Agriculture news in marathi Crisis of wasted sowing in Sangli district due to lack of rains | Agrowon

सांगली जिल्ह्यात पावसाअभावी पेरणी वाया जाण्याचे संकट

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 जुलै 2020

सांगली : अद्यापही पावसाने हजेरी लावली नाही. पावसाच्या मनमानीपणामुळे  उर्वरित क्षेत्रातील पेरणी थांबली आहे, तर आगाप पेरणी वाया जाण्याची, तसेच दुबार पेरणीची धास्ती आहे.

सांगली : जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यांपासून पावसाने उघडीप दिली. त्यामुळे खरिपाचा आगाप पेरा वाया जाण्याचे संकट आहे. आता जुलैचा आठवडा संपतो आहे. अद्यापही पावसाने हजेरी लावली नाही. पावसाच्या मनमानीपणामुळे  उर्वरित क्षेत्रातील पेरणी थांबली आहे, तर आगाप पेरणी वाया जाण्याची, तसेच दुबार पेरणीची धास्ती आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामासाठी साधारणपणे ३ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्र उपलब्ध आहे. मात्र, आजअखेर ७५ टक्क्यांच्या घरात कशीबशी पेरणी झाली आहे. जवळपास एक ते सव्वा लाख हेक्टर क्षेत्र पेरणीच्या प्रतीक्षेत आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाचे आगमन लांबले आहे. मात्र, चांगल्या पावसाचे वर्तवलेले  अंदाज, यांमुळे शेतकऱ्यांसह अवघ्या समाजमनाला पावसाच्या आगमनाची  प्रतीक्षा होती. मात्र, आजअखेर दमदार  पावसाने हजेरी लावलीच नाही.

जून संपला तरी अद्याप पावसाची समाधानकारक हजेरी  लागलेली नाही. त्यामुळे तीन आठवड्यांपूर्वी पेरा झालेले क्षेत्र धोक्यात आले आहे. साधारणपणे जूनच्या दुसऱ्या,‍ तिसऱ्या आठवड्यात पेरणी बऱ्यापैकी होते. जिल्ह्यात सोयाबीन, भुईमूग, बाजरी, मका, तूर, उडीद, मूग आदी पिकांची आतापर्यंत जेमतेम पेरणी झाली आहे. शिराळा तालुक्यात मात्र भाताची धूळवाफ पेरणी बऱ्यापैकी झाली आहे. प्रामुख्याने शिराळा तालुक्यात या वेळी भाताचे क्षेत्र वाढले आहे. पावसाने जरी विलंब केला असला, तरी या तालुक्यात भाताची लावणी पूर्ण झाली आहे. वाळवा, पलूस तालुक्यांसह मिरज पश्चिम भागात केवळ सोयाबीन टोकणीचे धाडस काही शेतकरी करू लागले आहेत.

दुष्काळी भागात खरीप लांबण्याची शक्यता

कवठेमहांकाळ, जत, आटपाडी, खानापूर तालुक्यांतील शेतकरी मात्र शेतीमशागती करून पेरणीसाठी सज्ज आहेत. मात्र, पावसाने जोर धरला नसल्याने पेरणीस गती नाही. कापूस पिकाचे क्षेत्र आटपाडी तालुक्यासह कवठेमहांकाळ तालुक्यात घटले  आहे. आठवडाभरात पावसाने हजेरी लावली नाही, तर केलेला पेरा वाया जाईल. शिवाय खरीप हंगामच लांबण्याची  भीती  आहे. सध्या  जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

पावसाविना शेतकरी चिंतातुर

अजून पावसाने हजेरी लावलेली नाही. आता खरीप हंगाम लांबल्यातच जमा आहे. एकीकडे उन्हाळी पाऊस दमदार झाल्याने शेतकरी आनंदी होते. मात्र, पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातुर आहे. जून संपला तरी देखील बहुतांशी क्षेत्रातील पावसाअभावी पेरणी खोळंबली होती. मात्र, आता शेतकरी अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या हंगामात पावसाने दडी मारल्याने खरिपाचे नुकसान झाले होते.


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात भिज पावासाने पिकांना लाभजळगाव  ः खानदेशात मागील दोन दिवस भिज पाऊस...
सोलापूर जिल्ह्यात मूगाची पाने पिवळी पडू...सोलापूर  ः जिल्ह्यात पावसाने वेळेवर हजेरी...
प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या...कुसुंबा, जि. धुळे ः सर्वांत मोठा नोकर वर्ग म्हणून...
बार्शीतील रेशनच्या धान्य...सोलापूर  ः बार्शी तालुक्यातील रेशनचे धान्य...
शेत जमिनीच्या मोजणीसाठी चार हजार...सोलापूर ः पती-पत्नीच्या नावावर असलेल्या...
‘आयआयएचआर’चे बियाणे आता ऑनलाइन नाशिक : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या बंगळुरू...
मराठवाड्यात पीक कर्जाचे ४०.८३ टक्केच...औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकऱ्यांना खरीप पीक...
पुणे जिल्ह्यातील सहा धरणांत ८०...पुणे ः धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम...
सातारा जिल्हा बँकेतर्फे १३४ टक्के...सातारा : जिल्हा वार्षिक पत आराखाड्यात २०२०-२१...
जनावरांमध्ये `लंपी स्किन`चा संसर्ग नांदेड  ः अर्धापूर परिसरात गाय, बैल आदी...
नांदेड जिल्ह्यातील एक लाख ९२ हजार...नांदेड  ः यंदा जिल्ह्यातील २ लाख ६८ हजार...
ओसंडून वाहतोय आडोळ प्रकल्पशिरपूरजैन, जि. वाशीम ः दमदार पावसामुळे येथील आडोळ...
काटेपूर्णा प्रकल्प तुडुंब, पाणी साठ्यात...अकोला ः यंदाच्या मोसमात आत्तापर्यंत वेगवेगळ्या...
अकोला जिल्ह्यात युरिया खताचा वापर वाढलाअकोला ः जिल्ह्यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत...
राधानगरी धरणाचे दोन दरवाजे खुलेचकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील...
नाशिक शहरात बैलपोळा साहित्याच्या...नाशिक : गेल्या वर्षांपासून शेतीमालाचे नुकसान व...
मालेगाव तालुक्यात भाजीपाल्यासह खरीप...नाशिक : मालेगाव तालुक्यातील पश्चिम भागात झालेल्या...
येलदरीच्या दोन दरवाजातून विसर्गपरभणी : बुलडणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणातील...
सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरलासांगली ः जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे....
नाशिकमध्ये ढोबळी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...