अतिवृष्टीने परभणीत सव्वा तीन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

पीक नुकसानीची पाहणी करताना जिल्हाधिकारी पी. शिवशंकर
पीक नुकसानीची पाहणी करताना जिल्हाधिकारी पी. शिवशंकर

परभणी  ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ८४३ गावांमधील ३ लाख ३८ हजार ७६२ शेतकऱ्यांच्या एकूण ३ लाख २९ हजार ३२ हेक्टरवरील जिरायती, बागायती पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. या कामात कुचराई करू नये. शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी पीक नुकसानीचे सर्वेक्षण आणि पंचनाम्याचे अहवाल वेळेत सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी दिले.

जिल्ह्यात लागवडी योग्य ६ लाख १ हजार ९६४ हेक्टर क्षेत्रापैकी यंदाच्या खरिपात ५ लाख ५४ हजार ७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. नऊ तालुक्यांतील ८४४ गावांमध्ये एकूण ४ लाख ९ हजार ५६१ शेतकरी खातेदार आहेत. त्यापैकी ८४३ गावांतील ३ लाख ३८ हजार ७६२ शेतकऱ्यांच्या ३ लाख २९ हजार ३२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नुकसानग्रस्त पिकांमध्ये ३ लाख १९ हजार ५५२ हेक्टरवरील जिरायती पिके, ९ हजार १९८ हेक्टरवरील बागायती पिके आणि २८२ हेक्टरवरील फळपिकांचा समावेश आहे.शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी महसूल, कृषी, ग्रामविकास विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या पथकामार्फत पीक नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत.  

नुकसानग्रस्त पिकांचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)
सोयाबीन १,५२,०५८
कापूस १,५६,९४०
तूर  ५६६१
ज्वारी    १८१४
इतर पिके   ७५१०
तालुकानिहाय नुकसान स्थिती (हेक्टरमध्ये)
तालुका गावे जिरायती पिके बागायती पिके फळपिके शेतकरी संख्या
परभणी १३१ ६८,४८५ २८०० १५ ६३,५००
जिंतूर १६८ ३४,८२० ११० ६० ३५,७८०
सेलू   ९५ २३,८८० ९७० ५२ ४२,१२०
मानवत ५४  ३३,००० ४३०  ७० ३५,३७०
पाथरी    ५६ ३०,६५७ ५३० २० ३१,७५७
सोनपेठ ६० २६,६०० ४०० २० २४,२०३
गंगाखेड १०५ ३२,११० ४७० २० ३८,७००
पालम ८० ३६,७०० १८८ ५   ३३,१३२
पूर्णा ९४ ३३,३०० ३३०० २० ३४,२००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com