Agriculture news in Marathi Crop damage issue of Farmers Struggle Committee | Agrowon

पीक नुकसानप्रश्नी शेतकरी संघर्ष समितीचा ठिय्या

टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

परतीच्या मॉन्सून पावसामुळे, धरणातील पाणी सोडल्याने आलेल्या पुरामुळे आणि जलयुक्त शिवार योजनेच्या अशास्त्रीय कामामुळे पीक बुडी झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी, या मागणीसाठी  मंगळवारी (ता. २७) शेतकरी संघर्ष समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

परभणी ः परतीच्या मॉन्सून पावसामुळे, धरणातील पाणी सोडल्याने आलेल्या पुरामुळे आणि जलयुक्त शिवार योजनेच्या अशास्त्रीय कामामुळे पीक बुडी झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी, या मागणीसाठी  मंगळवारी (ता. २७) शेतकरी संघर्ष समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

शेतकरी संघर्ष समितीचे संयोजक कॉ. राजन क्षीरसागर  यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनाच्या  वेळी परभणी जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळांचा बाधित व नुकसानग्रस्त क्षेत्रात समावेश करावा. राष्ट्रीय आपत्ती निवारण बल (NDRF)चे निकष शिथिल करून प्रतिहेक्टर विमा जोखीम रकमेची म्हणजे सोयाबीनसाठी ४५ हजार ५०० रुपये मदत द्यावी. माती वाहून गेलेल्या खड्डे पडलेल्या शेतजमिनीची दुरुस्ती करण्यासाठी ५० हजार अतिरिक्त मदत द्यावी.

चुकीच्या व अशास्त्रीय कार्यपद्धतीमुळे पूर आणि जमिनीच्या नुकसानीस जबाबदार अधिकारी कंत्राटदार आणि जलयुक्त शिवारचे जनक देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शंभर टक्के पीक विमा भरपाई तत्काळ अदा करावी, आदी मागण्या शेतकरी संघर्ष समितीतर्फे कॉ. क्षीरसागर, माणिक कदम, शिवाजी कदम यांनी केल्या. यावेळी शेतकरी सहभागी झाले होते.


इतर ताज्या घडामोडी
बहिरम यात्रा अखेर रद्दअमरावती : लाखो भाविकांचे कुलदैवत आणि विदर्भात...
महाद्वार काल्याने कार्तिकी यात्रेची...सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात...
विधान परिषदेच्या सहा जागांचा आज निकालमुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन पदवीधर,...
सरसकट पीकविम्यासाठी महाजनआंदोलन उभारणारनांदेड : खरिपातील पिकांचा सरसकट विमा...
पुण्यातील रायफल एक्स्पर्ट काढणार...आष्टी, जि. बीड : बिबट्यांच्या उच्छादाने आष्टी...
‘गंगाखेड’ला परवाना देण्यासाठी...परभणी : गंगाखेड शुगर कारखान्यास यंदाच्या हंगामात...
शेतीला रात्रीची नको, दिवसा वीज द्यापुणे : दौंड तालुक्यातील केडगाव येथील महावितरण...
नगर जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्राकडे...नगर : हमीभावाने मूग, सोयाबीन, उडदाची खरेदी...
सरकारी गोदामे भरली; संग्रामपूर,...बुलडाणा : जिल्ह्यात या हंगामात सुरू केलेली...
माणमध्ये रब्बीची ४३ हजार हेक्‍टरवर...कुकुडवाड, जि. सातारा : माण तालुक्‍यात यंदा...
सिंधुदुर्गमध्ये ३७५ बंधारे पूर्णसिंधुदुर्ग : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई...
सागंलीत दिवाळीपूर्वी नाही मिळाली मदत सांगली : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपूर्वी...
अमरावतीत ८८ हजार हेक्‍टरवर रब्बीची लागवडअमरावती : संततधार पाऊस, अतिवृष्टी आणि त्यानंतर...
पीककर्जासाठी बँकेतच आत्महत्येचा प्रयत्नघाटबोरी, जि. बुलडाणा : पीककर्ज मिळावे यासाठी...
गडहिंग्लज, आजऱ्यात पुरेसा पाणीसाठाआजरा, जि. कोल्हापूर : दर वर्षीप्रमाणे यंदाही...
गोंदियात ३५ कोटींवर धान खरेदी गोंदिया : जिल्ह्यात दिवाळीनंतर हमीभाव केंद्रांवर...
धान बारदानाचे २५ कोटी थकीतगडचिरोली :  शेतकऱ्यांकडून घेतलेल्या...
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावाने ६३८५ क्‍...औरंगाबाद : ‘‘किमान आधारभूत किमतीने ६३८५ क्‍...
परतूर तालुक्‍यातील द्राक्ष, डाळिंब...जालना  : परतूर तालुक्‍यातील डाळिंब, द्राक्ष...
खानदेशात गहू पेरणीचा वेग मंदावलाजळगाव : खानदेशात गेली आठ ते १० दिवस ढगाळ वातावरण...