Agriculture news in Marathi Crisis clouds over mango in Marathwada | Page 2 ||| Agrowon

मराठवाड्यात आंब्यावर संकटाचे ढग

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 डिसेंबर 2021

यंदा आंब्यावर संकटाचे ढग कायम आहेत. मराठवाड्यातील आंबा त्याला अपवाद नाही. प्रतिकूल हवामानामुळे यंदा आंबा एकाच टप्प्यात नव्हे तर दोन तीन टप्प्यांत मोहरणार हे स्पष्ट आहे.

औरंगाबाद : यंदा आंब्यावर संकटाचे ढग कायम आहेत. मराठवाड्यातील आंबा त्याला अपवाद नाही. प्रतिकूल हवामानामुळे यंदा आंबा एकाच टप्प्यात नव्हे तर दोन तीन टप्प्यांत मोहरणार हे स्पष्ट आहे. शिवाय हवामान प्रतिकूलतेमुळे आंब्यावर तुडतुडे व भुरीचा प्रादुर्भावही वाढवण्याची शक्‍यता वाढली आहे. 

मोहर फूटण्यासाठी अपेक्षित तापमान अजूनही मिळत नसल्याने त्याचा थेट मोहर येण्यावर परिणाम करीत असल्याचे चित्र आहे. मराठवाड्यात जवळपास २० हजार हेक्‍टरवर आंब्याचे क्षेत्र विस्तारले आहे. औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली अशा क्रमाने जिल्ह्यांमध्ये आंबा बागा विस्तारल्या आहेत. 

प्रत्येकवर्षी हंगाम चांगला राहील या आशेवर असलेल्या आंबा उत्पादकांच्या आशांवर यंदाही प्रतिकूल हवामानाने संकटाचे ढग गोळा केले आहेत. १४ डिग्री सेल्सिअस तापमान सतत २१ दिवस मिळाल्यास आंब्यांना चांगला मोहर फुटतो. साधारणतः: कल्टारचा वापर केलेल्या बागांमध्ये नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तर नैसर्गिकरीत्या डिसेंबर जानेवारीमध्ये आंब्याला मोहर येतो. यंदा ज्या ठिकाणी कल्टारचा वापर केला त्या बागांमध्ये जवळपास ७० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त बागांमध्ये मोहर बाहेर पडला व पडतो आहे. 

काही बागांमध्ये नैसर्गिकरीत्याही मोहर फुटला आहे. यंदा आंब्याची झाडे अतिपावसामुळे नोव्हेंबरपर्यंत सुप्तावस्थेत होते. जमिनीत वाफसाच नव्हता, मुळांना हवा मिळालीच नाही, त्यामुळे झाडांना अन्नद्रव्य घेता आली नाही. त्यामुळे झाडे नैसर्गिकरीत्या सुप्तावस्थेत गेल्याचे तज्ज्ञ सांगतात. शिवाय ज्या झाडांना गेल्यावर्षी कमी मोहर होता ती यंदा चांगली फुटण्याची शक्‍यता असल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अर्थात हवामानाची प्रतिकूलता आणखी किती काळ राहणार यावरही आंब्याचे गणित अवलंबून असणार आहे. त्यामुळे सुरुवातच संकटात झालेल्या यंदाच्या हंगामात आणखी किती संकटाचा सामना आंबा बागांना करावा लागणार हे पाहणे महत्त्वाचे 
ठरणार आहे.

यंदा माझ्या दोन एकर केसर आंबा बागेतील आंब्याला जवळपास ९० टक्‍के मोहर फुटला. परंतु लगडलेल्या मोहरापैकी ६० ते ७० टक्‍के मोहर गळून चाललाय.
- मिठूभाऊ चव्हाण, भांडेगाव, ता. खुल्ताबाद, जि. औरंगाबाद

हवामानाच्या प्रतिकूलतेमुळे यंदा आंब्यांना मोहर दोन तीन टप्प्यांत फुटणार. मोहर फुटलेल्या बागांमध्ये तुडतुड्यांचा आणि भुरीचाही प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता आहे. मोहर फुटलेल्या ठिकाणी तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी निमार्क आणि गंधकाचा वापर करावा. मोहर चांगला आलेल्या ठिकाणी परपरागीकरणासाठी मधमाशांच्या पेट्या ठेवणे आवश्‍यक.
- डॉ. एम. बी. पाटील, प्रमुख, फळ संशोधन केंद्र, औरंगाबाद


इतर अॅग्रो विशेष
गहू तांदूळ, कारळासह ओट्सच्या नव्या जाती...वृत्तसेवा - मध्य प्रदेशातील जबलपूर येथील राज्य...
इतर क्षेत्रांच्या तुलनेत कृषी...यंदाच्या आर्थिक वर्षात कृषी क्षेत्राने इतर...
गायीचे मायांग तिरके का होते?गाय किंवा म्हैस माजावर आल्यानंतर सोट टाकण्याचे...
महाविकास आघाडी सरकाचा निर्णय...महाविकास आघाडी सरकारने भुमी अधिग्रहण कायद्याला (...
युवा शेतकऱ्याचे अभ्यासपूर्ण प्रिसिजन...शेतीतील विज्ञानाचा अभ्यास, विविध देशांतील...
जातिवंत पैदाशीसह आदर्श गोठा व्यवस्थापनमाणकापूर (जि. बेळगाव, कर्नाटक) येथील प्रफुल्ल व...
खतांचे वाढीव दर कमी करा मुंबई : अनुदान मिळणाऱ्या खत पुरवठादारांनी...
तापमानात वाढ, गारठा होतोय कमी पुणे : राज्यात अशंतः ढगाळ हवामान असले तरी,...
पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या ...मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदा आणि सरकारच्या...
‘सहकार’ला पुन्हा हवे  लेखापरीक्षणाचे...पुणे ः राज्याच्या सहकार चळवळीतील गैरप्रकार...
बदलत्या वातावरणाचे बेदाणा निर्मितीवर...सांगली ः जिल्ह्यात बेदाणा निर्मितीला गती आली आहे...
तुरीच्या दरात काहीशी सुधारणा पुणे ः आठवडाभरात तुरीची आवक काहीशी मंदावली होती....
ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत  डॉ. एन. डी...  कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत,...
विद्यापीठांमधील कर्मचाऱ्यांचे ...पुणेः कृषी विद्यापीठांमध्ये रोजंदारीवर लागलेल्या...
पपईला मिळेना किलोला ४.७५ रुपयांचाही...जळगाव ः  खानदेशात पपई दर शेतकऱ्यांना...
तूर डाळ शंभरी गाठणार नागपूर ः खरीप पिकांना अवेळी आलेल्या पावसाचा फटका...
बीटी वांगी लागवडीसाठी १७...पुणे ः जनुकीय परावर्तित (जीएम) बियाणे बंदी...
हवामानशास्त्र विभागाचा अंदाज, पारा...  पुणे - दक्षिण कोकणावर गेल्या तीन...
भारतातून सोयापेंड निर्यात घसरली, जाणून...१) दक्षिण कोकणावर गेल्या तीन ते चार दिवसांपासून...
शेळ्या-मेंढ्यातील अतिसंसर्गजन्य पीपीआर...पीपीआर म्हणजे पेस्टी-डेस पेटीटस रुमीनन्ट्स....