agriculture news in Marathi, crop and homes damage in Kolapur and Sangali due to flood, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

कोसळली घरे, बुडाले संसार, पिके गेली वाया

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

कोल्हापूर/सांगली : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूर ओसरण्यास सुरवात झाली आहे. मात्र, जसा पूर ओसरत आहे तशी परिस्थितीची भयानकता दिसू लागली. मरून पडलेली जनावरे, कोसळलेली घरे, बुडालेले संसार आणि पिके पाहताना पाहून ग्रामस्थांना अश्रू अनावर होत आहेत. कोट्यवधी रुपयांचे नुकसान आता ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना असह्य होत आहे. 

कोल्हापूर/सांगली : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूर ओसरण्यास सुरवात झाली आहे. मात्र, जसा पूर ओसरत आहे तशी परिस्थितीची भयानकता दिसू लागली. मरून पडलेली जनावरे, कोसळलेली घरे, बुडालेले संसार आणि पिके पाहताना पाहून ग्रामस्थांना अश्रू अनावर होत आहेत. कोट्यवधी रुपयांचे नुकसान आता ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना असह्य होत आहे. 

सांगली जिल्ह्यात पुरामुळे पाच तालुक्‍यांतील तब्बल ५८ ते ६० हजार हेक्‍टरवरील ऊस, केळी, भाजीपाला, सोयाबीन, मका, फुलांचे सरासरी एकरी पंचवीस हजार रुपयांप्रमाणे नुकसान झाल्याचे मानले तरी सुमारे ३७५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्या अनेक भागातील शेतात पाणी असल्याने बाधित झालेले क्षेत्र वाढण्याची शक्‍यता असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यातील कृष्णा-वारणा नदीकाठाशेजारी १०७ गावे आहेत. वाळवा, शिराळा, पलूस, कडेगाव, मिरज तालुक्‍यातील नदीपात्राशेजारील शेती असणाऱ्या गावांची संख्या १३७ हून अधिक आहे;  तसेच अनेक ठिकाणी सखल भागांतील शेतात पाणी साचून राहिले होते. त्यामुळे खरीप हंगामातील पिके पाण्याखाली गेली आहेत. पिके पाण्यात असल्याने कुजली आहेत; तर काही ठिकाणची शेतजमीन पुरामुळे वाहून गेली आहे.

सांगलीत महापुराचे पाणी ओसरले असून महापालिका क्षेत्रात आता स्वच्छतेचे काम वेगाने सुरू झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून विविध भागात स्वच्छता सुरू झाली आहे. आयर्विन पुलाजवळील पाण्याची पातळी ५० फूट इतकी झाली असून एक दिवसात ४ फूट पाणी कमी झाले आहे. पुराचे पाणी शहरात आले त्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण आले असल्याने महापालिकेने स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. 

कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणीपातळी रविवारी सकाळी दुपारी दोन वाजता ४८ फूट होती, एकूण ८४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणात आजअखेर ८.२१ टीएमसी पाणीसाठा आहे. चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा कोदे लघुप्रकल्प, पाटगाव व जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. 

दरम्यान, जिल्ह्यांसाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे. राजकीय नेतेही पूरग्रस्त भागाला भेट देत आहेत. केंद्रीय मंत्री रामदास आठवले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी येथे भेट दिली.

मदतकार्यासाठी सरसावले नागरिक

  • सांगली जिल्ह्यात १४ हजार ८९१ लोकांवर औषधोपचार
  • सांगलीत ४२ हजारहून अधिक जनावरांचे पुनर्वसन
  • सांगलीतील पूरग्रस्त गावांपैकी १७ गावांना बोटीने संपर्क 
  • जनावरांसाठी सांगलीत ३० टन चारा वाटप
  • शासनातर्फे २५० गावात होणार स्वच्छता मोहीम

अनेक रस्ते सुरु

  • सांगली- तासगाव मार्ग सुरू
  • पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्ग सुरू
  • कोल्हापुरातील उत्तुर ते आजरा मार्गावरील व्हिक्टोरीया पुल खुला 
  • सांगलीत रस्त्यांचे १८६ कोटी २५ लाखाचे नुकसान 
  • कोल्हापूर- सांगली मार्ग अवजड वाहनांसाठी सुरू

पुरानंतरची भीषणता

  •   पूर ओसरल्याने घाणीचे साम्राज्य 
  •   घरांमध्ये साप आणि विंचूसह विषारी प्राण्यांचा वावर
  •   वर्षभरासाठी ठेवलेल्या धान्याचे नुकसान
  •   घरातील सर्व जीवनाश्‍यक वस्तूंचे नुकसान
  •   हजारो घरांची पडझड
  •   हजारो जनावरे वाहून गेली
  •   पुरात दगावलेली जनावरे गावांतच पडून
  •   बैलगाडी, शेती औजारांसह उपयोगी साहित्य गेले वाहून
  •   कृषी निविष्ठांचे पाण्यामुळे नुकसान
     

इतर बातम्या
बुलडाणा जिल्ह्यात १५ तारखेपर्यंत...बुलडाणा  : यंदा जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पाऊस...
जयपूरमध्ये वीज पडून लाखो रुपयांच्या...नाशिक : पूर्वमोसमी पाऊस सुरू झाल्यानंतर बागलाण...
कर्जमुक्‍ती योजनेची प्रक्रिया ३०...भंडारा ः शासनाने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतिराव...
कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांचा रास्तारोकोयवतमाळ ः महागाव तालुक्‍यातील गुंज येथील...
सातारा जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीसातारा ः जिल्ह्यात सोमवारी सर्वदूर पावसाने हजेरी...
भाजीपाल्याची थेट खरेदी विक्री व्यवस्था...पुणे ः कोरोना टाळेबंदीमध्ये शहरातील विविध भागात...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पुणे: अरबी समुद्रात तयार झालेल्या ‘निसर्ग’...
कोरोनाच्या लढाईत पूर्ण सहकार्य ः डॉ....सोलापूर ः कोरोनाच्या लढाईत भाजपचा प्रत्येक...
पुणे जिल्ह्यात पीककर्ज वितरणात...पुणे ः लाॅकडाऊनच्या काळात होरपळून निघालेल्या...
पावसाळा संपेपर्यंत पुरतील इतक्‍या...सोलापूर : लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर राज्यातील...
पुण्यातील पश्चिम तालुक्यांत हायअलर्ट...पुणे : अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग...
‘निसर्ग’चक्रीवादळाची तीव्रता वाढली;...पुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्र, कर्नाटकच्या...
हमीभाव जाहीर : कपाशीत २६०, सोयाबीनमध्ये...नवी दिल्ली : केंद्र सरकारने खरीप २०२०-२१करिताचे...
अल्पमुदतीच्या कृषिकर्ज फेडीस...नवी दिल्ली : तीन लाखांपर्यंतच्या अल्पमुदतीच्या...
कोरोनाच्या संकटात कृषी, पणन खाते अपयशी...नाशिक : ‘‘कोरोनाच्या अडचणीच्या काळात शेतकऱ्यांचा...
मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर सर्वांनी...औरंगाबाद : ‘‘मराठवाड्यासाठी वॉटर ग्रीड अत्यंत...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात पाऊस नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ११८...
टोकन प्रक्रियेत गैरप्रकार केल्यास...परभणी : ‘‘बाजार समित्यांमार्फत टोकन देण्याच्या...
नगर जिल्ह्यात एकशे तीन टॅंकरने...नगर : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागल्याने...
परभणी जिल्ह्यात पीककर्जासाठी पेरणीच्या...परभणी : जिल्ह्यातील अनेक गावातील तलाठी पीककर्ज...