agriculture news in marathi Crisis on paddy cultivation in Ratnagiri | Agrowon

रत्नागिरीत भातशेतीवर अस्मानी संकट

टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 ऑक्टोबर 2020

रत्नागिरी : ‘‘ऑक्टोबर महिन्यातील मुसळधार पावसामुळे भातशेतीवर अस्मानी संकट कोसळले आहे. अनेकांची भात पिके वाहून गेली. तर, आडव्या भाताला मोड आले आहेत.

रत्नागिरी : ‘‘ऑक्टोबर महिन्यातील मुसळधार पावसामुळे भातशेतीवर अस्मानी संकट कोसळले आहे. अनेकांची भात पिके वाहून गेली. तर, आडव्या भाताला मोड आले आहेत. भात पावसात भिजल्याने मिळणाऱ्या तांदळाचा दर्जा घसरणार आहे. भात भरडल्यावर कणी, पिवळा तांदूळ हाती लागेल. गुरांना खाण्या योग्य पेंढाच राहिलेला नाही. हेक्टरी येणाऱ्‍या उत्पादनात १५ टक्के घट होईल’’, असा अंदाज भात संशोधकांनी व्यक्त केला.

जिल्ह्यात यंदा ६८ हजार हेक्टरवर भात, तर ९ हजार हेक्टरवर नाचणीची लागवड झाली आहे. यंदा भातशेतीला पूरक वातावरण राहिल्याने ती चांगली येईल,  असा अंदाज होता. कीडरोगाचाही प्रादुर्भाव आटोक्यात होता; मात्र ऑक्टोबरच्या सुरवातीपासूनच पावसाचे ग्रहण लागले. १० ऑक्टोबरपासून धुमाकूळच घातला. त्यात हळव्याची ६० टक्के, तर गरव्याची ३० टक्के कापणी सापडली आहे. अर्जुना, कोदवली, मुचकुंदी, काजळी, बावनदी, शास्त्री या नद्यांच्या किनाऱ्‍यावरील शेतीत पुराचे पाणी घुसले. 

जिल्ह्यात सुमारे ५ हजार हेक्टरपर्यंत शेतीचे नुकसान होईल, असा अंदाज आहे. त्यात सर्वाधिक नुकसान हे आडव्या झालेल्या भातावर पाऊस पडल्याने होत आहे. त्या भाताला पुन्हा कोंब आले आहेत. झोडले तरी त्यातून काहीच हाती लागणार नाही.

पावसामुळे अनेक ठिकाणी भात रुजले आहे. सध्या पाऊस थांबल्यामुळे कापणी सुरु झाली आहे. भिजलेला भात वाळवून झोडला पाहिजे. पाण्यात राहिलेल्या भाताच्या दर्जावर परिणाम होणार आहे. तो खाण्याच्या योग्यतेचा राहणार नाही.
- डॉ. भरत वाघमोडे, भात संशोधक, शिरगा


इतर ताज्या घडामोडी
नगरमध्ये डाळिंबाच्या दरात सुधारणानगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
एफआरपीप्रश्नी सोलापूर जिल्ह्यातील बैठक...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी अद्यापही...
नांदेड जिल्ह्यात ढगाळ वातावरणाचा...नांदेड : खरिपातील नुकसानीनंतर शेतकऱ्यांनी...
शहीद नितीन भालेराव अनंतात विलीननाशिक : भारतीय निमलष्कराच्या केंद्रीय राखीव पोलिस...
डाळिंब, आंब्याच्या विम्यासाठी ३१...नाशिक : ‘‘राज्य शासनाच्या पुनर्रचित हवामान आधारित...
परभणी, पाथरी, गंगाखेडमधील कापसाची...परभणी : ‘‘राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...
परभणीतील अपात्र शेतकऱ्यांकडून ‘शेतकरी...परभणी : पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम- किसान...
खानदेशात रब्बीसाठी आवर्तनांची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात सर्वच प्रकल्पांमधील जलसाठे मुबलक...
औरंगाबाद, बीड जिल्ह्यात विशेष पथके...औरंगाबाद : औरंगाबाद व बीड जिल्ह्यात बिबट्याच्या...
जळगाव जिल्हा परिषदेत रिक्त पदांमुळे...जळगाव : ग्रामविकासाचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्हा...
अंबड तालुक्यात चार ठिकाणी कापूस खरेदी...अंबड, जि. जालना : तालुक्यात चार ठिकाणी कापूस...
पपई उत्पादकांना खर्चही निघेनाअकोला : पारंपरिक पिकांची चाकोरी सोडत शेतकरी...
मराठवाड्यात तुरीवरच शेतकऱ्यांचे आर्थिक...औरंगाबाद : यंदा अतिपावसाने उडीद, सोयाबीनचे अतोनात...
खडकपूर्णा धरणाचे आवर्तन अखेर सुरूबुलडाणा : देऊळगावराजा तालुक्यातील शेतकऱ्यांना...
...तर महावितरणचे कार्यालय जाळणार :  आ....अमरावती :  वरुड, मोर्शी तालुक्यांत...
मक्यावर अमेरिकन लष्करी अळीनगर  : नगर तालुक्यातील पिंपळगाव वाघा परिसरात...
पुण्यात भात काढणी अंतिम टप्प्यातपुणे  : दिवाळी सणामुळे भात पट्यात अनेक...
टेंभूचे आवर्तन सुरू करण्याची मागणीकडेगाव, जि. सांगली  : रब्बी हंगामासाठी टेंभू...
सांगलीत एफआरपीची प्रतीक्षासांगली : जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊस...
शेतकऱ्यांच्या अनुदानाबाबत ठाकरे सरकार...नांदेड : निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांनी...