मोकाट जनावरांकडून पिकांचे नुकसान

पीक नुकसान
पीक नुकसान

विंग, जि. सातारा ः अतिवृष्टीने खरीप धोक्‍यात असताना आता पिकांना वन्य प्राण्यांनी लक्ष्य केल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. विशेषतः येथील वाघझरा पायथा परिसरात उसासह भुईमूग पिकांचे मोठे नुकसान होत आहे. पिकांची नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.  गेल्या महिन्यात अतिवृष्टीने विंगसह परिसरात खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनस्तरावर त्याचे पंचनामेही झाले आहेत. त्यातून शेतकरी अद्याप सावरलेला नाही. मात्र, अतिवृष्टीतून वाचलेल्या पिकांना आता वन्यप्राण्यांनी लक्ष्य केल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. विशेषतः विठ्ठलाई डोंगरपायथा परिसरात प्राण्यांचा उपद्रव अधिक आहे. डुक्कर, साळींदरने ऊस  पिकांसह भुईमूग पिके फस्त केली आहेत.  शंकरराव रघुनाथ खबाले व उमेश खबाले यांच्या एकरातील ऊस डुकरांनी फस्त केला आहे. सुभाष लक्ष्मण खबाले, बाळासाहेब खबाले, मोहन खबाले, प्रकाश खबाले, जयवंत गणपती खबाले आदी शेतकऱ्यांचे भुईमुगाचे मोठे नुकसान झाले  आहे. वन्य प्राण्यांकडून पिकांवरील हल्ल्याचे सत्र अद्याप सुरूच  आहे. संबंधित विभागाकडून नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com