Agriculture news in marathi Crisis on crops in Pangri area | Agrowon

पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकट

टीम अॅग्रोवन
रविवार, 20 सप्टेंबर 2020

पांगरी, जि. सोलापूर ः काढणीला आलेली सोयाबीन पिके तर अक्षरशः पाण्यात बुडाली आहेत. त्यांच्या शेंगांना अंकुर फुटले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडेच मोडल्याची विदारक स्थिती आहे.

पांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात गेल्या आठ दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात रोज पाऊस पडत आहे. त्यातच शुक्रवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीने खरीप हंगामातील पिकांची अवस्था केविलवाणी झाली आहे. पिकांचे ७० ते ८० टक्के नुकसान झाल्याची स्थिती आहे. काढणीला आलेली सोयाबीन पिके तर अक्षरशः पाण्यात बुडाली आहेत. त्यांच्या शेंगांना अंकुर फुटले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडेच मोडल्याची विदारक स्थिती आहे. दरम्यान, या भागात कांदा पिकाची ही मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. मात्र पावसामुळे त्याचेही मोठे नुकसान झाले आहे. 

यंदा जूनमध्येच समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे खरिपतील सोयाबीन, उडीद, मूग, कांदा,भाजीपाला आदी पिकांची पेरणी लवकरच करण्यात आली. मात्र अनेक ठिकाणी सोयाबीनची उगवण न झाल्याने दुबार पेरणी करावी लागली. पेरणीनंतर अधूनमधून होणाऱ्या पावसावर खरिप पिके जोमात आली. आता गेल्या आठ दिवसांपासूनच्या पावसाने सर्वत्र दलदल होऊन पिकांचे अतोनात नुकसान झाल्याची स्थिती आहे. 

यंदा पांगरीसह चिंचोली, पांढरी, उक्कडगाव, घोळवेवाडी, शिराळे, गोरमाळे, ममदापूर, जहानपूर, घारी, पूरी, ढेंबरेवाडी, खामगांव आदी भागात पेरण्या लवकर झाल्या. पिकेही जोमात आली. मात्र, आता होत्याचे नव्हते झाले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. सुर्यप्रकाश नसल्याने शेतातील सर्व कामे ठप्प आहेत. पुरेसे कांदा रोप नसल्यामुळे अनेकांनी पेरणी केली. मूग, मका पिकांनाही अतिपावसामुळे मोठ दणका बसला आहे. 

शेतकऱ्यांकडून पंचनाम्यांची मागणी

या खरिप हंगामातील पिकांचा पिकविमा अनेक शेतकऱ्यांनी भरला आहे. आता कृषी विभागासह विमा कंपनीने तत्काळ दखल घेऊन नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करावे. नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

अतिवृष्टीमुळे कांदा, सोयाबीन पिकाचे जवळपास ८० टक्के नुकसान झाले आहे. आणखीन पाऊस झाला, तर हातात काहीही राहणार नाही. विमा कंपनीने शंभर टक्के विमा मंजूर करावा.
- दिपक मुळे, शेतकरी, उक्कडगाव

पिकांच्या नुकसानीबाबत शासनाकडून अद्याप कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. त्या आल्यानंतर पंचनामे करण्यात येतील.
- विलास मिस्कीन, कृषी पर्यवेक्षक, पांगरी

रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रत्यक्ष नदीकाठच्या गावांतील शेतांत भेट देऊन पाहणी केली. नुकसानग्रस्त परिस्थितीचा अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात येईल. वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल.
- विनोद मुंढे, तलाठी, पांढरी सजा


इतर ताज्या घडामोडी
लाभार्थी शेतकऱ्यांचे अनुदान तातडीने अदा...बुलडाणा : शासन शेतकऱ्यांचा जीवनस्तर उंचविण्यासाठी...
‘कस्तुरी’चा दरवळ मृत्यूनंतरही कायमकोल्हापूर : गेल्या सत्तावीस वर्षांपासून तिने...
ट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धतीट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या...
जनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...
खानदेशात अत्यल्प पेरणीजळगाव ः खानदेशात या महिन्यात अपवाद वगळता हवा तसा...
नांदेडमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची...नांदेड : जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर...
परभणीत १२.६४ टक्के पेरणीपरभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात...
देशात वीज पडून दरवर्षी दोन हजार...पुणे : हरिताच्छादन कमी झाल्याने होणारी तापमान वाढ...
कांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रामणिकपणानाशिक : जगात प्रामाणिकपणा लोप पावत चालला असल्याची...
अन्नद्रव्यांवरून खतांचे व्यवस्थापन...गेवराई, जि. बीड : जमिनीतील उपलब्ध...
आंबेओहळ प्रकल्पात  ३० टक्के पाणीसाठाकोल्हापूर : आजरा तालुक्यात असलेल्या आंबेओहळ...
वनौषधी पानपिंपरीचे दर वाढल्याने...अकोला ः जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अकोट,...
नुकसान टाळण्यासाठी  मिश्र पिकांवर भरराळेगाव, जि. यवतमाळ : गेल्या वर्षी कपाशीवर आलेली...
यवतमाळमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्तयवतमाळ : परवान्यात नसतानाही खतांचा अनधिकृतपणे...
सांगली जिल्ह्यात खरिपाची २५ टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २...
सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेसाठी अर्ज...वाशीम : जिल्ह्यात २०२०-२१ ते २०२४-२५ या...
पुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा पुणे : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सविस्तर...
प्रताप सरनाईकांचे ठाकरेंना पत्र; ...मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी...
काळानुरूप बदल स्वीकारा : नितीन गडकरीवर्धा : बाजार समित्यांनी केवळ शेतमाल खरेदी विक्री...
संत्रा आयात शुल्कप्रकरणी बांगलादेशशी...अमरावती : नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार...