नगर जिल्ह्यात ढगाळ वातावरणाचा तूर खरेदीला फटका

तुरीचे पीक सध्या हाती येत आहे. मात्र, वातावरणातील गारव्यामुळे तुरीतील ओलावा लवकर कमी होत नाही. चांगले कडक ऊन असेल, तर साधारण चार ते पाच दिवस तूर वाळवल्यास आठ ते दहा टक्क्यांपर्यंत ओलावा येतो. त्यामुळे काढणीनंतर चांगल्या उन्हात साधारण चार ते पाच दिवस तूर वाळवावी.’ - डॉ. एन. एस. कुटे, कडधान्य सुधार प्रकल्पप्रमुख, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी सध्याच्या वातावरणामुळे तुरीत ओलावा अधिक आहे. त्यामुळे खरेदी जोरात नाही. मात्र, तूर विक्रीसाठी नोंदणीकृत शेतकऱ्यांना लगेच फोन करून दोनशे ग्रॅम नमुना मागवून घेत त्यातील ओलावा तपासतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा हेलपाटा होत नाही. ऊन पडले की खरेदीला वेग येईल. - लक्ष्मीबाई विघ्ने, खरेदी केंद्रचालक, शेवगाव, जि. नगर
crises in tour byeing due to cloudy weather in Nagar district
crises in tour byeing due to cloudy weather in Nagar district

नगर : तुरीची हमीभावाने खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्रे सुरू झाली खरी; परंतु गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे ऊन पडत नाही. परिणामी, तुरीमधील ओलावा हटत नाही. त्याचा परिणाम थेट तूर खरेदीवर झाला आहे.

सरकारी नियमानुसार १२ टक्क्यांपर्यंत ओलावा असणे गरजेचे आहे. त्यामुळे चांगल्या उन्हात चार ते पाच दिवस तूर वाळवून ओलावा कमी करावा, असा शास्त्रज्ञांचा सल्ला आहे.

सध्या सरकारी खरेदी केंद्रावर विक्रीसाठी येत असलेल्या तुरीत थेट १८ टक्क्यांपर्यंत ओलावा दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये ११ खरेदी केंद्रांवर आत्तापर्यंत ९ हजार ३२ शेतकऱ्यांनी तूर विक्री करण्यासाठी नोंदणी केली. तरीही, आत्तापर्यंत फक्त पावणेदोनशे शेतकऱ्यांनीच तूर विक्री केली आहे.

जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून ५,८०० रुपये दराने तूर खरेदी होईल.  जिल्ह्यात ११ केंद्रांवर ९०३२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. आत्तापर्यंत कर्जत केंद्रावर १२८ शेतकऱ्यांनी ८३४ क्विंटल, तर शेवगाव केंद्रावर ५१ शेतकऱ्यांनी ४९६ क्विंटल अशी १२३० क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com