agriculture news in Marathi Criteria of soybean germination capacity rule relaxation Maharashtra | Agrowon

सोयाबीन बियाण्यासाठी उगवण क्षमता निकष सैल 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 28 एप्रिल 2020

केंद्र सरकारने बियाणे उत्पादक कंपन्यांना येत्या खरिपापुरती उगवण क्षमतेच्या निकषात पाच टक्क्यांनी सूट दिलेली आहे. मात्र, ही सूट फक्त प्रमाणित बियाण्यांसाठी लागू राहील. 
- विजयकुमार घावटे, गुणनियंत्रण संचालक, कृषी आयुक्तालय 

पुणे: राज्यात यंदा सोयाबीन बियाण्यांच्या तुटवड्याचे संकेत मिळत असल्यामुळे केंद्र सरकारने उगवणक्षमतेच्या मुळ निकष काहीसे सैल केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय काही प्रमाणात दूर होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

खरिपासाठी लागणाऱ्या बियाण्यांच्या उपलब्धतेचा आढावा घेण्याचे काम गेल्या दोन महिन्यांपासून सुरू होते. सोयाबीन वगळता इतर बियाण्यांबाबत बाजारपेठेत अडचणी येणार नाहीत, असे या आढाव्यातून लक्षात आले. केंद्राला देखील ही माहिती देण्यात आली होती. 

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयातील सहआयुक्त डॉ.दिलीप श्रीवास्तव यांनी या समस्येवर तोडगा निघाल्याचे आपल्या पत्रात नमुद केले आहे. ‘‘सोयाबीन बियाण्यांसाठी उगवण क्षमता प्रमाण आता ७० टक्क्यांऐवजी ६५ टक्के गृहीत धरले जाईल,’’ असे सहआयुक्तांनी स्पष्ट केले आहे. 

सोयाबीन बियाण्यांचे केंद्राने मंजूर केलेले निकष 

  • प्रमाणित व पायाभूत बियाण्यांसाठी उगवण क्षमता प्रमाण आता ६५ टक्के गृहीत धरता येईल 
  • ही सूट केवळ ३१ जुलै २०२० पर्यंतच्या लॉटसाठीच वैध राहील 
  • ‘उगवणक्षमता निकषात शिथिलता’ असे लाल शाईने प्रत्येक बॅगवर लिहावे लागेल 
  • बियाण्यांच्या दर्जात कमीपणा न आणता पॅकिंग करताना प्रतिएकरी पुरेसे बियाणे लागेल याची काळजी लागेल. 

इतर अॅग्रो विशेष
ऊस गाळप यंदा वाढणार कोल्हापूर: गेल्या वर्षी महापूर व अवर्षणामुळे...
चिकन, अंड्यांची मागणी वाढली, दरात...नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...
ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत साखर...पुणे: राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या...
शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणार लालपरी सोलापूर : एक लाखांहून अधिक कर्मचारी, साडेसतरा...
राज्यात सर्वदूर हलक्या पावासाची शक्यतापुणे ः राज्यातील अनेक भागांत कमी अधिक स्वरूपात...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पुणे ः उत्तर भारतात परतीच्या पावसासाठी पोषक...
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री...कन्नड, जि. औरंगाबाद: अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक...
तीनशे टन हळद बांगलादेशाला निर्यात नांदेड : शेतीमालास अधिकचा दर मिळावा, यासाठी...
मुहूर्ताचा कापूसच कवडीयुक्त अकोला: यंदा दसऱ्याआधीच कापूस वेचणीचा मुहूर्त अनेक...
कृषी उपसंचालकानेच घातली कृषी उपक्रमांना...यवतमाळ: आत्महत्याग्रस्त अशी जागतिक स्तरावर ओळख...
महिला गट बनवितो ३० प्रकारचे मसालेइटकरे (ता.वाळवा,जि.सांगली) येथील उपक्रमशील महिला...
मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधारपुणे : राज्यातील बहुतांशी भागातील पावसाचे...
राज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस...
एक हजार प्राध्यापकांनी वयाची साठी...पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमधील...
सूक्ष्म अन्न उद्योगांना मिळणार आता दहा...पुणे: राज्यात लवकरच पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग...
कृषी, कामगार विधेयकांची राज्यात...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर करुन घेतलेली...
शेतकरी आंदोलनाचे सात राज्यांत पडसादचंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध...
सोयाबीन बियाणे प्लॉटना फटकाऔरंगाबाद: सध्याचे पावसाचे प्रमाण व त्यामुळे...
केळी विमा निकषांबाबत उत्सुकताजळगाव ः राज्य सरकारच्या चुकांमुळे हवामानावर...
अडीच हजार हेक्टर भातशेती सततच्या...सिंधुदुर्ग ः हळवी आणि भिजवणीची लागवड केलेली...