राज्यात पूर्वमोसमी, गारपिटीने पिकांचे नुकसान 

मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे. बुधवारी व गुरुवारी राज्यातील सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, सोलापूर, नगर, नाशिक, औरंगाबाद, जालना, नांदेड जिल्ह्यांत काही ठिकाणी पावसाने चांगलेच झोडपले.
Crop damage due to ‘pre-season’
Crop damage due to ‘pre-season’

पुणे : मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे. बुधवारी व गुरुवारी राज्यातील सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, सोलापूर, नगर, नाशिक, औरंगाबाद, जालना, नांदेड जिल्ह्यांत काही ठिकाणी पावसाने चांगलेच झोडपले. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निघून जातो की काय असे त्यांना वाटू लागले आहे. त्यातच कोरोना महामारी चालू असताना अचानक झालेल्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. 

मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड, जालना जिल्ह्यांतील काही ठिकाणी पूर्वमोसमीच्या जोरदार सरी बरसल्या. जालना शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. जिल्ह्यातील जाफराबाद येथे दुपारी अडीचच्या सुमारास रिमझिम पाऊस झाला. तर मंठा तालुक्यात दुपारपर्यंत ढगाळ वातावरण व दुपारी अडीचच्या सुमारास वादळी वारे वाहू लागले. जवखेडा (ठों) परिसरात दुपारी दोनच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह रिमझिम पाऊस सुरू झाला. तर वादळी वाऱ्यामुळे आंब्याच्या झाडाला लगडलेले आंबे पडले. नांदेडमधील कंधार तालुक्यातील फुलवळ येथे पावसाच्या  तुरळक सरी पडल्या. 

मध्य महाराष्ट्रातील दक्षिण व मध्य भागातही पावसाने चांगलीच हजेरी लावली. साताऱ्यात वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह माण, खटाव, सातारा, कऱ्हाड, पाटण, खंडाळा तालुक्यांत पूर्वमोसमीने हजेरी लावली. अनेक ठिकाणी सुमारे तासभर झालेल्या पावसाने पाणी पाणी केले. सोलापूर जिल्ह्यातही सलग पाऊस होत असल्याने विविध तालुक्यांत काढणीस आलेल्या आलेल्या फळबागांचे नुकसान होत आहे. पंढरपूर, बार्शी, माढ्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. त्यामुळे गहू, ज्वारीच्या मळण्या खोळंबल्या. काही ठिकाणी खळ्यावर टाकलेली ज्वारीची कणसे भिजली असून कापणीला आलेल्या गव्हाचे नुकसान झाले. सांगली, नगर, नाशिकमध्ये तुरळक ठिकाणी पावसाने दणका दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली गहू, कांदा पिकांचे नुकसान झाले. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण व पाऊस अशी स्थिती आहे. जिल्ह्यातील सावंतवाडी, वैभववाडी, नांदगाव, फोंडा, कणकवली परिसराला पावसाने चांगलेच झोडपले होते. उकाड्याने त्रासलेल्या नागरिकांना पावसाने एक सुखद धक्का दिला. विजांच्या कडकडाटासह पावसाने चांगलीच हजेरी लावली. यामुळे वीजपुरवठा देखील काही काळ खंडित झाला होता. वैभववाडी तालुक्यात सलग दोन दिवस पावसाची रिमझिम चालू होती. तर काही भागात हलका पाऊस पडला. यामुळे आंबा व काजू बागायतदार पावसाच्या तडाख्यामुळे धास्तावले. 

पिकांना फटका

  • साताऱ्यात कलिंगडे, टरबूज, ज्वारी, कडब्याला बसला फटका 
  • सोलापुरात द्राक्षे, गहू, आंबा पिकांचे नुकसान 
  • मराठवाड्यात कांदा, फळबागांना झोडपले 
  • गहू, ज्वारीच्या मळण्या खोळंबल्या 
  • सिंधुदुर्गामध्ये आंबा, काजू पिकांना तडाखा   
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com