agriculture news in marathi Creating meat analogues with olive oil to boost sector’s health credentials. | Page 4 ||| Agrowon

ऑलिव्ह तेलापासून बनवले वनस्पतिजन्य मांस

वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

प्राणीज मांसाचा वापर केलेल्या अनेक पदार्थातून स्थौल्यत्वासह अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे प्राणीज मांसाला वनस्पतिजन्य पर्यायाचा शोध घेण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत.

प्राणीज मांसाचा वापर केलेल्या अनेक पदार्थातून स्थौल्यत्वासह अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे प्राणीज मांसाला वनस्पतिजन्य पर्यायाचा शोध घेण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत.

प्राणीज मांसाचा वापर केलेल्या अनेक पदार्थातून स्थौल्यत्वासह अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे प्राणीज मांसाला वनस्पतिजन्य पर्यायाचा शोध घेण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. अशा प्रकारच्या वनस्पतिजन्य मांसाच्या निर्मिती व विक्रीमध्ये कार्यरत कंपनीने कच्च्या (व्हर्जिन) ऑलिव्ह तेलापासून विविध मेद (फॅट) तयार केल्याचा दावा केला आहे. त्या आधारित जागतिक पातळीवरील पहिला आरोग्यदायी बर्गर बाजारात आणत असल्याचे स्पॅनिश स्टार्टअप कंपनी प्रतिनिधीने सांगितले.

हेरूका या स्पॅनिश स्टार्टअप कंपनीने व्हर्जिन (कच्च्या) ऑलिव्ह तेलापासून घन स्वरुपातील फॅट तयार केले आहे. या मेदाचा पोत आणि चव ही मांसाप्रमाणे असून, ते नारळाच्या तेलापेक्षाही अधिक आरोग्यदायी असल्याचा कंपनीचा दावा आहे.

हेरुकाच्या संशोधक गटाने सुमारे एक हजारापेक्षा अधिक चाचण्या व प्रयोगातून या समस्येवर मार्ग काढला आहे. त्यांनी विकसित केलेल्या बर्गरमध्ये घटकांचे संतुलन आणि आरोग्य यांचा चांगला मेळ घातला आहे. या बर्गरमध्ये केवळ ६.५ ग्रॅम मेद असल्याचे कंपनीचे मत आहे.
या मांसरहित बर्गरमध्ये पारंपरिक बर्गरच्या तुलनेमध्ये ६४ टक्के कमी मेद (फॅट) आहेत. त्याच प्रमाणे या बर्गरमध्ये मांसापेक्षा ८५ टक्के कमी असंपृक्त मेद असून प्रति कॅलरी उर्जेमध्ये ११.३ टक्के प्रथिने आहेत. थोडक्यात, फॅटचे प्रमाण कमी आणि प्रथिनांचे प्रमाण अधिक असल्याने आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरणार आहे.

कोलोमा यांनी सांगितले, की प्राणीज घटकांवर आधारित बर्गरमध्ये असलेल्या रसाळपणा आतापर्यंत अन्य घटकांतून मिळवणे शक्य होत नव्हते. अन्य काही पर्यायामध्ये तोच स्वाद मिळवण्यासाठी अधिक तेलांचा (मेद) वापर करावा लागत होता. मात्र, अधिक तेल म्हणजे आरोग्यपूर्ण उत्पादनाच्या अंतिम उद्दिष्टापासून दूर नेणारे ठरत होते.

सामान्य मेदापेक्षा वेगळेपण

  • हेरुका कंपनीचे नवीन उत्पादन विकास व्यवस्थापिका लॉरेना सॅल्सेडो यांनी सांगितले की, जेव्हा आपण नारळाच्या तेलाचे घन स्वरूप डोळ्यासमोर आणतो, त्यावेळी ते पांढरे अधिक तेलकट असे असते. त्यात असंपृक्त मेदाचे प्रमाण अधिक असते. जर आपण द्रवरूप तेल (एकल संपृक्त -मोनो सॅच्युरेटेड) बर्गरमध्ये वापरतो, त्यावेळी मेदाचे प्रमाण कमी करू शकतो. मात्र, त्याचा पोत आपल्या आवश्यकतेप्रमाणे मिळत नाही. प्राणीज मांस आणि ऑलिव्ह तेलापासून बनवलेल्या बर्गरची तुलना केली असता पोत, स्वाद, गंध आणि चव यामध्ये साम्य असले तरी आरोग्याच्या दृष्टीने ऑलिव्ह तेलाचा बर्गर बाजी मारून जातो.
  • २०१७ मध्ये हेरुका कंपनीने सोयाबीन आधारित चिकन बाजारात आणले होते. त्या उत्पादनानंतर आता हा बर्गर नोव्हेंबरमध्ये बाजारात आणण्यात येणार आहे. त्याची विक्री स्पेन, अॅन्डोरा, पोर्तुगाल, फ्रान्स, नेदरलॅंड, सिंगापूर, हॉंगकॉंग, चिली आणि इंग्लंड मधील सुमारे ३ हजार विक्री दालनातून उपलब्ध करण्यात येणार आहे.

 


इतर कृषी प्रक्रिया
अळिंबीचे पौष्टिक, औषधी गुणधर्म अन्...लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनी अळिंबी (मशरूम)...
पपईपासून बनवा मूल्यवर्धित पदार्थपपई ही आरोग्यास पोषक असून, त्यापासून जाम, जेली,...
आवळा प्रक्रिया उद्योगातील संधीआवळा फळांमध्ये असणारे औषधी गुणधर्म व भरपूर...
गुलाबापासून गुलकंद, जॅम,जेलीगुलाबाच्या पाकळ्यापासून गुलकंद, जॅम, जेली इत्यादी...
फळे, भाजीपाल्याचे पूर्व शीतकरणपूर्व-शीतकरणाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे पीक...
मसाल्यातील भेसळ ओळखण्याच्या पद्धती बाजारामध्ये उपलब्ध असलेल्‍या अनेक मसाल्यांमध्ये...
संत्र्याचे काढणीपश्‍चात तंत्रज्ञानसंत्रावर्गीय फळांचा आकर्षक रंग,स्वाद, चव टिकून...
ऑलिव्ह तेलापासून बनवले वनस्पतिजन्य मांसप्राणीज मांसाचा वापर केलेल्या अनेक पदार्थातून...
सोयाबीनचे मूल्यवर्धित पदार्थसोयाबीनपासून सोया-दूध, सोया पनीर, पीठ आणि...
उद्योजकतेमध्ये कुटुंब, समाजाचा हिस्साउद्योग म्हणजे जोखीम. त्याच्याच यश व अपयश या दोन...
बटाट्यापासून वेफर्स, पावडर, फ्रेंच...मानवी आहारामध्ये बटाट्याचा वापर मोठ्या प्रमाणावर...
सब्जा बियांचे आरोग्यदायी फायदे सब्जामध्ये प्रथिने तसेच आरोग्याच्या दृष्टीने...
लघु उद्योग आजारी का पडतात?लघुउद्योगांना दीर्घकाळ नफ्यात चालण्यासाठी अनेक...
भाजीपाल्यावरील प्राथमिक प्रक्रियासौर ऊर्जेवरील ड्रायर, इलेक्ट्रिक ड्रायरच्या...
बीटपासून बनवा पराठा, पावडर, सूपबीट ही भाजी तशी फार लोकांना आवडत नाही. मात्र,...
ग्रामीण सेवा क्षेत्रातील उद्योगांचा...ग्रामीण भागामध्ये सेवा उद्योगाच्या विस्ताराला...
सीताफळापासून बनवा आइस्क्रीम, रबडी,...सीताफळाचा गर वेगळा काढून केलेले पदार्थ आवडीने...
बहुगुणी आवळ्याचे मूल्यवर्धित पदार्थआवळा हे तुरट व आंबट चवीचे हिवाळ्यात येणारे...
उत्पादन क्षेत्रातील ग्रामीण उद्योगांचे...ग्रामीण भागातील निर्मिती करणाऱ्या एका छोट्या...
छोट्या उपायांद्वारे टाळता येईल अन्न...मागील भागामध्ये कृषी उत्पादनाच्या व वाहतुकीच्या...