परभणीत दर कपातीमुळे दूध उत्पादकांसमोर संकट

खासगी डेअरींनी देखील दर कमी केले आहेत. परवडत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी जनावरांची विक्री केली. त्यामुळे तालुक्यातील दूध संकलनात सुमारे तीस हजार लिटरची घट झाली. शासकीय दुग्धशाळेने पूर्ववत संकलन केंद्र सुरु करावे. - विठ्ठल गिराम,शेतकरी, बाभळगाव, ता. पाथरी. सरकी पेंड, पशुखाद्याच्या किंमतीत तीनशे ते चारशे रुपयांनी वाढ झाली. दुधाच्या दरात लिटरमागे नऊ रुपयांनी घट झाली. अपुऱ्या खाद्यामुळे दूध उत्पादनावर परिणाम झाला. घरची चारा, वैरण असणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ जनावरे सांभाळता येत आहेत. - गणेशराव काष्टे, शेतकरी, राजेवाडी, ता. सेलू.
 Crisis in front of milk producers due to rate cut in Parbhani
Crisis in front of milk producers due to rate cut in Parbhani

परभणी : शासकीय दुग्धशाळेतील दूधाचे दर स्थिर आहेत. परंतु, पेमेंट वेळेवर मिळत नाही. लॉकडाऊमध्ये खासगी डेअरींनी दर कमी केले आहेत. पशुखाद्याच्या किंमती वाढल्या आहेत. या परिस्थितीत दुधाळ जनावरांचा सांभाळ शक्य नाही. त्यामुळे पशुपालकांनी दुग्ध व्यवसाय मोडीत काढले.

पुरक व्यवसायाव्दारे मिळणाऱ्या उत्पन्नाचा स्त्रोत बंद झाला. परंतु, शासकीय दुग्धशाळेकडून अपुरे मनुष्यबळ आणि तोकड्या शीतकरण यंत्रसामग्रीची कारणे सांगून दुध संकलनासाठी अनास्था दाखवली जात आहे. त्यामुळे दुग्धउत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

शासकीय दूध योजनेंतंर्गंत परभणी येथील दुग्धशाळेत फॅट आणि एसएनफच्या प्रमाणानुसार गायीच्या दुधाचे दर प्रतिलिटल २५ ते २७ रुपये, तर म्हशीच्या दुधाचे दर ३४ रुपये आहेत. खासगी डेअरीकडून गायीच्या दुधाला प्रतिलिटर २१ रुपये मिळत आहेत. लॅाकडाऊनमुळे हॅाटेल्स, मिठाई, आईस्क्रिम आदी व्यवसाय बंद आहेत.  त्यामुळे दूधची मागणी कमी झाली. शासकीय दूध शाळेतील संकलनात काही प्रमाणात वाढ झाली. परंतु, गेल्या वर्षीपासून शासनाकडून निधी उपलब्ध करुन दिला नाही. हे कारण सांगत शासकीय दुग्धशाळेकडून दुधाचे पेमेंट, संकलन संस्थाचे कमिशन देण्यास अडीच ते तीन महिने विलंब लावला जात आहे.

अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आठमुठ्या भूमिकेमुळे चांगल्या प्रतीचे दूध देखील नाकारले जात आहे. सदोष मोजणी यंत्रामुळे मापात तफावत येत आहेत. या सर्व प्रकारामुळे शेतकरी तसेच संस्था आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत.

पाथरी येथे तीन खासगी डेअरींनी संकलन सुरु केले. गायीच्या २९ रुपये, तर म्हशीच्या दुधाला प्रतिलिटर ५० रुपयांपर्यंत दर दिला जात असे. परंतु, लॉकडाऊनमुळे खासगी डेअरींनी गायीच्या दुधाचे दर २१, तर म्हशीच्या दुधाचे दर ३५ रुपयांपर्यंत कमी केले. त्यामुळे दुध उत्पादकांना तोटा सोसावा लागला. 

दुग्ध व्यवसाय काढला मोडित

सरकी पेंडीचे दर प्रतिक्विंटल २ हजार ३०० रुपयांवरुन २ हजार ६०० रुपये पर्यंत वाढले. कडब्याचे दर अडीच ते तीन हजार रुपये शेकड्यापर्यंत पोचले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुधाळ जनावरांना गरजेएवढे खाद्य देता येत नाही. त्यामुळे दूध उत्पादन कमी झाले. अनेक शेतकऱ्यांनी नाईलाजाने दुधाळ जनावरांची विक्री करुन दुग्ध व्यवसाय मोडित काढले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com