agriculture news in Marathi crop damage due to APMCs closed Maharashtra | Agrowon

..उमेदही हरवतेय; एक हजार टन भाजीपाल्याची वाहतूक ठप्प !

टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 एप्रिल 2020

भाजीपाला वहातूक बंद असल्याने भाजीपाला उत्पादक संघाचे सर्व कामकाज थंडावले आहे. थोडया प्रमाणात होणारी वाहतूकही बंद झाल्याने याचा प्रतिकूल परिणाम शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर होत आहे. 
- शितल उळागड्डे, अध्यक्ष, शेतकरी भाजीपाला संघ, नांदणी जि. कोल्हापूर 

कोल्हापूर: गेले पंधरा दिवस सातत्याने भाजीपाला शेतीचे नुकसान सोसणाऱ्या भाजीपाला उत्पादकांची आता उमेदच हरवत चालली आहे. कोणत्याही शेतात मशागत करणारे ट्रॅक्‍टर दिसले की समाधानाची एक लहर उमटून जाते. पण आता जर कोणत्या भाजीपाल्याच्या क्षेत्रात ट्रॅक्‍टर दिसला की चर्र होतं..अत्यंत खजिल चेहऱ्याने पोरासारख्या जपलेल्या भाजीपाल्याच्या प्लॉटवर रोटर मारुन त्याचं खत करणारा हतबल शेतकरी पाहिला की कोरोनाच्या प्रादुर्भावापेक्षा सध्या सुरु असलेलं दु:ख कितीतरी पटीन जास्त असल्याचा अनुभव याची देही डोळा येतो..फुलून आलेला भाजीपाला डोळ्यादेखत रोटरच्या वजनाने मातीत मिसळताना पाहिला की गरगरायला होतं. 

गेल्या चार दिवसांत हे चित्र गडद झालंय. मुंबई, पुण्याच्या बाजारपेठा बंद झाल्या आणि ट्रॅक्‍टरला मागणी वाढली ती मशागतीसाठी नव्हे तर भाजीपाल्यावर फिरविण्यासाठी. मोठ्या बाजारपेठा बंद झाल्याने तब्बल एक हजार टन शेतमाल जिल्ह्यात पडून आहे. याचा फायदा घेवून गिधाडासारखी टपून असलेली व्यापारी वृत्ती शेतकऱ्यांचे लचके तोडत आहे. भाजीपाला उत्पादकांचे हाल न पहावणारे आहेत. 

भाजीपाला उत्पादनात अग्रेसर असणारी गावे मलूल आणि गलीतगात्र झाली. रोग, दर, मागणी याचे गणित घालून कुठेतरी चार पैसे गाठीला बांधण्याचे स्वप्न पहाणारा भाजीपाला उत्पादक पुरता हबकून गेलाय. शेतात आलेला सोन्यासारखा भाजीपाल्याने त्याची झोप उडवलीय. यातच बाजारसमित्या बंद असल्याने आता सारंच संपल या मानसिकतेत भाजीपाला उत्पादन गेल्याने त्याची उमेदच हरवतीय की काय अशी स्थिती आहे. मास्कच्या मागून त्याच्या चेहऱ्यावरचे दु:ख दिसत नसले तरी त्याच्या डोळ्यातून वहानारी वेदना मात्र महापुराच्या पाण्यासारखी वहात असल्याचा भास होतोय. 

प्रतिक्रिया
भाजीपाल्याला दर नसल्याने मी माझ्या फ्लॉवर पिकावर रोटर मारुन ते जमिनीत गाडून टाकले. लाखो रुपयांचे नूकसान डोळ्यासमोर दिसत असल्याने मला हाच पर्याय योग्य वाटला. यामुळे माझे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहेत. पहिल्यांदाच इतकी वाईट परिस्थिती आमच्यावर आली आहे. 
- गुंडा उदगावे, गणेशवाडी जि.कोल्हापूर 


इतर अॅग्रो विशेष
लेखाजोखा मोदी सरकारचा! पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे ७२ महिने पूर्ण...
झळाळी पिवळ्या सोन्याची!मराठवाडा, विदर्भाच्या काळ्या मातीत कापूस हे पीक...
कृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी...
सोयाबीनची उद्यापासून ऑनलाइन नोंदणीमुंबई : खरीप हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत...
हमीभावाने उडीद खरेदीही उद्यापासूनमुंबई : हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची...पुणे : गेल्या काही दिवसापासून पावसाने...
राहुरी विद्यापीठाच्या बदली सत्रात...पुणे : महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठात...
परतीचा मॉन्सून उद्या काही भागातून पुढे...पुणे: परतीच्या मार्गावर दोन दिवसापूर्वी निघालेला...
दूध वाहतुकीसाठी रेड्याचा वापर !...वाशीम: काळ बदलला...सोयी सुविधा निर्माण झाल्या......
ऊस तोडणी यंत्र अनुदानालाच खो; तीन...कोल्हापूर : संभाव्य मजूरटंचाईच्या पार्श्वभूमीवर...
नंदुरबारच्या मिरचीला अतिपावसाचा फटका;...नंदुरबार : जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या मिरची...
एकत्रित शेतीला यांत्रिकीकरणाची जोडअल्पभूधारकांप्रमाणे मोठ्या क्षेत्रावरील...
व्यापक धोरणात श्रमिकांचा काय फायदा? चार सप्टेंबर २०२० रोजी राज्य शासनाने...
आव्हानात्मक गळीत हंगाममहाराष्ट्रातील ऊस गाळप हंगाम अगदी तोंडावर येऊन...
साखर कामगारांचा संपाचा इशारा  पुणे/कोल्हापूर  ः गळीत हंगाम सुरू होण्यासाठी...
मॉन्सून परतीवर पुणे ः गेल्या तीन महिन्यांपूर्वी पश्चिम...
मराठवाड्यातील ४८६ प्रकल्पांत ७५...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ प्रकल्पांपैकी ४८६...
अकरा सोयाबीन बियाणे कंपन्यांचे परवाने...पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनचे गुणवत्ताहिन...
नगर जिल्ह्यातील धरणे तुडूंबनगर ः दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आणि पाणी...
खानदेशातील प्रकल्पांतून पाणी विसर्गात घटजळगाव ः गेले चार दिवस खानदेशात अपवाद वगळता जोरदार...