धुळे, शिंदखेड्यात पीक स्थिती नाजूक; पावसाची प्रतीक्षा

धुळे, शिंदखेड्यात पीक स्थिती नाजूक; पावसाची प्रतीक्षा
धुळे, शिंदखेड्यात पीक स्थिती नाजूक; पावसाची प्रतीक्षा

धुळे : जिल्ह्यातील शिंदखेडा व धुळे तालुक्‍यात पीक स्थिती नाजूक बनत आहे. अलिकडेच कृषी विभागाच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी धुळे तालुक्‍यातील न्याहळोद व परिसरात या स्थितीची पाहणी केली आहे.

पेरणीनंतर हवा तसा पाऊस धुळे तालुक्‍यातील लामकानी, कापडणे, न्याहळोद, जापी आदी मध्य भागात आला नाही. ज्वारी, कापूस व कडधान्याची पेरणी अनेक शेतकऱ्यांनी उरकली. मागील दोन दिवसांपूर्वी हलका पाऊस झाला. परंतु दुपारी कडक ऊन पडते. त्यामुळे पिकांना फारसा आधार नाही. जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. यात कोवळ्या पिकांना किडी फस्त करीत असून त्यामुळे पीक स्थिती नाजूक झाली आहे.

या संदर्भात धुळे येथील तालुका कृषी अधिकारी विलास सोनवणे व कृषी सहायकांनी नुकतीच न्याहळोद, कापडणे भागात पाहणी केली. येथील शेतकऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. पीक मोडावे की ते राहू द्यावे, याबाबत शेतकऱ्यांनी त्यांच्याकडून सल्ला घेतला.

पुरेशा पावसाअभावी आणि विहिरीतला साठा कमी होत असल्याने कापडणे भागात कांदा रोपे जगविण्याची धडपड शेतकरी करीत आहेत. ठिबक व तुषार सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांना पीक वाचविता येत आहे. कमी पावसात चांगली उगवण न झालेली ज्वारी, सोयाबीन ही पिके शेतकऱ्यांनी मोडली आहेत. नव्याने पेरणी करायची आहे, परंतु पाऊस नाही.

शिंदखेडा तालुक्‍यातही बेटावद, डोंगरगाव, भिलाणे, दोंडाईचा, विखरण भागात पीक स्थिती नाजूक आहे. मागील १२ ते १३ दिवसांपासून चांगला पाऊस नाही. कमी पावसातच पेरण्या झाल्या होत्या. परंतु, नंतर चांगला पाऊस न आल्याने कापसाचे पीक मोडावे लागेल, अशी स्थिती आहे. शिंदखेडा व धुळे तालुक्‍यांत जून महिन्यात सरासरीच्या ४५ टक्केच पाऊस झाल्याची माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com