agriculture news in Marathi Criminal offenses on 13 seed companies Maharashtra | Agrowon

तेरा बियाणे कंपन्यांवर अखेर फौजदारी गुन्हे 

टीम अॅग्रोवन
रविवार, 5 जुलै 2020

राज्यातील शेतकऱ्यांना निकृष्ट बियाणे पुरवल्याचा ठपका ठेवत अखेर कृषी विभागाने १३ बियाणे कंपन्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल केले. यामुळे बियाणे उद्योगात खळबळ उडली आहे.

पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना निकृष्ट बियाणे पुरवल्याचा ठपका ठेवत अखेर कृषी विभागाने १३ बियाणे कंपन्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल केले. यामुळे बियाणे उद्योगात खळबळ उडली आहे. गुन्हे दाखल झालेल्या कंपन्या पुणे, सोलापूर, बीड, जालना, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बुलडाणा, नागपूर आणि चंद्रपूर भागातील आहेत. 

शेतकऱ्यांकडून कृषी विभागाला प्राप्त झालेल्या तक्रारींची छाननी युद्धपातळीवर सुरू आहे. तक्रारींच्या आधारे क्षेत्रीय पाहणीदेखील सुरू आहे. त्यामुळे अजून काही कंपन्यांवर गुन्हे दाखल होतील, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. राज्यात सोयाबीनचा पेरा दरवर्षी साधारणतः ४१ लाख हेक्टरवर होतो. चालू खरीप हंगामात सुरुवातीच्या टप्प्यात पेरा ४८ टक्क्यांपर्यंत झालेला आहे. मात्र, पहिल्याच टप्प्यात मोठ्या प्रमाणात बियाणे निकृष्ट निघत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. 

सोयाबीन बियाणे निकृष्ट निघाल्याने लोकप्रतिनिधींकडून राज्य शासनाकडे लेखी तक्रारी गेल्या आहेत. त्यामुळे तपासणी प्रक्रियेत बियाणे सदोष आढळल्याचे निष्पन्न होताच बियाणे कंपनीवर थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. गुन्हा दाखल झालेल्या कंपन्यांपैकी उत्तराखंड व मध्य प्रदेशातील प्रत्येकी एका कंपनीचा समावेश आहे. 

गेल्या वर्षी बीजोत्पादन कालावधीत हवामान अनुकूल नसल्याने अडचणी आल्या होत्या. सदोष बियाणे आढळण्यात चांगल्या कंपन्यांचा दोष नाही. कारण खोलवर पेरा होणे, पावसाचा खंड, बियाण्यांची आदळआपट यामुळेदेखील उगवणीला अडचणी येऊ शकतात, असे कृषी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

“क्षेत्रिय परिस्थिती बघता काही ठिकाणी बियाणे कंपन्यांचा सरसकट दोष नसतो. मात्र, शासनाचे आदेश असल्याने गुन्हे दाखल करण्याशिवाय पर्याय नाही,” असेही अधिकारी सांगत आहेत. 

तथ्य तपासूनच कारवाई 
कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, बियाणे न उगवल्याबद्दल शेतकऱ्यांकडून आलेल्या प्रत्येक तक्रार अर्जाची दखल घेतली जात आहे. तालुकास्तरीय समितीमार्फत संबंधित शेतकऱ्याकडे बांधावर जाऊन माहिती घेतली जाते. तक्रारीतील तथ्य तपासूनच अंतिम कारवाई केली जाते. 


इतर अॅग्रो विशेष
टोमॅटोवर जिवाणूजन्य ठिपक्या रोगाचा...नाशिक: चालू वर्षी टोमॅटोवरील विषाणूजन्य रोगांचा...
मराठवाड्यातील प्रकल्पांतील पाणीसाठा ५०...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७३ प्रकल्पातील उपयुक्त...
परस्पर पुनर्गठन केल्याने शेतकरी...दानापूर, जि. अकोला ः येथील सेवा सहकारी सोसायटीने...
राज्यातील साखर कारखान्यांकडून एफआरपीचे...पुणे: राज्यातील साखर कारखान्यांनी लॉकडाउन आणि...
शेतमाल नियमनमुक्ती : आहे मनोहर, तरी... पुणे ः संपूर्ण शेतमाल नियमनमुक्तीचे स्वागतच आहे....
कृषी सुविधा निधीला आजपासून प्रारंभनवी दिल्ली ः कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या...
बाजार समित्यांपुढे स्पर्धेचे आव्हान पुणे ः केंद्र सरकारच्या ‘एक देश, एक बाजार'...
धक्कादायक, सरकारी समित्यांमध्ये ...पुणे: पीकविमा योजनेसहित कृषी योजने संबंधित सर्व...
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात हलक्या...पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील पावसाचा...
उमाताईंनी मिळवली आयुष्याची भाकरी गाडीवर फिरून ज्वारीच्या कडक भाकरीची विक्री करत...
गुणवत्ता अन् विश्वासाचा ब्रॅण्ड ः...प्रथम गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार सीताफळ उत्पादक...
सर्व शेतीमाल संपूर्ण नियमनमुक्त ! ‘एक...पुणे ः सर्व शेतीमालाच्या संपूर्ण नियमनमुक्तीच्या...
कोरोनाच्या संकटातही गुळाचा गोडवा कायमकोल्हापूर : महापुराच्या तडाख्यात सापडूनही सरत्या...
दूध दराच्या दुखण्यावरील इलाजहल्लीच झालेल्या दोन आंदोलनात दूध दराच्या दोन...
‘रेपो रेट’शी आपला काय संबंध?भारतीय रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) ऑगस्ट,...
आदिवासी तालुक्यांमध्ये कोरडा दुष्काळ...नाशिक: कोरोना विषाणूच्या फैलावामुळे राज्याचे...
शेतकरीविरोधी कायद्यावर ‘किसानपूत्र’चे...औरंगाबाद: किसानपूत्र आंदोलनाच्यावतीने...
कोल्हापुरात नद्यांच्या पाण्यात वाढ...कोल्हापूर: जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाचा...
राज्यात पावसाचा जोर ओसरला पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्रात गेल्या चार ते पाच...
शेतकरी विरोधी अध्यादेश रद्द करा मुंबई: केंद्र सरकारने ५ जून २०२० रोजी काढलेले...