Agriculture news in Marathi Crop competition for farmers during kharif season in Solapur | Agrowon

सोलापुरात खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी पीक स्पर्धा

टीम अॅग्रोवन
बुधवार, 16 जून 2021

जिह्यातील शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाअधिक उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती करणे आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाने खरीप पीक स्पर्धा आयोजित केली आहे.

सोलापूर : जिह्यातील शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाअधिक उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती करणे आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाने खरीप पीक स्पर्धा आयोजित केली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे.

राज्य, जिल्हा, विभाग व तालुका पातळ्यांवर खरीप हंगाम २०२१ मध्ये पीक स्पर्धा राबविण्यात येणार आहेत. खरीप हंगाम मूग व उडीद पिकासाठी ३१ जुलै २०२१ पूर्वी तसेच इतर खरीप पिकासाठी भात, खरीप ज्वारी, बाजरी, मका, तूर, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल इत्यादी पिकासाठी ३१ ऑगस्ट २०२१ पूर्वी अर्ज सादर करावेत. राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येत असल्याने उत्पादकतेमध्ये वाढ होत आहे. 

अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढविण्यास मदत होईल. ते अधिक उमेदीने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करतील, हा उद्देश ठेवून पीक स्पर्धा राबविण्यात येणार आहेत. एक शेतकरी एकापेक्षा अधिक पिकासाठी स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकेल. सर्व पातळ्यांवर एकदाच शेतकऱ्यांचा थेट सहभाग होण्यासाठी ३०० रुपये चलनाद्वारे तालुका पातळीवर प्रति शेतकरी प्रति पीक प्रवेश शुल्क भरून उत्पादकतेच्या आकडेवारीनुसार विविध पातळ्यांवर निवड केली जाणार आहे.

अशी असतील बक्षिसे 
तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य पातळी अशा चार स्तरांवर या स्पर्धा होणार आहेत. तालुका पातळीवर पहिल्या विजेत्याला पाच हजार रुपये, द्वितीय विजेत्याला ३००० रुपये आणि तृतीय विजेत्याला २००० रुपयांचे बक्षिस मिळेल. तर जिल्हास्तरावर अनुक्रमे १० हजार रुपये, ७ हजार रुपये आणि पाच हजार रुपये अशी तीन बक्षिसे दिली जातील. तर विभाग पातळीवर २५ हजार रुपये, २० हजार रुपये आणि १५ हजार रुपये अशी तीन बक्षिसे दिली जातील. तर राज्य स्तरावर पहिले बक्षीस ५० हजार रुपये, दुसरे ४० हजार रुपये आणि तिसरे ३० हजार रुपयांचे बक्षीस असेल, असेही सांगण्यात आले.


इतर ताज्या घडामोडी
युरियाची विषबाधा टाळण्यासाठी काळजी...युरियाची विषबाधा ही सर्व पाळीव प्राण्यांमध्ये...
जळगाव जिल्ह्यात ५७ टक्के पाऊसजळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत ५७ टक्के पाऊस झाला...
शनिवारपर्यंत सुरू राहणार मका, ज्वारीची...औरंगाबाद : राज्यात रब्बीतील मका व ज्वारी खरेदीला...
परभणी जिल्ह्यात पीकविमा तक्रारींचा...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत टोल फ्री...
नाशिक जिल्ह्यात धरणसाठा ४६ टक्क्यांवरनाशिक : गत सप्ताहात जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट...
सोलापूर ःविमा कंपनी शेतकऱ्यांपर्यंत...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात पीकविम्यासाठी भारती...
अकोला ः नैसर्गिक आपत्तीनंतर पीकविमा...अकोला ः पीकविमा हा आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना...
मंगळवेढ्यात सूर्यफूल पीकविम्यातून वगळलेमंगळवेढा, जि. सोलापूर ः मंगळवेढा तालुक्यात...
कोल्हापूर : पीकविम्याच्या ऑनलाइन...कोल्हापूर : विमा योजनेत सहभागाबाबतीत राज्यात...
नाशिक : पीकविम्याबाबत तक्रारींचा पाढानाशिक : पीकविमा कंपन्यांची असक्षम यंत्रणा......
सिंधुदुर्गात कार्यालय; पण शेतकऱ्यांना...सिंधुदुर्गनगरी : विमा कंपनीचे सिंधुदुर्गनगरी येथे...
रत्नागिरी : पूरबाधित शेतकऱ्यांची...रत्नागिरी : जिल्ह्यातील नदी किनारी भागात पुरामुळे...
नांदेडमध्ये विमा कंपनीचे जिल्ह्याच्या...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यासाठी...
नगर : विमा कार्यालय, हेल्पलाइन नंबरची... नगर : नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी,...
कोल्हापूर : पूर फुटाने वाढला, इंचाने...कोल्हापूर : जिल्ह्यातील पूरस्थिती हळूहळू कमी होत...
राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागांचे दौरे...मुंबई : राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे...
विमा कंपनीचा कारभार चालतोय कृषी...सातारा : जिल्ह्यात खरिपाच्या सुरूवातीस पावसाने...
चिपळूणमधील पूरग्रस्तांसाठी पुनर्वसन...रत्नागिरी : ढगफुटीसदृश पावसामुळे चिपळूणकरांचे...
पाणी ओसरताच तातडीने पंचनामेकोल्हापूर : पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत राज्य...
शेतकरी नियोजन पीक : कांदाशेतकरी : नंदकुमार काशिनाथ उशीर गाव : धोडंबे, ता...