agriculture news in Marathi, criminal action should be on bogus fertilizer producer, Maharashtra | Agrowon

अवैध खत उत्पादकांवर फौजदारी कारवाई होणार
टीम अॅग्रोवन
रविवार, 12 मे 2019

पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना कमी दर्जाचे खत विकल्यास फौजदारी कारवाई करावी, असे आदेश कृषी आयुक्तालयाने दिले आहेत. कृषी अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे सध्या अशी कारवाई टाळली जात असल्याचे आढळल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना कमी दर्जाचे खत विकल्यास फौजदारी कारवाई करावी, असे आदेश कृषी आयुक्तालयाने दिले आहेत. कृषी अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे सध्या अशी कारवाई टाळली जात असल्याचे आढळल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

शेतकऱ्यांना अप्रमाणित खताची विक्री करणाऱ्या काही कंपन्यांमध्ये कृषी अधिकाऱ्यांचे हितसंबंध गुंतले आहेत. तपासणीत अशी खते अप्रमाणित आढळल्यावर निरीक्षकाचे अधिकार मिळालेला कृषी अधिकारी फक्त खत नियंत्रण आदेशान्वये कारवाई करतो. अशा प्रकरणांमध्ये अत्यावश्यक वस्तू कायद्याचा वापर बेमालूमपणे टाळला जातो. त्यामुळे कंपन्यांच्या वरिष्ठांना संरक्षण मिळते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

“अवैध खत उत्पादन आणि विक्रीला जबाबदार असलेल्या व्यक्तींच्या विरोधात अत्यावश्यक वस्तू कायद्यातील कलम दहाचा (एक) वापर करण्याची स्पष्ट तरतूद आहे. मात्र, क्षेत्रिय कृषी अधिकारी हेतूतः या कायद्याचा वापर करीत नाहीत. अप्रमाणित खते आढळल्यास कंपनी व्यवस्थापक, रसायनशास्त्रज्ञावर देखील कारवाईची तरतूद आहे,’’ असे आयुक्तालयाचे म्हणणे आहे. 

राज्यात बोगस खत कंपन्या स्थापन करताना काही जण स्वतःला संचालक म्हणून कागदोपत्री घोषित करतात. त्याच आधारे  कृषी आयुक्तालयाचा उत्पादन परवाना मिळवतात. मात्र, शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यानंतर असे संचालक कारवाईची जबाबदारी घेण्यास पुढे येत नाहीत. त्यामुळे यापुढे फौजदारी कारवाईस टाळाटाळ न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे आयुक्तालयाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. 

“शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास खत उत्पादन साखळीतील सर्व वरिष्ठ कायद्याच्या कक्षेत येतात. त्यांना मोकळे सोडले जात असल्याने ते पुन्हा गैरप्रकार चालू ठेवतात. त्यामुळे गरजेनुसार भारतीय दंड विधानाच्या १८६० मधील कलमांचा वापर करून खतांमधील गैरप्रकार रोखण्याचे क्षेत्रिय अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले आहे,” अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. 

इतर अॅग्रो विशेष
सरकारला एवढी कसली घाई?विविध मंत्रालयांसाठी अर्थसंकल्पात केल्या जाणाऱ्या...
एक पाऊल पोषणक्रांतीच्या दिशेनेशे तकऱ्यांचे कष्ट, शास्त्रज्ञांचे प्रयत्न आणि...
आधुनिक तंत्रासह काटेकोर धोरणाने अमेरिकन...पुणेः विविध जागतिक संस्थांनी एकत्र येऊन आफ्रिकी,...
मक्याच्या तुटवड्यामुळे अंडी आणि चिकन...पुणे : दक्षिण भारतासह महाराष्ट्र व मध्य प्रदेशात...
लष्करी अळीमुळे राज्यभरातील शेतकरी त्रस्तपुणेः गेल्या वर्षी भीषण दुष्काळाचा सामना करणाऱ्या...
लष्करी अळी नियंत्रणाचे जागतिक प्रयत्नपुणे : स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा म्हणजेच...
मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे आव्हान...पुणे ः गेल्या हंगामातील दुष्काळाच्या चटक्यानंतर...
राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाजपुणे : मॉन्सून पुन्हा सक्रिय झाल्याने राज्यात...
शेतकरी कंपन्या स्थापन करण्यासाठी करारपुणे ः नाबार्डच्या कंपनी विकास फंडातून...
कर्नाटकात गुऱ्हाळघरातून थेट व्यापार...सांगली ः कर्नाटकमध्ये हमाली आणि अडत कमी असल्याने...
पीकविम्याचे ३२५ कोटी कंपन्यांना वितरितमुंबई ः गेल्यावर्षीच्या खरिपातील पीकविमा योजनेचा...
ग्रामविकासावर खर्च झालेल्या निधीची...मुंबई: आपल्या ग्रामपंचायतीला गावातील...
दुष्काळातही कडवंचीत शेतीतून ७२ कोटींचे...जालना : ‘महाराष्ट्राचे इस्राईल’ म्हणून नावलौकिक...
राज्यात सहामाहित तेराशे शेतकऱ्यांची...मुंबई ः सततची दुष्काळी स्थिती, नैसर्गिक संकटे,...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : मॉन्सून पुन्हा सक्रीय झाल्याने...
परीक्षा शुल्क परतीचा खर्च सात लाख रुपयेयवतमाळ ः परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे पैसे...
दुबार पेरणीसाठी सरकारची तयारीः डाॅ....पुणे: पावसाचा काही प्रमाणात खंड पडला आहे....
डोणगावात होणार खजूर लागवडअकोला ः पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यासाठी...
रक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळनाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह...
असंमत बियाणे लागवडीला बोंडअळी कारणीभूत...नवी दिल्ली : देशात २०१८ मध्ये गुलाबी...