agriculture news in marathi, Crop Damage Basics for Declaring Drought | Agrowon

दुष्काळ जाहीर करण्यासाठी पीक नुकसानीचा मुख्य आधार

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

नाशिक : दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्र सरकारची समिती पाहणी करून त्यावर निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. मात्र राज्यातील दोनशे तालुक्यांमध्ये चारा, पाणी, रोजगाराच्या प्रश्नावरून सरकारच्या विरोधात असंतोष निर्माण होत आहे. त्यामुळे केंद्रीय समितीची वाट न पाहता राज्य सरकारने निकषात बसणाऱ्या तालुक्यांमध्ये पीक नुकसानीच्या आधारे दुष्काळ जाहीर करण्याची तयारी चालविली आहे. त्यासाठी राज्य शासनाने विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून ५० टक्क्यांपेक्षा अधिक पीक नुकसान झालेल्या गावांचे प्रस्ताव येत्या दोन दिवसांत पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नाशिक : दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्र सरकारची समिती पाहणी करून त्यावर निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. मात्र राज्यातील दोनशे तालुक्यांमध्ये चारा, पाणी, रोजगाराच्या प्रश्नावरून सरकारच्या विरोधात असंतोष निर्माण होत आहे. त्यामुळे केंद्रीय समितीची वाट न पाहता राज्य सरकारने निकषात बसणाऱ्या तालुक्यांमध्ये पीक नुकसानीच्या आधारे दुष्काळ जाहीर करण्याची तयारी चालविली आहे. त्यासाठी राज्य शासनाने विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून ५० टक्क्यांपेक्षा अधिक पीक नुकसान झालेल्या गावांचे प्रस्ताव येत्या दोन दिवसांत पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दुष्काळी परिस्थितीचा आढावा सरकारी पातळीवर घेतला जात आहे. पालकमंत्र्यांना जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्र सरकारने दुष्काळ जाहीर करण्याबाबत संपूर्ण देशात एकाच प्रणालीचा वापर करण्याचे ठरविले असल्याने त्यासाठी नियम, निकषही ठरवून देण्यात आले आहेत. त्यात प्रामुख्याने प्रत्येक महिन्याला पडणारे पर्जन्यमान, पिकाची परिस्थिती, जमिनीची आर्द्रता आदीचा समावेश आहे. परंतु यंदा आॅक्टोबरमध्येच दुष्काळाच्या झळा बसू लागल्याने सरकारने निव्वळ पर्जन्यमानाचा निकष गृहीत धरून त्या आधारे दुष्काळ जाहीर करणाऱ्या प्रणालीतील ट्रिगर दोनचा वापर करण्याचे ठरविले. त्यानुसार दुष्काळाच्या छायेत असलेल्या तालुक्यांमधील दहा टक्के गावांमध्ये पीक परिस्थितीची पाहणी करून त्याचे मूल्यांकन (पिकाचे नुकसान व मिळणारे उत्पन्न) पूर्ण केले आहे. त्याचा अहवाल शासनाला आॅनलाइन सादर करण्यात आला आहे. आता शासनाने त्यात नव्याने भर टाकली असून, पिकांचे अंदाजे ३० टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झाले असल्यास संबंधित तालुक्यात दुष्काळ नाही म्हणजे परिस्थिती सामान्य आहे, असे समजावे असे म्हटले आहे.

पिकांचे ३० ते ५० टक्क्यांच्या दरम्यान नुकसान झाले असल्यास तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ, तर ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असल्यास तालुक्यात गंभीर स्वरूपाचा दुष्काळ समजण्यात यावे, असे म्हटले आहे. दुष्काळग्रस्त तालुक्याच्या मूल्यांकनात पिण्याचे पाणी, चाऱ्याची उपलब्धता तसेच रोजगाराची मागणीदेखील विचारात घेण्यात यावी व तसा प्रस्ताव सोमवारपर्यंत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


इतर अॅग्रो विशेष
सर्वाधिक दर मोजक्याच कांद्यालानगर ः वाढलेल्या कांदादराचा गेल्या महिनाभरापासून...
पशुखाद्य दर गगणाला भिडलेसांगली ः दुष्काळ व अतिवृष्टीचा फटका पशुखाद्य...
शेवंतीचे तीन वाण लवकरच पुणेः शेतकऱ्यांना शेवंतीच्या पांरपरिक वाणांना...
उत्तर प्रदेशात ‘एसएपी’त बदल नाहीनवी दिल्ली: उत्तर प्रदेश सरकारने सलग दुसऱ्या...
उसाचे ३८ गुंठ्यांत तब्बल १४७ टन उत्पादनकोल्हापूर जिल्ह्यातील कवठेगुलंद (ता. शिरोळ) येथील...
कमी कालावधीचा दोडका देतोय चांगला नफागेल्या दोन, तीन महिन्यांत झालेल्या पावसामुळे पुणे...
तापमानात चढ-उतारपुणे ः अरबी समुद्राच्या आग्नेय भागात असलेले कमी...
जीवघेणा बाजारदेशात बोगस, भेसळयुक्त, अनधिकृत कीडनाशकांचा वापर...
मत्स्यदुष्काळ का जाहीर होत नाही?शासनाचे मत्स्यदुष्काळाबाबतचे धोरण अत्यंत चुकीचे...
धुळे ९.४ अंश; थंडीत हळूहळू वाढपुणे ः आकाश निरभ्र झाल्याने थंडीत हळूहळू वाढ होऊ...
साईप्रवरा शेतकरी कंपनीची उलाढाल पोचली...नगर जिल्ह्यातील चिंचोली (ता. राहुरी) परिसरातील...
उन्हाळी नाचणी लागवडीचा यशस्वी प्रयोगकोल्हापूर : राज्यात उन्हाळी नाचणीचे यशस्वी...
बाजारात रानमेवा खातोय भावअकोला ः गुलाबी थंडीची चाहूल लागताच बाजारात विविध...
बोगस कीडनाशकांची विक्री ४००० कोटींवर ! पुणे : देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दीडपट...
शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी ‘...सोलापूर : ठाकरे सरकारकडून किचकट ऑनलाइन...
राज्यातील साखर उत्पादन घटणारपुणे: राज्यातील साखर उत्पादन आधीच्या अंदाजाच्या...
भविष्यात देशी कपाशीला गतवैभव प्राप्त...परभणी: देशी कपाशीचे वाण रसशोषण करणाऱ्या किडीसाठी...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २२७ कोटी...मुंबई: राज्यात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान...
बेदाणा दरात वाढीचे संकेतसांगली ः दिवाळीनंतर बेदाण्याचे सौदे सुरु झाले...
पीकविमा कंपन्यांच्या नफेखोरीला चाप लावा...पुणे: कृषी विभागाच्या कामकाजाची माहिती...