टोकन प्रक्रियेत गैरप्रकार केल्यास फौजदारी कारवाई ः सुरवसे

बाजार समित्यांमार्फत टोकन देण्याच्या प्रक्रियेत होत असलेली अनियमितता खपवून घेतली जाणार नाही. यात गैरप्रकार आढळून आल्यास संबंधितावर फौजदारी कार्यवाही केली जाईल. - मंगेश सुरवसे, जिल्हा उपनिंबधक
Criminal action in case of misappropriation of token process: Survase
Criminal action in case of misappropriation of token process: Survase

परभणी : ‘‘बाजार समित्यांमार्फत टोकन देण्याच्या प्रक्रियेत गैरप्रकार आढळून आल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल’’, असा इशारा जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) मंगेश सुरवसे यांनी दिला. 

जिल्ह्यात शासकीय खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी ऑनलाइन पध्दतीने दुबार नोंदणी केलेल्या ९ हजार ६४५ शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे आता ४१ हजार २२१ नोंदणीकृत शेतकरी शिल्लक राहिले आहेत. त्यांपैकी रविवार (ता.३१) अखेरपर्यंत १० हजार २७५ शेतकऱ्यांचा ३ लाख २ हजार ९४३ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. 

केंद्रावर कापूस विक्रीसाठी ऑफलाइन पध्दतीने ४ हजारावर, तर ऑनलाइन पध्दतीने ४६ हजार ७७६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. परंतु, ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या नावाची छाननी केली असता आजवर ९ हजार ६४५ शेतकऱ्यांची नावे दुबार आढळून आली. नोंदणीकृत शेतकऱ्यांची संख्या ४१ हजार २२१ एवढी राहिली आहे. 

रविवार (ता.३१) पर्यंत कापूस उत्पादक पणन महासंघाच्या ४ केंद्रांवर ५ हजार २८० शेतकऱ्यांचा १ लाख ६७ हजार ५७६ क्विंटल, तर भारतीय कापूस महामंडळाच्या ६ केंद्रांवर ४ हजार ९९५ शेतकऱ्यांचा १ लाख ३५ हजार ३६६ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. फेडरेशन आणि सीसीआय मिळून १० केंद्रांवरील २७ जिनिंग कारखान्यांमध्ये एकूण १० हजार २७५ शेतकऱ्यांचा ३ लाख २ हजार ९४३ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. अजून ३० हजार ९४६ शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी बाकी आहे. 

नोंदणीकृत शेतकऱ्यांचा एफएक्यू दर्जाचा कापूस शासकीय खरेदी केंद्रांवर खरेदी केला जाईल. बाजार समितीकडून एसएमएस आल्यानंतरच शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी आणावा. खासगी व्यापाऱ्यांना कापूस विक्री केलेल्या नोंदणीकृत शेतकऱ्यांनी ती माहिती बाजार समितीस द्यावी. नोंदणीकृत शेतकऱ्यांनी इतरांचा कापूस स्वतःच्या नावावर विक्री करु नये, आपला ७ -१२ व्यापाऱ्यांना देऊ नये. असे गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल.

कापसाचे चुकारे अदा केले जाणार नाहीत. पणन महासंघ, सीसीआयचे ग्रेडर, बाजार समितीचे सचिव यांच्या समन्वयातून संबंधित सहाय्यक निबंधक यांच्या नियंत्रणाखाली बाजार समितीमार्फत कापूस खरेदीसाठी दुसऱ्या दिवशी बोलवायच्या ऑनलाइन नोंदणीकृत शेतकऱ्यांची यादी व टोकन दिले जातील.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com