ओलावा टिकवण्यासाठी आच्छादनावर भर

आच्छादन
आच्छादन

चितेगाव, जि. औरंगाबाद : उन्हाचा फटका फळबागांनाही बसतो, त्यामुळे फळबागेचे उन्हाच्या तीव्रतेपासून संरक्षण करण्यासाठी बाभुगाव (ता. पैठण) शिवारातील शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या झाडांवर पांढऱ्या रंगाच्या कापडाचे आच्छादन व झाडांच्या खोडाच्या भोवती पाचटाचे आच्छादन करण्याचा पर्याय निवडला आहे.  बाभुगाव शिवारातील पाच एकर क्षेत्रात नीलिमा सुरेश कुलकर्णी यांची डाळिंबाची एकमेव बाग असून, उन्हाच्या तीव्रतेपासून वाचवण्यासाठी झाडांवर पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचे आच्छादन केले आहे. झाडांच्या खोडाजवळील ओलावा टिकून रहाण्यासाठी पाचटाचे आच्छादन केले आहे. नीलिमा सुरेश कुलकर्णी यांची बाभुगाव शिवारात हलकी व मध्यम स्वरूपाची साडेआठ एकर शेती आहे. सपाटीकरण करून नदीच्या कडेला शंभर फूट खोल विहीर खोदली. विहिरीला जेमतेम पाणी असल्यामुळे त्यांनी फेब्रुवारी २०१७ मध्ये पाच एकरांमध्ये  डाळिंबाच्या भगवा जातीची लागवड केली. उर्वरित क्षेत्रात पाचशे सीताफळ व तीनशे नारळाची झाडे लावली आहे.  सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करून कमी पाण्यात योग्य नियोजन करण्यात आले आहे. फळबागेला पाणी व खते ठिबकद्वारे दिली जातात. झाडांना शेणखत, लेंडीखत, कंपोस्टखत व जीवामृत दिले आहे. अॉक्‍टोबर २०१८ मध्ये  त्यांनी पहिल्या बहर धरला. एका झाडाला अंदाजे पन्नास ते साठ फळे लागली आहेत. या वर्षी पावसाचे प्रमाण खूपच कमी आसल्याने पाणीटंचाई व उन्हाची तीव्रता यांचा परिणाम फळबागेवर कमीत कमी रहावा, फळांची गुणवत्ता चागंली राहण्यासाठी फळबागेवर पांढऱ्या रंगांच्या कापडाचे आच्छादन केले आहे.  आच्छादनाचे फायदे... बागेतील ओलावा टिकून राखण्यासाठी झाडांच्या खोडाभोवती पाचटाचे आच्छादन केले आहे. या आच्छादनामुळे बागेत ओलावा टिकून रहाण्यास मदत झाली. योग्य व्यवस्थापनामुळे फळांची गुणवत्ता चागंली राहण्यास  मदत होत असल्याचे नीलिमा कुलकर्णी म्हणाल्या. राजनगाव येथील पांडुरंग इनामे यांनीही मोसंबीच्या बागेला पाचटाचे आच्छादन केले आहे. करमाडचे अर्जुन पाटील म्हणाले, अलीकडच्या पाच वर्षांत चार वेळा बागेमध्ये पाणी बचतीसाठी आच्छादन केले. यामुळे डाळिंबाची बाग वाचविण्यासोबतच शेततळ्यात उपलब्ध पाण्याच्या आधारे बहराचे व्यवस्थापन शक्‍य झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com