agriculture news in Marathi crop damage due to heavy rain and hailstorm Maharashtra | Agrowon

वादळी पाऊस, गारपिटीने राज्यात पिकांचे नुकसान 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 27 मार्च 2020

ज्याच्या विविध भागात गुरूवारी (ता.२६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये वादळी वारे, मेघगर्जना, विजा, गारपिटीसह पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे.

पुणे : राज्याच्या विविध भागात गुरूवारी (ता.२६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये वादळी वारे, मेघगर्जना, विजा, गारपिटीसह पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. दुपारनंतर ढग दाटून येत पडणाऱ्या पावसाने काढणीस आलेल्या गहू, हरभरा, ज्वारी, रब्बी पिके, कांदा, टोमॅटोसह भाजीपाला पिके, द्राक्ष, आंबा, काजू बागांसह, चारा पिकांचे मोठे नुकसान झाले. 

बुधवारी (ता.२५) मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्हा आणि शहराच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. मावळ तालुक्यातील पुसाणे, चांदखेड भागात वादळी पावसाने पिकांचे नुकसान झाले. कोल्हापूर जिल्ह्याच्या पन्हाळा तालुक्यातील माजगाव परिसरात वादळी वाऱ्यासह धुव्वाधार पाऊस झाला. सातारा जिल्ह्यातील पाचगणी, तरडगाव, पिंपोडे, कास, वाई, लोणंद, ढाकणी, माण परिसरात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडला. 

नाशिक जिल्ह्यात तामसवाडी(ता.निफाड).येथे हलक्या सरी बरसल्या. द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात असताना झालेल्या पावसामुळे द्राक्ष उत्पादकांची धाकधूक वाढली आहे. नाशिक जिल्ह्यात नांदगाव बु, (ता.मालेगाव), नाशिक शहरात, येवला शहर व परिसरात मेघगर्जनेसह हलक्या सरीं पडल्या. बेलगाव तऱ्हाळे (ता.इगतपुरी) परिसरात जोरदार वादळी वारा सह जोरदार पाऊस झाल्याने भाजीपाला, गहू, हरभरा, जनावराचा चारा, इतरही नुकसान झाले. शेणवड (ता.इगतपुरी) येथे पावसासोबत गारा पडल्याने हरभरा पिके पावसात भिजली आहेत. दारणा धरण परिसरात पाऊस पडला. 

नगर जिल्ह्यात श्रीरामपूर, संगमनेर, राहुरी, कोपरगाव, राहता, तालुक्यात विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने मोठे नुकसान होणार आहे. श्रीगोंदा तालुक्यात अनेक गावात पावसाने पिकांचे नुकसान झाले. राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील मुळाथडी परिसरातील पानेगाव, मांजरी, शिरेगाव, वळण,करजगांव, आदी गावात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाट पाऊस पडला. कोल्हार, ता.राहता येथे गारपिटीने झालेले द्राक्ष बागांचे नुकसान झाले. 

दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यात पावसाने हजेरी लावली. पूर्व विभागात विजेच्या कडकडाटासह दुपारी पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे रब्बीच्या पिकांसह आंबा काजूवर परिणाम होण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे आधीच आंबा निर्यातीचा प्रश्न निर्माण झाला आहे अवकाळी पावसामुळे हापूस आंबा खराब होण्याची शक्यता अधिक आहे त्यामुळे येथील बागायतदार दुहेरी संकटात सापडला आहे. 

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळल्या. औरंगाबादमधील वैजापूर,सोयगाव तालुक्यात पाऊस झाला. चेंडुफळ (ता. वैजापूर) परिसरात काढणीस आलेल्या गहू, कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. नांदर (ता.पैठण) येथे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. जालना जिल्ह्यातील वडीगोद्री वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वालसावंगी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. परभणी जिल्ह्यातील सेलू शहर तसेच तालुक्यातील अनेक गाव शिवारात आज सायंकाळी मध्यम पाऊस झाला. 

विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा, बुलडाणा जिल्ह्याच्या विविध भागात वादळीवाऱ्यासह पाऊस पडला. बुलडाणा जिल्ह्यातील खामगांव तालुक्याच्या पारखेड़ गावात वादळी पावसाने प्रचंड नुकसान झाले. महादेव त्र्यंबकराव खराटे (रा पारखेड) यांच्या मालकीची म्हैस वीज पडून ठार झाली. 

गुरूवारी (ता.२६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलीमीटरमध्ये) ः 
मध्य महाराष्ट्र ः शिराळा ४०, महाबळेश्वर, मिरज प्रत्येकी ३०, श्रीरामपूर, राहाता, गडहिंग्लज प्रत्येकी २०, संगमनेर, कोपरगाव, बोधवड, आजरा प्रत्येकी १०. 
विदर्भ ः चांदूर रेल्वे, हिंगणा प्रत्येकी ३०, नेर, पारशिवनी, बटकुली, आर्वी, तिवसा, बाभुळगाव, नांदगाव काझी, कुही प्रत्येकी २०, काटोल, नागपूर, खारंघा, मातोळा, धामणगाव रेल्वे, रामटेक, मलकापूर, अमरावती, नांदुरा, खामगाव, पुसद, मौदा, दारव्हा, मोर्शी, कळमेश्वर, देवळी, चांदूरबाजार, आष्टी, सेलू़, जळगाव जामोद प्रत्येकी १०. 
 


इतर बातम्या
पुण्यात पोलिस बंदोबस्तात बाजार समिती...पुणे : कोरोनामुळे शहरात लॉकडाऊन असतानाही...
पुणे बाजार समिती आजपासून सुरु; मात्र...पुणे : कोरोना विषाणूमुळे सुरू असलेल्या...
देशातील रुग्णसंख्या ९०० च्या घरातनवी दिल्ली : महासत्ता अमेरिकेसह संपूर्ण जगात...
देशातील वस्त्रोद्योगाला दोन लाख कोटींचा...जळगाव ः देशात शेतीनंतर रोजगाराचा व आर्थिक...
राज्यातील कोरोना रुग्णाची संख्या १८१;...मुंबई : राज्यात शनिवारी (ता.२९) आणखी २८ कोरोना...
मुंबई बाजार समितीत आज व्यापाऱ्यांचा...मुंबई : राज्य शासनाच्या आदेशामुळे सुरू...
फळे, भाजीपाला पुरवठ्यासाठी राज्यभर...पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना फळे व...
‘कोरोना’चा सामना करण्यासाठी ११ हजार...अकोला  ः कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे...
नगर जिल्हा बॅंकेने दिले कर्जवसुलीचे...नगर ः कोरोना व्हायरसचा संसर्ग कमी करण्यासाठी...
वाशीममधील कृषी निविष्ठा केंद्रे सुरू...वाशीम : ‘कोरोना’ विषाणूच्या पार्श्वभूमीवर...
नगर, पुणे, सोलापूरात हजारवर वाहतूक...पुणे ः शहरांमध्ये भाजीपाला, फळे, दुध अशा...
वऱ्हाडातील ६५ हजारांवर नागरिक गावी परतलेअकोला ः रोजगार, नोकरीच्या निमित्ताने शहरांमध्ये...
अकोल्यातील दिड हजारांवर शेतकऱ्यांची...अकोला ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
जिल्हा परिषदेचे दीड लाख कर्मचारी देणार...नगर ः कोरोना संसर्गाबाबत उपाययोजना करण्यासाठी...
राज्यात पुर्वमोसमी पावसाचा आजही अंदाज पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुर्वमोसमी...
नगर जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी पावसाचा...नगर  ः नगर जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी...
शेतमाल निर्यातीसाठी वाणिज्य मंत्रालयाने...नागपूर  ः राज्यात जारी करण्यात आलेल्या...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यात पाऊस औरंगाबाद/जालना: दोन्ही जिल्ह्यातील जवळपास ६७...
कलिंगड, खरबूज उत्पादक शेतकऱ्यांना फटकासोलापूर ः खास उन्हाळी हंगाम डोळ्यासमोर ठेवून...
राज्य तलाठी संघांकडून एक दिवसाचे वेतन...परभणी ः कोरोना बाधितांच्या मदतीसाठी तलाठी, मंडल...