agriculture news in Marathi criteria of fishery package will be loose Maharashtra | Agrowon

मत्स्य पॅकेजमधील जाचक अटी शिथिल करण्यासाठी प्रयत्न सुरू

टीम अॅग्रोवन
सोमवार, 28 डिसेंबर 2020

मच्छीमारांच्या मागणीनंतर मत्स्य पॅकेजमधील जाचक अटी शिथिल करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात मुंबईत मत्स्य व्यवसायमंत्री अस्लम शेख आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

सिंधुदुर्गनगरी ः मच्छीमारांच्या मागणीनंतर मत्स्य पॅकेजमधील जाचक अटी शिथिल करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात मुंबईत मत्स्य व्यवसायमंत्री अस्लम शेख आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बैठक झाली. मच्छीमारांच्या मागणीचा प्रामुख्याने विचार करीत जाचक अटी शिथिल करण्याचा निर्णय यामध्ये घेण्यात आल्याचे मच्छीमारांकडून सांगण्यात येत आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मच्छीमारांना ६५ कोटीचे मत्स्य पॅकेज जाहीर केले. परंतु हा लाभ देताना शासनाने घातलेल्या अटीमुळे तो लाभ मर्यादित मच्छीमारांना मिळणार होता. त्यामुळे मच्छीमारांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत होता. त्यामुळे मच्छीमारांनी मालवण येथील मत्स्य विभागाच्या कार्यालयासमोर मोर्चा काढून आपल्या मागण्या नोंदविल्या होत्या.

त्यामध्ये प्रामुख्याने एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ देण्याची अट रद्द करावी, गिलनेट धारक, रापण संघ, आऊट बोट आणि इतर बोटीद्वारे मासेमारी करणाऱ्या सर्वांना लाभ द्यावा, मत्स्यविक्रेत्यांना लाभ द्यावा यांसह विविध मागण्या केल्या होत्या. या मागण्यांची दखल पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांनी घेत हा प्रश्‍न मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्यासमोर मांडला. त्यानंतर या विषयाबाबत चर्चा करण्यासाठी नुकतीच मंत्री शेख यांनी बैठक आयोजित केली होती. या बैठकीला पालकमंत्री सामंत, आमदार नाईक, शिवसेनेचे नेते संदेश पारकर आदी उपस्थित होते.

मंत्र्यांचे आश्‍वासन
या बैठकीत मच्छीमारांना जाचक ठरणाऱ्या अटी शिथिल करण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा झाली. जाचक अटी शिथिल करण्यासंदर्भात लवकरच परिपत्रक काढले जाईल, असे शेख यांनी सिंधुदुर्गातील लोकप्रतिनिधींना सांगितले. जाचक अटी शिथिल करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाल्यामुळे मच्छीमारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
 


इतर ताज्या घडामोडी
देवसंस्थांच्या जमिनीवर वहिवाटदारांचा...जेजुरी, जि. पुणे : देवसंस्थानच्या मालकीच्या...
पुरस्कारांच्या प्रस्तावावरून कृषी...अकोला : विविध पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांनी दाखल...
कोयना धरणात १०१ टीएमसीवर पाणीसाठाकोयनानगर, जि. सातारा : शंभर दिवस ओलांडलेल्या...
उजनी धरणात उपयुक्त साठा ६४ टक्केच;...सोलापूर : उजनी धऱणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही...
अकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा...अकोला ः जिल्ह्यात अतिपावसाने धुमाकूळ घातला असून...
राज्यात तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...नाशिक : राज्यातील तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...
वाशीम झेडपी निवडणुकीचा चेंडू पुन्हा...वाशीम : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रिक्त...
‘एफआरपी’च्या तुकड्यांनी शेतकरी...कऱ्हाड, जि. सातारा : एकरकमी ‘एफआरपी’चे तीन तुकडे...
हिंगोलीत मुहूर्ताच्या सोयाबीनला ११ हजार...हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
पीक नुकसान नोंदीसाठी विमा कंपन्यांच्या...परभणी : ७२ तासांच्या आत पीक नुकसानीची नोंद...
राज्यसभेच्या एका जागेसाठी ४ ऑक्टोबरला...नवी दिल्ली : महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त...
गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग सज्ज; तीन...सिंधुदुर्गनगरी : घरोघरी गणेशोत्सव साजरा करण्याची...
ई-पीक पाहणीसाठी सोलापुरचे जिल्हाधिकारी...सोलापूर ः माढा तालुक्यात सुरू असलेल्या ई-पीक...
परभणी जिल्ह्यात १२७ गावे बाधितपरभणी ः जिल्ह्यात सोमवार (ता. ६) ते मंगळवार (ता....
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूभुसावळ, जि. जळगाव : तालुक्यातील हतनूर धरणात...
संगणकीय सातबारावर कुळांची नावे नोंद करागडहिंग्लज, जि. कोल्हापूर : हस्तलिखित सातबारा...
पावसाचा २७ हजार हेक्टरला फटकानाशिक : नांदगाव तालुक्यातील झालेल्या...
सहा हजार क्विंटल धान्याचे होणार कंपोस्ट...भंडारा : वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गेल्या...
शेतकरी पुरस्कारासाठी दाखल केलेले...अकोला : शेतीत विविध प्रयोग करणाऱ्या, उत्पादन...
एकरकमी ‘एफआरपी’साठी ‘मिस कॉल’ मोहीमकोल्हापूर : केंद्र सरकारने ‘एफआरपी’चे तुकडे...