सोलापुरात खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी पीक स्पर्धा

जिह्यातील शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाअधिक उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती करणे आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाने खरीप पीक स्पर्धा आयोजित केली आहे.
Crop competition for farmers during kharif season in Solapur
Crop competition for farmers during kharif season in Solapur

सोलापूर : जिह्यातील शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाअधिक उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती करणे आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाने खरीप पीक स्पर्धा आयोजित केली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे.

राज्य, जिल्हा, विभाग व तालुका पातळ्यांवर खरीप हंगाम २०२१ मध्ये पीक स्पर्धा राबविण्यात येणार आहेत. खरीप हंगाम मूग व उडीद पिकासाठी ३१ जुलै २०२१ पूर्वी तसेच इतर खरीप पिकासाठी भात, खरीप ज्वारी, बाजरी, मका, तूर, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल इत्यादी पिकासाठी ३१ ऑगस्ट २०२१ पूर्वी अर्ज सादर करावेत. राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येत असल्याने उत्पादकतेमध्ये वाढ होत आहे. 

अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढविण्यास मदत होईल. ते अधिक उमेदीने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करतील, हा उद्देश ठेवून पीक स्पर्धा राबविण्यात येणार आहेत. एक शेतकरी एकापेक्षा अधिक पिकासाठी स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकेल. सर्व पातळ्यांवर एकदाच शेतकऱ्यांचा थेट सहभाग होण्यासाठी ३०० रुपये चलनाद्वारे तालुका पातळीवर प्रति शेतकरी प्रति पीक प्रवेश शुल्क भरून उत्पादकतेच्या आकडेवारीनुसार विविध पातळ्यांवर निवड केली जाणार आहे.

अशी असतील बक्षिसे  तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य पातळी अशा चार स्तरांवर या स्पर्धा होणार आहेत. तालुका पातळीवर पहिल्या विजेत्याला पाच हजार रुपये, द्वितीय विजेत्याला ३००० रुपये आणि तृतीय विजेत्याला २००० रुपयांचे बक्षिस मिळेल. तर जिल्हास्तरावर अनुक्रमे १० हजार रुपये, ७ हजार रुपये आणि पाच हजार रुपये अशी तीन बक्षिसे दिली जातील. तर विभाग पातळीवर २५ हजार रुपये, २० हजार रुपये आणि १५ हजार रुपये अशी तीन बक्षिसे दिली जातील. तर राज्य स्तरावर पहिले बक्षीस ५० हजार रुपये, दुसरे ४० हजार रुपये आणि तिसरे ३० हजार रुपयांचे बक्षीस असेल, असेही सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com