agriculture news in marathi, crop damage increase due to rain, kolhapur, maharashtra | Agrowon

कोल्हापुरातील पश्चिम भागात पीक नुकसानीची व्याप्ती वाढणार
टीम अॅग्रोवन
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

कोल्हापूर  ः जिल्ह्यात पावसाचे प्रमाण सध्या कमी झाले असले तरी पश्‍चिमेकडील शिवारात अद्यापही पाणी साचून राहिल्याने पीक नुकसानीच्या व्याप्ती वाढण्याची शक्‍यता आहे. कृषी विभागाने पंचनामे सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. अद्यापही वाफसा नसल्याने शेतात जाणे शक्‍य होत नसल्याची स्थिती आहे. यामुळे पंचनामे पूर्ण क्षमतेने सुरू झाले नसल्याचे चित्र पश्‍चिम भागातील आहे.

कोल्हापूर  ः जिल्ह्यात पावसाचे प्रमाण सध्या कमी झाले असले तरी पश्‍चिमेकडील शिवारात अद्यापही पाणी साचून राहिल्याने पीक नुकसानीच्या व्याप्ती वाढण्याची शक्‍यता आहे. कृषी विभागाने पंचनामे सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. अद्यापही वाफसा नसल्याने शेतात जाणे शक्‍य होत नसल्याची स्थिती आहे. यामुळे पंचनामे पूर्ण क्षमतेने सुरू झाले नसल्याचे चित्र पश्‍चिम भागातील आहे.

चंदगड तालुक्‍यात स्थिती बिकट बनली आहे. तालुक्‍यात सतत कोसळणारा पाऊस, कुंद वातावरण यामुळे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले आहे. ऊस पिकासह नाचणी, भुईमूग, मिरची, रताळे, बटाटा ही सर्वच पिके कुजलेल्या स्थितीत आहेत. शेतकऱ्यांना त्याचा मोठा आर्थिक फटका बसणार असून शासनाने पीक पाहणी करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

कोकण सीमेवरील तिलारीनगर भागात सर्वाधिक पावसाची नोंद होते. या विभागातील हेरे येथील पर्जन्यमापकाचा विचार करता ३२०० मिमीहून अधिक पाऊस झाला आहे. हेरे ते तिलारीनगर हे अंतर विचारात घेता तिलारीनगर भागात यापेक्षाही अधिक पाऊस झाला आहे. त्याचा फटका पिकांना बसला आहे. पिकांच्या वाढीसाठी पावसाइतकीच सूर्यप्रकाशाची गरज असते; मात्र गेले तीन महिने या भागात सूर्यदर्शन झालेले नाही. जराही उघडीप नसल्याने पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास वाव नाही. परिणामी पिके कुजली आहेत. नाचणी, भुईमूग, मिरची, रताळी ही पिके पूर्णतः खराब झाली आहेत. उसाच्या सरीत दोन फुटांपेक्षा अधिक पाणी साचले असून पाने कुजली आहेत. वाढीवरही परिणाम झाला आहे. महसूल प्रशासनाने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह पाहणी दौरा करून पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

कोवाड परिसरात घरांच्या पडझडीसह शेतीपिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. नदीकाठाची पिके सततच्या पाण्यामुळे कुजली आहेत. दिवसभर ढगाळ वातावरण, गार वारा व पावसाच्या जोरादार कोसळणाऱ्या सरी; असे इथले वातावरण आहे. यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. पाण्यात बुडलेल्या पिकांची कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ओला दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. 

सूर्यप्रकाश नसल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. परिसरात चार हजार हेक्‍टर क्षेत्रात भाताचे पीक आहे. यापैकी सत्तर टक्के भात क्षेत्राच्या परिसरात पाण्याचे स्रोत आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी शेतातून पाणी साठल्याने भांगलण व कोळपणीची कामे रखडली आहेत. शेतातील वाहत्या पाण्यात शेतकऱ्यांना खते टाकण्याची वेळ आली आहे. तसेच पाण्याची दलदल व ढगाळ वातावरणामुळे उसाची वाढ कमी झाली आहे. त्यामुळे यावर्षी उसाचे क्षेत्र जास्त असले तरी एकरी उत्पादनात घट होणार असल्याचा अंदाज शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

इतर अॅग्रो विशेष
अचूक आकडेवारीचा काळ आठव्या आंतरराष्ट्रीय कृषी सांख्यिकी परिषदेत...
उद्यापासून हंगाम सुरु, पण ऊसतोड बंदच !मुंबई / पुणे  ः राज्यातील यंदाचा ऊस गाळप...
विदर्भ, मराठवाड्यात गारठा वाढलापुणे   : किमान तापमानात घट होत असल्याने...
खतमाफियांमुळे शेतकऱ्यांची मोठी लूटपुणे : बोगस मिश्रखतांचे उत्पादन व विक्री करणाऱ्या...
भरताच्या वांग्यासह दादर ज्वारीसाठी...खानदेशकन्या तथा आपल्या कवितेतून शेतीचे...
बॅंक एकत्रीकरण एक अनावश्‍यक पाऊलभारताने १९९० मध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारले....
भूगर्भ तहानलेलाच!रा ज्यात या वर्षी जोरदार पाऊस झाला. अनेक भागांत...
साखर उद्योगाने मूल्यपदार्थांकडे वळणे...पुणे: देशाच्या ग्रामीण अर्थकारणात मोलाचा वाटा...
देशात कापूस उत्पादन घटणारजळगाव ः देशात सर्वाधिक कापूस उत्पादित करणाऱ्या...
राष्ट्रीय कृषिमुल्य आयोगासमोर ऊस...पुणे : कायद्यातील उणिवांचा फायदा घेत ऊस उत्पादक...
नुकसानग्रस्तांसाठीचे दोन हजार कोटी...मुंबई: राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ३२५ तालुक्‍...
थंड वारे वाढणार...पुणे : राज्यात किमान तापमानातचा पारा १६ अंशांच्या...
दर्जेदार दुग्धोत्पादनांचा ‘गारवा’ ब्रॅंडकोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर दूध संघ दुग्धजन्य...
शेवगा कसे ठरले 'या' शेतकऱ्याचे हुकमी...कायम अवर्षण स्थिती असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील...
'पणन'ची २७ पासून कापूस खरेदी नागपूर ः सिसिआयची खरेदी सुरूच असली तरी कापूस पणन...
शेतीला व्यावसायिक दर्जा आवश्यक: सुहास...पुणे: भावनिकतेच्या आधारे शेती न करता शेतकरी...
कुजलेल्या तुराट्यांच्या झाडण्याही होणार...परभणी ः यंदा तुरीचं पीक लई जोरात आलं होतं. चांगली...
सांगली जिल्ह्यातील अंडी उत्पादकांना...सांगली ः एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत...
मानवी, शेती आरोग्यासाठी नैसर्गिक शेतीचा...मानवी व शेतीचे आरोग्य याबाबत अधिक जागरूक झालेल्या...
अभ्यास, नियोजनातून देशी दुग्धव्यसाय...भाजीपाला शेती करण्याबरोबरच रेशीमशेती आणि...