Agriculture news in Marathi The credit of the borrower depends on the Sibyl | Page 2 ||| Agrowon

‘सिबिल’वर ठरतेय कर्जदाराची पत

टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 ऑक्टोबर 2021

रिझर्व्ह बॅंकेच्या निकषांनुसार आता पीककर्ज वा मध्यम व दीर्घ मुदतीच्या कर्जासाठी ‘सिबिल’चा (क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड) निकष लागू करण्यात आला आहे.

सोलापूर : रिझर्व्ह बॅंकेच्या निकषांनुसार आता पीककर्ज वा मध्यम व दीर्घ मुदतीच्या कर्जासाठी ‘सिबिल’चा (क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड) निकष लागू करण्यात आला आहे. किमान ६०० ते ७०० पर्यंत सिबिल असणाऱ्या शेतकऱ्यांनाच बॅंकांकडून कर्जवाटप केले जात आहे. कर्जाची नियमित परतफेडीवर पत ठरविली जात आहे.

बॅंकांकडून पीककर्ज मिळविण्यासाठी सातबारा, आठ-अ, सहा-ड, पॅन कार्ड, आधार कार्ड अशा कागदपत्रांची गरज आहे. दुसरीकडे अन्य कोणत्याही बॅंकांचे कर्ज नसल्याचे दाखलेही द्यावे लागत होते. परंतु आता त्यात बदल करून ‘सिबिल’ची पडताळणी बंधनकारक करण्यात आली असून, ऑनलाइन पद्धतीने बॅंका कर्जदाराची पत ठरवून कर्ज देऊ लागल्या आहेत. रिझर्व्ह बॅंकेने चार कंपन्यांबरोबर करार केला असून, त्यांच्या माध्यमातून कर्जदाराची पत जागेवरच समजू लागली आहे. 

सिबिल म्हणजे काय...
शेतकरी असो वा नोकरदारांनी बाहेरील कोणत्याही बॅंकेकडून कर्ज घेतल्यास अथवा संबंधित व्यक्‍ती कोणाला जामीनदार झाल्यास त्याची संपूर्ण माहिती आता बॅंकांना ‘सिबिल’च्या माध्यमातून समजू लागली आहे. ती व्यक्‍ती कोणत्या बॅंकेचा थकबाकीदार आहे का, ज्याला जामीनदार आहे, तो व्यक्‍ती कर्जाची नियमित परतफेड करतो का, याचीही माहिती त्यामध्ये येते. कोणत्याही बॅंकेकडून कर्ज घेतले आणि त्याचे हप्ते नियमित परतफेड होत असतील, तर तो शेतकरी कर्जासाठी पात्र ठरतो. थकबाकीत असलेल्यांना कर्जवाटप करता येत नाही.

जिल्हा मध्यवर्ती बॅंक ही शेतकऱ्यांची बॅंक आहे. परंतु थकबाकी कमी व्हावी, शेतकऱ्यांची कर्ज घेण्याची पत वाढावी म्हणून कर्ज मागणाऱ्यांचे ‘सिबिल’ चेक केले जाते. किमान ६०० पर्यंत सिबिल असल्यास त्याला कर्जवाटप केले जाते.
- शैलेश कोथमिरे, प्रशासक, जिल्हा मध्यवर्ती बॅंक, सोलापूर

बॅंकनिकाय ‘सिबिल’चे निकष...

  • ज्या शेतकऱ्यांचे सिबिल ६७५ असल्यास बॅंक ऑफ इंडियाकडून कर्ज मिळते
  • विदर्भ कोकण ग्रामीण बॅंक ही ६५० सिबिल असलेल्यांनाच करते कर्जवाटप
  • जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतून कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांचे असावे ६०० पर्यंत सिबिल

इतर अॅग्रो विशेष
कंटेनर भाड्यात पाच पट वाढ नागपूर ः टाळेबंदीमुळे अमेरिका आणि युरोपियन देशात...
विमा योजनेकडे ७० टक्के शेतकऱ्यांनी...सांगली : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत...
कापड उद्योगाला खुपतोय कापसाचा दर पुणे : तमिळनाडूतील राजकीय पक्ष तसेच कापड...
काँग्रेसचे सतेज पाटील, भाजपचे अमरिश...मुंबई : राज्यातील विधान परिषदेच्या ६ जागा...
नाशिकमध्ये द्राक्ष परिषद घेणार : राजू...नाशिक : द्राक्ष पिकात शेतकरी कष्टातून उत्पादन घेत...
ई-पीक पाहणीचा पहिला टप्पा यशस्वीपुणेः देशातील पहिल्याच ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या...
सुपारीची पाने, करवंटीपासून पर्यावरणपूरक...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परुळे (ता.वेंगुर्ला) येथील...
शेत ते बाजारपेठेपर्यंत युवकांची ‘...नाशिक येथील संगणक अभियंता अक्षय दीक्षित व...
शेतकऱ्यांच्या आंदोलनाने अहंकारी सत्तेला...पुणे : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या...
राज्यात तापमानात चढ-उतार शक्यपुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर अंशत:...
कृषी सुधारणांचा अंत की पुनरुत्थान? :...केंद्र सरकारने पुन्हा एक समिती नेमून नव्याने...
शेतमजुरांना अपघात विम्याचे दोन लाखांचे...पुणे ः देशातील असंघटित कामगार व मजुरांना ई-...
पुढील लढाई तरुणांना लढावी लागेल : राकेश...केंद्र सरकारने तीन कृषी कायदे रद्द...
‘अन्न गुलामगिरी’ लादण्याचे षड्‌यंत्र :...केंद्र सरकारकडून लागू करण्यात आलेले तीन कृषी...
निसर्ग- वृक्षसंपदेचे वैभव जपलेले गमेवाडीनिसर्गाच्या कुशीत वसलेल्या छोट्याशा गमेवाडी...
सीताफळाने दिला शेतकऱ्यांना आधारऑगस्ट ते डिसेंबर कालावधीपर्यंत सातत्याने मागणी...
राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज पुणे : राज्यात गेल्या आठवडाभरापासून कोकण, मध्य...
इथे नांदते गोकूळ सौख्याचे...कोल्हापूर जिल्ह्यातील नूल (ता. गडहिंग्लज) येथील...
उडीद, मुगाच्या उत्पादनात घट नांदेड : जिल्ह्यातील मूग, उडीद या खरिपातील...
पारदर्शक फोन : नव्या आभासी क्रांतीच्या...दर काही दिवसाने मोबाईल फोनमध्ये बदल होत असल्याचे...