ऑलिव्ह तेलापासून बनवले वनस्पतिजन्य मांस

प्राणीज मांसाचा वापर केलेल्या अनेक पदार्थातून स्थौल्यत्वासह अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे प्राणीज मांसाला वनस्पतिजन्य पर्यायाचा शोध घेण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत.
Creating meat analogues with olive oil to boost sector’s health credentials.
Creating meat analogues with olive oil to boost sector’s health credentials.

प्राणीज मांसाचा वापर केलेल्या अनेक पदार्थातून स्थौल्यत्वासह अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे प्राणीज मांसाला वनस्पतिजन्य पर्यायाचा शोध घेण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. प्राणीज मांसाचा वापर केलेल्या अनेक पदार्थातून स्थौल्यत्वासह अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे प्राणीज मांसाला वनस्पतिजन्य पर्यायाचा शोध घेण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. अशा प्रकारच्या वनस्पतिजन्य मांसाच्या निर्मिती व विक्रीमध्ये कार्यरत कंपनीने कच्च्या (व्हर्जिन) ऑलिव्ह तेलापासून विविध मेद (फॅट) तयार केल्याचा दावा केला आहे. त्या आधारित जागतिक पातळीवरील पहिला आरोग्यदायी बर्गर बाजारात आणत असल्याचे स्पॅनिश स्टार्टअप कंपनी प्रतिनिधीने सांगितले. हेरूका या स्पॅनिश स्टार्टअप कंपनीने व्हर्जिन (कच्च्या) ऑलिव्ह तेलापासून घन स्वरुपातील फॅट तयार केले आहे. या मेदाचा पोत आणि चव ही मांसाप्रमाणे असून, ते नारळाच्या तेलापेक्षाही अधिक आरोग्यदायी असल्याचा कंपनीचा दावा आहे. हेरुकाच्या संशोधक गटाने सुमारे एक हजारापेक्षा अधिक चाचण्या व प्रयोगातून या समस्येवर मार्ग काढला आहे. त्यांनी विकसित केलेल्या बर्गरमध्ये घटकांचे संतुलन आणि आरोग्य यांचा चांगला मेळ घातला आहे. या बर्गरमध्ये केवळ ६.५ ग्रॅम मेद असल्याचे कंपनीचे मत आहे. या मांसरहित बर्गरमध्ये पारंपरिक बर्गरच्या तुलनेमध्ये ६४ टक्के कमी मेद (फॅट) आहेत. त्याच प्रमाणे या बर्गरमध्ये मांसापेक्षा ८५ टक्के कमी असंपृक्त मेद असून प्रति कॅलरी उर्जेमध्ये ११.३ टक्के प्रथिने आहेत. थोडक्यात, फॅटचे प्रमाण कमी आणि प्रथिनांचे प्रमाण अधिक असल्याने आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरणार आहे. कोलोमा यांनी सांगितले, की प्राणीज घटकांवर आधारित बर्गरमध्ये असलेल्या रसाळपणा आतापर्यंत अन्य घटकांतून मिळवणे शक्य होत नव्हते. अन्य काही पर्यायामध्ये तोच स्वाद मिळवण्यासाठी अधिक तेलांचा (मेद) वापर करावा लागत होता. मात्र, अधिक तेल म्हणजे आरोग्यपूर्ण उत्पादनाच्या अंतिम उद्दिष्टापासून दूर नेणारे ठरत होते. सामान्य मेदापेक्षा वेगळेपण

  • हेरुका कंपनीचे नवीन उत्पादन विकास व्यवस्थापिका लॉरेना सॅल्सेडो यांनी सांगितले की, जेव्हा आपण नारळाच्या तेलाचे घन स्वरूप डोळ्यासमोर आणतो, त्यावेळी ते पांढरे अधिक तेलकट असे असते. त्यात असंपृक्त मेदाचे प्रमाण अधिक असते. जर आपण द्रवरूप तेल (एकल संपृक्त -मोनो सॅच्युरेटेड) बर्गरमध्ये वापरतो, त्यावेळी मेदाचे प्रमाण कमी करू शकतो. मात्र, त्याचा पोत आपल्या आवश्यकतेप्रमाणे मिळत नाही. प्राणीज मांस आणि ऑलिव्ह तेलापासून बनवलेल्या बर्गरची तुलना केली असता पोत, स्वाद, गंध आणि चव यामध्ये साम्य असले तरी आरोग्याच्या दृष्टीने ऑलिव्ह तेलाचा बर्गर बाजी मारून जातो.
  • २०१७ मध्ये हेरुका कंपनीने सोयाबीन आधारित चिकन बाजारात आणले होते. त्या उत्पादनानंतर आता हा बर्गर नोव्हेंबरमध्ये बाजारात आणण्यात येणार आहे. त्याची विक्री स्पेन, अॅन्डोरा, पोर्तुगाल, फ्रान्स, नेदरलॅंड, सिंगापूर, हॉंगकॉंग, चिली आणि इंग्लंड मधील सुमारे ३ हजार विक्री दालनातून उपलब्ध करण्यात येणार आहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com