई करावी, असे निर्देश राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी कृषी विभागाला दिले. 

ब्रम्हपुरी येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित युरिया खताबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी आमदार अभिजित वंजारी, जिल्ह्याधिकारी अजय गुल्हाणे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. 

वडेट्टीवार म्हणाले, ‘‘केंद्र शासनाच्या धोरणानुसार रासायनिक खताचे वितरण एम-एफएमएस प्रणालीवर ई-पॉस मशीनवर करणे बंधनकारक असताना जिल्ह्यातील काही परवानाधारक रासायनिक खत विक्रेते ऑफलाइन स्वरूपात विक्री करत असल्यामुळे जिल्ह्याच्या पोर्टलवर युरिया खत शिल्लक दिसते. त्यामुळे खताच्या उपलब्धतेमध्ये अडचण होऊन युरिया खताची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात येत आहे.

वाढीव दराने खताची विक्री तसेच अनावश्यक खत उत्पादनांची जबरदस्तीने शेतकऱ्यांना विक्री करणाऱ्या संबंधित परवानाधारक रासायनिक खत विक्री केंद्रधारकावर कायद्याप्रमाणे निलंबनाची कारवाई करणे आवश्यक आहे. त्यासाठी पुढील दोन दिवसांत कृषी केंद्राची तपासणी करून तसा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याकडे सादर करावा व दोषी आढळणाऱ्या परवानाधारक रासायनिक खत विक्री केंद्र धारकांवर तातडीने कार्यवाही करावी.’’ 

युरिया खताची टंचाई नाही : कृषी विभाग 
चंद्रपूर जिल्ह्यात नियमितपणे युरिया व इतर खतांची उपलब्धता व पुरवठा होत राहील. जिल्ह्यात मुबलक प्रमाणात युरियाचा साठा उपलब्ध असून, शेतकऱ्यांनी काळजी करू नये. खरीप हंगाम २०२१करिता ५०,६९० टन युरिया कृषी आयुक्तालय, पुणे यांच्याकडून आवटंन मंजूर असून, १ एप्रिल ते १७ सप्टेंबर २०२१ पर्यंत जिल्ह्यात ४८,१२० टन म्हणजेच ९४.९२ टक्के युरियाची उपलब्धता झाली आहे.

जिल्ह्यात ७९२५ मेट्रिक टन युरिया शिल्लक आहे. खरीप हंगाम २०२१ (३० सप्टेंबर २०२१) अखेर युरिया खताची ६०८३ टन उपलब्धता नियोजित आहे. १ ऑक्टोबर २०२१ पासून रब्बी हंगामास सुरुवात होत असून, चंद्रपूर जिल्हाकरिता २२,२४० टन युरिया खताचे आवंटन कृषी आयुक्तालयाने मंजूर केले आहे. त्यानुसार युरिया खताची जिल्ह्यात नियमित उपलब्धता असणार आहे. सद्यःस्थितीत खरीप हंगाम सुरू असून, भात, कापूस, सोयाबीन ही मुख्य पिके आहेत.

जिल्ह्यात ४,४६,१०० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून आतापर्यंत ४,५५,५२१ म्हणजेच ९४.९३ टक्के क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे. जिल्ह्यात समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाली असून, विविध ग्रेडच्या रासायनिक खतांची पिकांना मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बराटे यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स

इतर बातम्या
अन्नधान्य भाववाढीच्या चर्चा निराधारपुणे : सध्या अन्नधान्य महागाईच्या चर्चांना ऊत आला...
राज्यात थंडीची चाहूलपुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
इंधन दरवाढ, महागाई दिसत नाही, कांद्याची...नाशिक : एकीकडे इंधन खर्च, निविष्ठांचे वाढते दर,...
पावसामुळे द्राक्ष हंगामात अडचणी वाढल्यानाशिक : सप्टेंबर महिन्यापासून द्राक्ष उत्पादक...
सरासरी ते सरासरीपेक्षा कमी तापमानाचा...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) १४...
महाराष्ट्राच्या समृद्ध पीकसंपदेचा...संगमनेर, जि. नगर ः ‘‘महाराष्‍ट्रात पिकांची मोठी...
सांगली जिल्ह्यात ५० टक्के द्राक्ष...सांगली : जिल्ह्यात द्राक्ष पिकाच्या फळछाटणीची गती...
आता तुम्हीच शोधा  कुठला कारखाना कुणी... पुणे : गेल्या पंधरा वर्षांत ६५ सहकारी साखर...
स्वाभिमानी-कारखानदार संघर्ष अटळ;  ‘...सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू, गुरुदत्त,...
पुणे जिल्ह्यातील आठवडे बाजार  सुरू...पुणे : कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करून...
सोयीच्या लोकांची प्रकरणे  सोमय्या झाकून...पुणे : राज्यात एकूण ४३ कारखान्यांची विक्री...
लखीमपूर खेरी घटनेतील  शेतकऱ्यांच्या...वर्धा : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे भाजप...
नगर जिल्ह्यात रब्बीची  सहा टक्के पेरणी  नगर ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत रब्बीची ६...
रब्बीत यंदाही राहणार  हरभऱ्याचाच...अकोला : लवकरच रब्बीची लागवड सुरू होत आहे. या...
राज्यभरात निघणार लखीमपूर खेरी  किसान...  नाशिक : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी...
धुळे जिल्हा बँकेत तिघे जण बिनविरोधधुळे ः धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेची १७ जागांसाठी...
सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या ...बुलडाणा : विदर्भ, मराठवाडा, खानदेशातील कापूस,...
`तंत्रज्ञान पोहोचविण्यात कृषी...हिंगोली  ः ‘‘कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान...
नांदेड जिल्ह्यात ग्रामबीजोत्पादनात सात...नांदेड : जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी सहा हजार ३१...
यवतमाळ :नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या ...आर्णी, यवतमाळ : परतीच्या पावसाने खरीप पिकांची...