बनावट कागदपत्रांच्या आधारे ठिबक योजनेचा लाभ घेणाऱ्यावर गुन्हा

Crimes against beneficiaries of drip scheme based on fake documents
Crimes against beneficiaries of drip scheme based on fake documents

अमरावती ः बनावट सातबारा, खाडाखोड केलेले पीक प्रमाणपत्र तसेच शंभर रुपयांच्या संमती पत्रावर वारसांच्या खोट्या सह्या मारून पंतप्रधान ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेण्यात आल्याचे उघड झाले आहे. शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी चांदूररेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

दिनेश विजय वानखडे असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्‍तीचे नाव असून ते बालाजी मंदिर चांदूररेल्वे येथील रहिवासी आहेत. दिनेश वानखडे यांनी शासनाच्या ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव तयार केला. या प्रस्तावासोबतच खोटा सातबारा, खाडाखोड केलेले पीकप्रमाणपत्र जोडले. त्यासोबतच सामाईक सर्व भोगवटादारांची स्वाक्षरीनिशी संमती प्रस्तावाला आवश्‍यक असते. त्याकरिता शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर संमतीपत्र तयार केले. 

हा बनावट प्रस्ताव कृषी विभागात सादर करून ७५ हजार ५८५ रुपयांचा लाभ घेऊन शासनाची २४ हजार ९३४ रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी समीप अभयकुमार वानखडे यांनी लेखी तक्रार दिली. तसेच, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या चौकशी अहवालावरुन दिनेश वानखडे विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार संतोष भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणी पुढील तपास केला जात आहे.

या वेळी सामायिक भोगवटादारांमधील समीप अभयकुमार वानखडे व त्यांची बहीण अर्चना अभयकुमार वानखडे यांच्या बनावट सह्या करून सदर स्टॅम्प पेपर योजनेसोबत प्रस्तावाला लावला. गट क्रमांक ९२ क्षेत्र १ हेक्‍टर २७ आर व पोट खराब १ हेक्‍टर ०९ आर असे प्रत्यक्षात असताना फक्‍त १ हेक्‍टर २७ आर शेतीवर सिंचन योजनेचा लाभ घेणे कायदेशीर होते. परंतु, २ हेक्‍टर शेतीवर लाभ घेतल्याचेही तक्रारीत नमूद आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com